संगमनेरात पुन्हा 24 रुग्ण, रॅपिड अॅन्टीजन टेस्टचा रिपोर्ट, संख्या 389 पोहचली!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात कोरोनाची संख्या रोज अवाजवीप्रमाणे वाढत असल्याचे दिसत आहे. सकाळी सहा रूग्ण मिळून आल्यानंतर आज सायंकाळी उशिरा आलेल्या अहवालात तब्बल 24 रूग्ण पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या 389 वर जाऊन पोहचली आहे. आज आलेल्या 24 अहवालात संगमनेर, निमगाव जाळी, नांदुरी दुमाला, पिंपळगाव देपा, घुलेवाडी, हिवरगाव पावसा, शिबलापूर अशा ठिकाणी कोरोनाचे रूग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली असून हे परिसर कंन्टेन्मेंट करण्यासाठी त्यांनी धाव घेतली आहे.
यात संगमनेर शहरात 12 रूग्ण त्यापैकी 3 महिला तर 9 पुरूषांचा समावेश आहे. तर निमगाव जाळी येथे 30 वर्षीय पुरूष, नांदुरी दुमाला येथे 43 वर्षीय पुरूष, पिंपळगाव देपा येथे 30 वर्षीय पुरूष, घ ुलेवाडी येथे 9 वर्षाचा चिमुकला तर हिवरगाव पावसा येथे 4 महिला व 2 पुरूष असे 6 जणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे घुलेवाडी येथे 17 वर्षीय तरूण आणि शिबलापूर येथे 26 वषीर्र्य तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व रिपोर्ट रॅपिड अॅन्टीजन टेस्टनुसार करण्यात आली आहे.
या पलिकडे संगमनेरमध्ये काल 11 कोरोनाबधित तर दोन कोरोनाग्रस्तांची मयत होते कोठे नाहीतर आज पुन्हा पाच रुग्ण नव्याने आढळून आले आहे. यामध्ये शहरातील गोल्डन सिटी येथे 37 वर्षीय पुरुष तर शहरालगत असलेले घुलेवाडी येथे 35 वर्षीय पुरुष व 2 वर्षाच्या बालकाला कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले आहे. तसेच कसारा दुमाला येथे 77 वर्षीय वयोवृद्धाचा कोरोनाची बाधा झाली आहे. शहरालगत असलेल्या राजपूर येथे 17 वर्षीय युवतीला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. तर खंडोबा गल्लीत एक ३६ वयाचा व्यक्ती असे ६ जण मिळून आले आहेत.
जिल्ह्यात आज कोरोना टेस्ट लॅबमध्ये १० रुग्ण बाधित आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि पोर्टलवर नोंद झालेल्या १७३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्याच बरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील निकट सहवासितांची जलद गतीने तपासणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात अँटीजेन चाचण्यांना गेल्या ३-४ दिवसापासून सुरुवात केली आहे. आतापर्यंत १०९५ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात १५८ जण बाधित आढळले आहेत. त्याचीही नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ८५४ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २०२७ इतकी झाली आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा वेग वाढावा यासाठी तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणेला अँटीजेन किटचे वितरण करण्यात आले आहे. त्या माध्यमातून बाधित व्यक्तीच्या संपर्का तील व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अशा चाचण्यांच्या माध्यमातून बाधित आढळलेल्या 158 रुग्णांची आज भर पडली.