अकोले तालुक्यात कोरोनाचा तिसरा बळी, देवठाणमध्ये तरुणीला कोरोनाची बाधा, शंभर रिपोर्ट पेंडिंग.!
- संकेत सामेरे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात नाही-नाही म्हणता कोरोनाची परिस्थितीत फार बिकट होत चालली आहे. आजवर येथे मार्केटयार्ड, लहित आणि आता कोतुळ परिसरातील गोडेवाडी येथील 75 वर्षीय व्यक्ती अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. तर बाधित व्यक्ती देखील 75 पर्यंत जाऊन पोहचला आहे. तर जे व्यक्ती कोरोना बाधित मिळून आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळ-जवळ 100 व्यक्तींचे स्वॅब अद्याप पेंडींग आहेत. त्यामुळे, अकोल्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केळी-कोतुळ परिसरात गोडेवाडी येथील एक रुग्ण मुंबईहून गावाकडे आला होता. मात्र, हे व्यक्ती गावी जाण्यापुर्वी थेट संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता. दरम्यान त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे ते नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले होते. या व्यक्तीचे वय 75 असल्यामुळे त्यांना डेयबेटीस आणि किडणी तसेच निमोणीया असे काही आजार होते. त्यामुळे त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांना कोरोना झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे ते देखील उपचार त्यांच्यावर सुरू होते.
आज गुरूवार दि. 23 रोजी दुपारी त्यांच्यावर नाशिक येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तरी त्यांचा गावाशी व स्थानिक व्यक्तींशी कोणताही संपर्क आलेला नाही. त्यामुळे कोणी घाबरुन जाण्याचे काम नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर या व्यतीरिक्त देवठाण येथील डोकेदुखी आजून वाढतीच आहे. येथे ज्या कुटुंबात कोरोना पॉझिटीव्हचे सहा रुग्ण मिळून आले होते. त्याच कुटुंबात पुन्हा एक तरुणीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, जो व्यक्ती बाधित आहे. त्यांची हेटाळणी न करता त्यांच्यापासून आंतर ठेऊन सावधानी बाळगली पाहिजे. अन्यथा हा आजार दिवसेंदिवस वाढता राहणार आहे.
तर शिवसेनेचे शहरप्रमुख यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या रिपोर्टमुळे अनेकजण व्हेंटीलेटरवर होते. मात्र, आज त्यांनी कोरोनावर मात करुन ते घरी परतले आहे. त्यांचे कारखाना रोड वासीयांनी वाजत गाजत स्वागत केले आहे. तर यावेळी त्यांचे औक्षण करुन मोठी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ते घरी येणार हे समजल्यानंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. तर कोविड बाधितांना मदत करता करता स्वत: ग्रस्त झाल्यानंतर त्यांना अनेकांनी धिर दिला. त्यामुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले आहे.