एलसीबीचा चौधरी व अ‍ॅडिशनल ऑफीसच्या हिंगेमुळे ते तीन जीव गेले! जो चौथा जगला त्याची जबाब! थरारक पाटलाग!


सार्वभौम (संगमनेर) : 
                        संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे वाळु वाहतूक करताना वाहन अपघातात तीन मजुरांचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मात्र, यात खरे दोषी कोण? यावर रोखठोक सार्वभौमने प्रकाश टाकला होता. एलसीबीचा कर्मचारी चौधरी व आणि श्रीरामपूर कार्यालयातील कर्मचारी हिंगे या दोघांना एका खाजगी वाहनातून या वाळुच्या गाडीचा पाटलाग केला होता. हे आता जवळजवळ सिद्ध झाले आहे. इतकेच काय! हा अपघात झाल्यानंतर हे खड्ड्याच्या वर उभे राहून त्यांना मरत यातना सोसत असताना मदत करण्याऐवजी त्यांना पाहून या बाहद्दरांनी काढता पाय घेतला. मात्र, त्यांचे दुर्दैव असे की, या घटनेत तिघे जागीच ठार झाले मात्र, चौथा जगला आणि त्याने सगळी हकीकत पोलिसांपुढे कथन केली आहे. त्यामुळे, प्रथमत: पोलिसांनी हा सर्व प्रकार कॉन्ट्रॅक्टर, अभियंते यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणाच्या जबाबाने अनेकांचे बिंग फुटले आहे.

            या घटनेत एका मयत तरुणाच्या पत्नीने तक्रार केली आहे की, दि. 28 जून रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास नायकवाड पुरा येथील दोन परवेज सय्यद यांच्या घरी गेले होते. वाळुने भरलेली गाडी चालवायची आहे असे म्हणताच सय्यद यांनी त्यास नकार दिला. तरी देखील या तिघांनी त्यास बळजबरीने नेले. दरम्यान ही गाडी घेऊन जात असताना श्रीरामपूर विभागीय कार्यालयातील हिगे व त्याचा एका साथिदार चौधरी यांनी झायलो गाडीतून त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी परवेज यांनी त्यांच्या वाहनाचा वेग वाढविला असता या दरम्यान पोलिसांच्या एम. एच 17 एजे 4348 या खाजगी गाडीने वाळुच्या गाडीला कट मारला असता ती गाडी निळवंडे कालव्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात जाऊन पडली.

                           दरम्यान या घटनेत परवेज सय्यद, विठ्ठल बर्डे, सुरेश माळी या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर यात एकमेव व्यक्ती अक्षय माळी यांचे दैव बलोत्तर म्हणून ते बचावले आहेत. अक्षय यांनी दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात की, जेव्हा हा अपघात झाला तेव्हा हिंगे व चौधरी हे दोघे त्या खड्ड्याच्या वर उभे होते. त्यांना मी आवाज दिला. कारण, त्यावेळी माझ्यासह आणखी एकजण जीवंत होते. मात्र, पोलिसांनी तेथून तत्काळ काढता पाय घेतला. मात्र, कालांतराने मी स्व:ता खालच्या बाजुने खड्ड्यातून वर आलो आणि   त्यानंतर काही लोकांनी मदत केली. त्यावेळी गाडीचे मालक मोईन पठाण, आवेज शेख हे तेथे आले असता त्यांनी जखमींना रुग्णालयात नेले नाही. असे तक्रारदाराने अर्जात म्हटले आहे.
                         

  आत यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही वरिष्ट पोलीस अधिकार्‍यांना हा प्रकार माहित होता. तरी देखील त्यांनी संबंधित कर्मचार्‍यास विचारण्याची तसदी घेतली नाही. केवळ अर्थपुर्ण गरज भागविणार्‍या व्यक्तीचा विचार केला गेला. गेल्या कित्तेक दिवसांपासून हा अतिरेख सुरू होता. मात्र, अति तेथे माती होते असे म्हणतात ते खोटे नाही. त्यामुळे, गेल्या पहिल्या दिवसापासून रोखठोक सार्वभौमने यावर आवाज उठविला होता. श्रीरामपूर कार्यालयातील कर्मचार्‍यापासून तर त्यांच्याकडे असणार्‍या झायलो गाडीची देखील माहिती सर्वांसमोर आणली होती. मात्र, अधिकार्‍यांची कोणतीही मानसिकता झाली नाही. अखेर आज चौघांपैकी जो एक जीवंत राहिला त्याने सर्व माहिती प्रशासनाच्या समोर मांडली आहे. इतकेच काय! त्याचे पुरावे देखील सादर केले आहे. या व्यक्तीरिक्त देखील सबळ पुरावे असून प्रशासनाने फक्त सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

                              आता या प्रकरणात दोघांची चौकशी लागले, उद्या कारवाई होते ना होते. हा भाग पुढचा असेल. मात्र, अधिकार्‍यांच्या मर्जीने म्हणा किंवा त्यांच्या अपरोक्त आपल्या कार्यालयातील कर्मचारी काय करतात हे त्यांच्या लक्षात येणे गरजेचे आहे. हा श्रीरामपूर शाखेचा कर्मचारी आहे. असेच काही कर्मचारी संगमनेर शाखेत देखील असून साहेबांच्या नावाखाली काय करतात याची देखील माहिती त्यांनी घेणे गरजेचे आहे. अन्यथा, आपल्या नावाच्या सावलीखाली काळे धंदा राजरोस सुरू राहतील आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा मला यातले काहीच माहित नाही असेच म्हणण्याची नामुष्की ओढवली जाईल. तसेही संगमनेर विभागात पोलीस मार खातात, पोलीस गुटख्यांना सुरक्षित हद्दपार करुन देतात, बड्या-बड्या गुन्ह्यात बनावट आरोपी अटक करतात, अपघातात खोटे वाहन चालक दाखवतात असे असे अनेक कारनामे पहायला मिळत आहे. त्यात आता हा आणखी नवा कारणामा पाहयला मिळाला आहे. दुर्दैव असे की, पुर्वी हे प्रकार नेवासा, शेवगाव, पाथर्डी, पारनेर आणि श्रीगोंदा या हाद्दीत घडायचे. आता खुद्द सज्जन संगमनेर आणि महसुलमंत्र्यांच्या हाद्दीत हे पहावयास मिळत आहे. हे सर्व दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. आता फक्त कारवाई होते की नाही! आणि झाली तर कधी! हेच पाहणे महत्वाचे आहे.
                 
 दरम्यान एक वाळु तस्कारीचा गुन्हा घडला काय! तेथे अनेक कारनामे उघडे पडले. त्यात पोलिसांनी पाटलाग करणारे सोडून पहिला कॉट्रॅक्टर आणि अभियंताच आरोपी केला. तेथे कंपनीला वगळले गेले. कारण, ती बड्या नेत्याच्या पाहुण्याची आहेे. हे होते कोठे नाहीतर मयत विठ्ठल मुरलीधर बर्डे या तरुणाच्या घरी जाऊन गोरख जोंधळे व बळी शिंगोटे (रा. कोकणगाव, ता. संगमनेर) यांनी धिंगाणा घातला. की, आमचे नाव या अपघातात कोठे येऊ देऊ नका. अन्यथा ठार मारू.! त्यांच्यावर आश्वी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी दाखल होतेे कोठे नाहीतर अपघात झालेल्या तरुणाने घटनेचा उलगाडा केला. त्यानंतर मयत सय्यद यांच्या मामाने एलसीबी व श्रीरामपूर येथील कर्मचार्‍यांची नावे समोर आणली, हे सर्व सुरू असताना सोशल मीडियावर पोलिसांनी वाळु गाडीचा केलेला पाटलाग फिरू लागला. त्या पाठोपाठ एकलव्य आदिवासी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत पोलीस निरीक्षक यांनी निवेदन देत त्या दोन पोलिसांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करुन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. असे एक ना अनेक प्रकार एका अपघाताने समोर आले आहे. त्यामुळे आता फक्त पोलीस कागदावर काय घेतात हे पहाणे महत्वाचे आहे.