संगमनेर तालुक्यात पेमरेवाडी येथे नवा रुग्ण.! 110 बाधित तर 11 मयत.!


सार्वभौम (संगमनेर) : 
             आज २ जुलै रोजी नगर जिल्ह्यात तब्बल २१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यात, नगर मनपा हाद्दीत ०९, संगमनेर ०७, श्रीरामपूर ०२, राहाता, पारनेर आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी एका अशा  रुग्णाचा समावेश आहे. २१ जणांचा सामावेश आहे. यामुळे  जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३३ झाली आहे. दरम्यान त्यात आज आणखी १० बाधित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह मिळून आले. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढत आहे. ही जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आज जिल्ह्यातील २१ रुग्ण बरे झाले. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
       
     
दरम्यान, आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ०२, श्रीरामपूर ०५, संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी  येथे (वय ३५) वर्षीय तरुण मिळून आला आहे. तो यवतमाळ येथे विवाहसाठी गेला होता. दाढ बु. (राहाता) ०१, भिंगार येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६२ इतकी झाली आहे. आज बाधित आढळलेले सर्व रुग्ण हे यापूर्वीच्या बाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. आज जिल्ह्यातील ५७ व्यक्तींची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आली आहे तर सध्या एकूण नोंद रुग्ण संख्या ५१० इतकी झाली आहे.
         
 सध्या संगमनेर तालुक्यात शहरात 64 कोरोना बाधित असून त्यातील 60 जण मुळ रहिवासी आहेत. धांदफळ येथे 8 जण, निमोण 11, घुलेवाडी 2, केळेवाडी 1, निंबाळे 1, आश्वी बु 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 3, शेडगाव 3, पळसखेडे 3, जोर्वे 1, खळी 1, गुंजाळवाडी 1, कुरण 6, पिंपारणे 1, साकूर 1, पेमरेवाडी १ असा एकूण 110 रुग्ण संगमनेर तालुक्यात मिळून आले आहेत. यात 91 रुग्ण स्थानिक असून 15 रुग्ण बाहेरचे आहेत. 110  पैकी 89 रुग्ण बरे झालेले आहेत. तर 21 रूग्ण उपचार घेत आहेत आणि 11 जणांचा मृत्यू झाला आहे.