बाप रे! अकोल्यातील पेढेवाडीत महिलेला बांधून मारले! दोन गुन्हे दाखल, दिल्लीत तक्रार!


सार्वभौम (अकोले) : 
                       अकोले तालुक्यात पेढेवाडी येथे शेतातून रस्ता देण्याच्या कारणाहून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यातील शनिवार दि. 27 जून पासून येथे वादच वाद सुरू असून येथे एकटी माहिला पाहून तिला बांधून मारल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच काय! हा प्रकार घडल्यानंतर आरोपी यांनी आपण मारहाण केली आहे. त्यामुळे आम्हाला क्षमा करावी, आमच्यातील वाद आम्ही आपआपसात मिटवून घेणार आहोत असे लेखी दिले. तरी देखील हा वाद मिटालया तयार नाही. त्यामुळे याप्रकरणी एक एनसी व दोन गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यात आमदारांनी लक्ष घालून आणि तहसिलदारांनी निकाल देत आदेश देऊन देखील हा वाद मिटलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर तत्काळ पर्याय काढणे गरजेचे आहे. अन्यथा आज एका महिलेचे हातपाय बांधून मारण्याची मजल होतेे तर उद्या हत्या करण्याची मानसिकता का होऊ शकत नाही?
                       याबाबत सविस्तर माहिती अशी की, कांताबाई पाटील गोडे यांचा बाळु पांडे गोडे यांच्यासह अन्य व्यक्तींबरोबर जमिनीचा वाद आहे. याप्रकरणी सन 2018 पासून एकमेकांवर दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हे दाखल केलेले आहेत. मात्र, याचा उद्रेख शुक्रवार दि. 26 जून रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फार मोठा झाला. त्याचे झाले असे की, गोडे यांच्यात यापुर्वीच जमिनिच्या वाटण्या झालेल्या आहेत. मात्र, रस्त्याचा वाद आजही प्रलंबित आहे. त्याहून हा वाद महिलेला बांधून टाकण्यापर्यंत गेला आहे.
                       
 कांताबाई यांनी आपल्या शेतात सध्या सोयाबीन पेरलेली आहे. यातून त्यांच्या भायासह अन्य लोकांना रस्ता हवा आहे. ही महिला कडेने रस्ता देण्यास तयार आहे. मात्र, यांना कडेने काढण्यासाठी जास्त खर्च येतो. त्यामुळे हवा तर मधूनच असा त्यांचा अट्टहास असल्यामुळे ही महिला पिकातून रस्ता देण्यास तयार नाही. त्यामुळे गेली कित्तेक दिवस हा रस्ता आणि वाद प्रलंबित आहे. विशेष म्हणजे हा प्रश्न थेट आमदार महोदय डॉ. लहामटे यांच्याकडे गेला होता. त्यांनी कायदेशीर मार्ग सांगत तहसिलदार यांना हे प्रकरण निकाली काढण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने आदेश दिला की, हे शेतजमीन कांताबाई यांच्या मालकीची असून मधून रस्ता द्यायचा की नाही. हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. त्यामुळे, तेथे योग्य मार्ग निघाला नाही.
                       दरम्यान शुक्रवारी बाळु पांडू गाडे, काळु गणपत गोडे, यांनी कांताबाई यांच्या शेतात सोयाबीन पेरलेली असताना त्यात जेसीबी घालून रस्ता काढण्याचे काम सुरू केले. तेव्हा कांताबाई त्यास आडव्या गेल्या. बाळु पांडू गोडे, काळु गणपत गोडे, गणपत मधु गोडे, भागा धोंडू गोडे, पुजा गोडे व सत्यभामा गोेडे यांनी मध्ये येऊन कांताबाई यांना शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी कांताबाई यांना महिलांनी अक्षरश: ओढत नेत औताच्या फळीला बाधून टाकले. तसेच बेदम मारहाण करुन ते निघून गेला. हा सर्व प्रकार गावातील काही लोक पाहत होते. मात्र, या महिलेस सोडविण्याची कोणाची हिंमत झाली नाही. मात्र, यावेळी अनेकांचा मोबाईल चालु होते. त्यात या घटना कैद झाल्या आहेत.
                            दरम्यान हा प्रकार कांताबाई यांचे पती गावात गेले होते. त्यांना हा प्रकार एका व्यक्तीने जाऊन सांगितला असता त्यांनी घरी येऊन पत्नीच्या हातापायाला बांधलेली दोरी सोडून त्यांची सुटका केली. त्यानंतर दोघांनी थेट अकोले पोलीस ठाणे गाठले. कांताबाई यांच्या तक्रारीनुसार सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी रात्री ही महिला रक्तभंबाळ झालेली होती. या घटनेची माहिती दुसर्‍या दिवशी पोलीस ठाण्यात विचारली असता त्यांनी अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही असे सांगण्यात आले होते. दरम्यान या घटनेवर पडदा टाकण्यासाठी आरोपी यांनी एक तडजोड नामा तयार केला होता. की, जो काही प्रकार घडला तो आम्हाला मान्य आहे. आम्ही सामंजस्याने आमचा वाद मिटवत आहोत. मात्र, त्यानंतर पुन्हा वाद झाले. कांताबाई यांनी एक फिर्याद दिल्यानंतर त्यास प्रतिउत्तर म्हणून परस्पर विरोधी फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तर कांताबाई यांनी येथे महिला आयोगाचे दार ठोठावले असून त्यांनी सोमवारी आपला अर्ज दिल्ली दरबारी जमा केला आहे. त्यामुळे, पोलिसांना या प्रकरणात कठोर कारवाई करणे किंवा सामोपचाराने हे प्रकरण तत्काळ निकाली काढावे लागणार आहे.
                   
  यात पुजा गणपत गोडे यांनी म्हटले आहे की, माझी चुलत सासू सत्यभामा बाळु गोडे या सोमवार दि. 1 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नविन बनविलेल्या रस्त्याने जात होत्या. त्यावेळी आरोपी पाटील पांडू गोडे, कांताबा पाटील गोडे, मारुती पोपट तळपे व लहू रघुनाथ तळपे (रा. सांगवी, दगडवाडी, ता. अकोले) यांनी त्यांचा रस्ता अडविला व हा जाण्या येण्याचा रस्ता नाही असे म्हणत शिवीगाळ दमदाटी करीत लाकडी दंड्याने पाय झोडले व पाठीवर मारहाण केली. जर तुम्ही या रस्त्याने आलात तर ठार मारू असा दम दिला. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.