बाबो.! राजुरच्या शुक्ला गँगनंतर अकोल्यातील कोतुळची खरात गँग दिड वर्षे चार जिल्ह्यातून हाद्दपार!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील पोलिसांच्या रडारवर असणारी टोळी जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी हद्दपार केली आहे. यात तिघांचा सामावेश असून टोळीप्रमुख मोहन सखाराम खरात (वय 26), गुलाब भिकाजी खरात (38), अमोल भिकाजी खरात (वय 33) तिघे रा. कोतुळ यांना नगर जिल्ह्यासह नाशिक, सिन्नर, इगतपुरी, पुणे जिल्ह्यातील जुन्नर, ठाणे जिल्ह्यातील शहापूर अशा चार जिल्ह्यातून हद्दपार केल्याने पोलीस अधिक्षकांनी अकोले तालुक्यातील गुन्हेगारांना हा सर्वात मोठा धक्का दिला आहे. यापुर्वी राजूूर येथील शुक्ला गँगला तडीपार करण्यात आलेले आहे. तर आता पुन्हा अकोले तालुक्यातील कोतुळच्या तिघांना एक ते दिड वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या कित्तेक वर्षापासून कोतुळ परिसरात खरात ही टोळी दहशत माजवित होती. त्यामुळे त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी निर्माण करुन दहशत माजविणे, लोकांना मारहाण करणे, लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, मारामारी करुन दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करणे, दगडफेक करून दुखातप करणे, अशी गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले होते. त्यामुळे सन 19 मार्च 2019 रोजी अकोले पोलीस निरीक्षक यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर त्याचा पाठपुरावा पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे तसेच पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी करुन त्यावर पोलीस अधिक्षकांनी तत्काळ सुनावणी घेतली. तसेच आ. किरण लहामटे यांनी देखील अशा प्रकरणात पाठपुरावा केला होता. त्यामुळे शुक्ला गँगनंतर आता कोतुळची खरात गँग चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात अवैध धंद्यावाल्यांचे मोठे धाबे दणाणले आहेत.
आता पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी पुन्हा काही प्रस्तावांसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे शेंडीतील काही अवैध दारू विक्रेते आणि राजूर येथील काही टोळ्या त्यांच्या रडारवर आहेत. त्यामुळे त्यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या धंद्यांवर छापे टाकून त्यांच्या जिल्हा निर्यातीचे बांधकाम सुरू केले आहेत. तर अशा पद्धतीने अकोले व राजूर येथे वाळुतस्कारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळणे आवश्यक आहे. इतकेच काय! तत्काली पोलीस उपाधिक्षक थोरात यांनी यासाठी मोठा पुढाकार घेतला होता. अशा पद्धतीने रोशन पंडीत व अप्पर पोेलीस अधिक्षक यांनी देखील तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना देणे आवश्यक आहेे. मात्र, अकोले आणि राजूर अशा दोन्ही तालुक्यात दवाखाने आणि मेडीकल अशा अत्यावश्यक सेवा बंद असून दारु आणि मटका हे तेजीत सुरू असल्याचे दिसते आहे.दरम्यान अकोले तालुक्यातील कोतुळ येथे मोहन सखाराम खरात व गुलाब भिकाजी खरात यांना यास दिड वर्षासाठी तर अमोल भिकाजी खरात यास एक वर्षासाठी नगर जिल्ह्यासह नाशिक, सिन्नर, इगतपुरी, पुणे जिल्ह्यातील जुन्नर, ठाणे जिल्ह्यातील शहापूर अशा चार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तर यापुर्वी अकोले तालुक्यातील राजूर येथे तीन जणांना नगर जिल्ह्यासह तीन ते चार जिल्ह्यातून हाद्दपार करण्यात आले आहे. यात संजय अदालतनाथ शुक्ला (वय 30), राहुल अदालतनाथ शुक्ला (वय 25), विनाय अदालतनाथ शुक्ला (वय 23, सर्व रा. राजूर ता. अकोले) अशा तिघांना नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
- सागर शिंदे
--------------------------------------
आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 70 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 365 दिवसात 593 लेखांचे 70 लाख वाचक)============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------