अकोले तालुक्यातील देवठाण येथे एक महिला कोरोना पॉझिटीव्ह.! बाकी रिपोर्ट निगेटीव्ह.!
सार्वभौम (अकोले) :-
तालुक्यात देवठाण येथे कोरोणाची एक 80 वर्षीय महिला मिळून आली आहे. ही महिला कोरोना बिधित व्यक्तीच्या संपर्कात असल्यामुळे तिला कोरोना झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे, देवठाणची डोकेदुखी वाढली असून प्रशासन देखील सज्ज झाले आहे. अकोले तालुक्यात सध्या कोरोनाचा प्रदुर्भाव लक्षात घेता तो वाढत असला तरी बहुतांशी पॉझिटीव्ह लोकांची रिकवरी चांगली आहे. त्यामुळे, तहसिलदार कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गंभीरे, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल व पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यात हळूहळू का होईना कोरोनाने अर्धशतकी वाटचाल केली आहे. ब्राम्हणवाडा व पिंपळगाव खांड वगळता अकोल्यात कोरोनाचा कोठेही अतिरेख नाही. तर या ठिकाणचे पाच आणि खांड येथील ७ तसेच अन्य ठिकाणच्या कोरोना बाधितांनी यशस्वी मात केली आहे. तर देवठाणच्या जवळच पिंपळगाव निपाणी येथील कांदा व्यापारीयांचा देखील रिपोर्ट निगेटीव्ह आलेला आहे. त्यामुळे, अकोल्यात अॅक्टीव कोरोनाची संख्या अगदी बोटावर मोजण्याईतकी आहे.
दरम्यान अकोले तालुक्यातील शहरात कोरोनाचा रुग्ण मिळून आल्यामुळे अकोले शहर सोमवार पर्यंत बंद करण्यात आले आहे. त्यामुळे, येथील बाधितांची साखळी तुटण्यास मदत होणार आहे. मात्र, जो व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आला होता त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून त्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहेत. आता देवठाण येथील महिलेचा रिपोर्ट आल्यानंतर तहसिलदार यांनी विशेष बैठक बोलावून काही सुचना केल्या आहेत. त्यानंतर ज्या भागात ही व्यक्ती बाधित मिळून आली आहे तो परिसर सील करून तेथे कंटेनमेंट झोन होऊ शकतो.या महिलेला बाधी कशी झाली. तर यांच्या घरातील एक व्यक्ती संगमनेर व मुंबई येथे लग्नाला जाऊन आले होते. तसेच संगमनेरला एक बस्ता बांधला होता. या दरम्यान यांना कोठेतरी बाधा झालेली आहे. तर यापुर्वी याच कुटुंबातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह मिळून आलेली आहे.
विशेष म्हणजे यापुर्वी देवठाण गाव बंद करण्यात आले होते. येथे कोरोनाचा प्रदुर्भाव होऊ नये यासाठी चांगली खबरदारी घेण्यात आली होती. यावेळी काही अंशी विरोध झाला. मात्र जितके बंदमुळे राजूर पेटले तितके देवठाण पेटले नाही. अर्थातच येथे मोठा समन्वय दिसून आला. आता जी पॉझिटीव्ह मिळून आले आहेत त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे.
दरम्यान देवठाण येथे दोन रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह मिळून आलेले असताना देखील तेथे सरकारी व सामाजिक नियम शेताच्या बांधावर बसविल्याचे दिसून आले. आजच तेथे कोरोना बाधित महिला मिळून आली तरी देखील येथे युरीया घेण्यासाठी फार मोठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून आले. यावेळी शेतकार्यांनी दुकानांच्या बाहेर गर्दीच गर्दी केली होती. मात्र, जेव्हा कृषी अधिकारी आल्यानंतर या प्रश्नावर उत्तर निघाले आणि नंतर गर्दी पांगली गेली. खरंतर अशा प्रकारे गर्दी करणे हे देवठाणकरांनी न परवडणारे आहे. कारण, जर या गर्दीच्या नादात कोणाला कोरोनाचा प्रदुर्भाव झाला तर याचे परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊन सर्वांना भोगावे लागतील. त्यामुळे शासन व प्रशासनाने देखील शेतकर्यांचा अंत पाहू नये. ज्या वस्तु कमी आहेत. त्यांचा तत्काळ पुरवठा केला पाहिजे. कारण काल अकोले बंद असून देखील युरीया घेण्यासाठी केवढी मोठी झुंबड उडाल्याचे आपल्याला पहायला मिळाले. हे तालुक्याला कोरोनाच्या दिशेने घेऊन जात तर नाही ना? याचा विचार करणे गरजेचे आहे.
दिनांक: १५ जुलै, रात्री 8 वाजता
*जिल्ह्यात आज वाढले ४८ नवे रुग्ण*
*६२ जणांची कोरोनावर मात*
*२०० व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह*
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ०७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३६७ इतकी झाली आहे तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ७२७ इतकी झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार, कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील ०५, संगमनेर ३१, अकोले ०५, अशा रुग्णाचा समावेश आहे.
संगमनेर तालुक्यात निमोन ०३, कासार दुमाला ०२, गुंजाळ वाडी ०२, माहुली ०८, तळेगाव दिघे ०१, वडगाव ०१, संगमनेर शहरातील १३ जण बाधित आढळून आले आहेत.
अकोले तालुक्यात देवठाण ०१, उंचखडक ०१, चास 0४ असे रुग्ण आढळून आले आहेत. तर अहमदनगर महापालिका क्षेत्रात ०५ जण बाधित आढळून आले आहेत. खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर मनपा ०१, राहाता ०१ आणि संगमनेर तालुक्यातील ०५ जणांचा समावेश आहे.
उपचार सुरू असलेले रुग्ण:३६७*
*बरे झालेले रुग्ण: ७२७*
*मृत्यू: ३०*
*एकूण रुग्ण संख्या:११२४