आज दिवसभरात पाच रुग्णांची भर! आता तत्काळ रिपोर्ट मिळणार!
- आकाश देशमुख
सार्वभौम (अकोले) :-
संगमनेर शहरात आणि तालुक्यात कोरोनाचा कहर थांबता-थांबत नाही. रोजची आकडेवारी लक्षात घेता ती दोन अंकी संख्येने वाढत आहे. त्यामुळे, एकीकडे प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. तर दुसरीकडे नगरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. याचे कारण असे की, सरकार शहरे लॉकडाऊन करायला तयार नाही, त्यामुळे व्यापारी बाजारपेठा बंद करायला तयार नाहीत. या सर्व प्रक्रियेमुळे मजूर आणि कामगार यांना कामावर जाण्यासाठी घराच्या बाहेर पडणे अनिवार्य झाले आहे. तर या सर्व प्रक्रियेत बाजारपेठा सुरू असल्यामुळे ग्राहक आणि तालुक्यातील व्यक्तींची शहरात मोठी गर्दी दिसत आहे. तर काही शहरातील महाशय हकनाक बाजारपेठा पायाखाली तुडविताना दिसत आहे. तर काही व्यापारी दुकानात सॅनिटायझर ठेवत नाहीत, तोंडाला मास्क लावत नाहीत, ग्राहकांना तशा प्रकारच्या सुचना देत नाहीत, यामुळेच शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे.
तर जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळपासून आज सायंकाळी 06 वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 17 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 302 इतकी झाली आहे. तर एकूण रुग्ण संख्या 2 हजार 788 इतकी झाली आहे. आज 53 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 436 इतकी झाली आहे. दरम्यान, आता, जिल्हा रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढणार आहे. सध्या असलेली प्रतिदिन 300 चाचण्यांची क्षमता आता प्रतिदिन 1 हजार अशी होणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे एक्स्ट्रॅक्टर उपलब्ध झाले असून सोमवार पासून अधिक चाचण्या होऊ शकणार आहेत. याशिवाय, जिल्ह्यासाठी 50 हजार अँटीजेन किटसची मागणी करण्यात आली आहे. ते लवकरच प्राप्त होत असून मोठ्या प्रमाणात चाचण्या घेता येणार आहेत.

आज जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमधून संगमनेर तालुक्याचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यात घुलेवाडी 01, जोर्वे 01, शहरातील अभंग मळा 01 आणि अशोक चौक येथील एक असे चार रुग्ण दुपारी मिळून आले होते. त्यानंतर ही संख्या येेथेच पुर्णविराम घेईल असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. आज शुक्रवार दि. 24 रोजी खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 10 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, श्रीरामपूर 01, संगमनेर 1 (खंडोबा गल्ली), मनपा 01, राहाता 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
तर जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळपासून आज सायंकाळी 06 वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 17 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 302 इतकी झाली आहे. तर एकूण रुग्ण संख्या 2 हजार 788 इतकी झाली आहे. आज 53 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 436 इतकी झाली आहे. दरम्यान, आता, जिल्हा रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढणार आहे. सध्या असलेली प्रतिदिन 300 चाचण्यांची क्षमता आता प्रतिदिन 1 हजार अशी होणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे एक्स्ट्रॅक्टर उपलब्ध झाले असून सोमवार पासून अधिक चाचण्या होऊ शकणार आहेत. याशिवाय, जिल्ह्यासाठी 50 हजार अँटीजेन किटसची मागणी करण्यात आली आहे. ते लवकरच प्राप्त होत असून मोठ्या प्रमाणात चाचण्या घेता येणार आहेत.
तर अकोले तालुक्यातील देवठाण येथे आजवर जे काही रुग्ण मिळून आले होते. ते सर्व ठिक झाले असून त्या घरात एकही रुग्ण पॉझिटीव्ह नाही. विशेष म्हणजे जे रुग्ण होते. ते त्या घरी पाहूणे होते. त्यामुळे त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना खानापूर येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. तर ते बरे झाल्यानंतर ते थेट आपापल्या गावी जाणार आहे. त्यामुळे देवठाण येथे आता कोणाही रूग्ण कोरोना बाधित नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी कोणताही गैरसमज किंवा भिती मनात बाळगू नये.तर आज अकोले तालुक्यातील 25 रिपोर्ट निगेटीव आले आहेत. ही तालुक्यासाठी फार आनंदाची बाब आहे. यात राजुरची कोरोना पॉझिटीव्ह महिला निगेटीव्ह मिळून आली आहे. तर लहित येथील महिलेचा रिपोर्ट देखील निगेटीव्ह आला आहेे. तर याच बरोबर उंचखडक बु येथे जे व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्यांचा रिपोर्ट आता निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना उद्या रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. तसेच देवठाण, बहिरवाडी, कारखाना रोड, लहित, राजूर येथील तब्बल 25 असे काही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने ही मोठी आनंदाची बातमी आहे.