बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, भांगरे व आ.लहामटे यांची रोजगार एमआयडीसी सुरू!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
आज कोरोनाचा काळ सुरू आहे, त्यामुळे खर्या अर्थाने समजले आहे की, अकोल्यातून किती लोक रोजगारासाठी तालुक्यातून बाहेर पडले आहेत. ही आकडेवारी पाहिली तर ३० हजार लोक तर २० हजार तरुण नोकरीच्या शोधात परजिल्ह्यात भटकत आहे. याचे कारण म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे लोटली, तरी देखील अकोल्यातील तरुण स्थिर होऊ शकला नाही. का? तर केवळ येथे शेती व्यवसाय सोडला तर दुसरे पोट भरण्याचे शाश्वत साधन नाही. गेल्या ४० वर्षापासून येथील एमआयडीसीचा प्रश्न प्रलंबित आहे. कारण येथे बाजारपेठा, भौतिक आणि दळणवळणाच्या सुविधांचा अभाव आहे. माजी मंत्र्यांपासून तर आजवर या प्रश्नावर मार्ग निघाला नाही. अर्थात या सुविधा भविष्यात होवो अगर ना होवो.! परंतु राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांचे उदयोन्मुख चिरंजीव अमित भांगरे व आ. किरण लहामटे यांनी एक जॉब फेअर आयोजित करुन तब्बल ६० तरुणांना पुण्यात नोकरी मिळवून दिली आहे. त्यामुळे, आम्ही तरुणांच्या हाताला रोजगार देऊ असा शब्द देणार्या राष्ट्रवादीने त्यांच्या रोजगाराची एमआडीसी सुरू केली असून ही एक सुरूवात आहे. उद्याच्या काळात खरोखर एमआडीसीचे बॉयलर अकोल्याच्या कुशीत पेटतील यात शंका नाही. मात्र, या कामामुळे बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले या म्हणीचा प्रत्येय राष्ट्रवादीकडून पहायला मिळाला आहे. तर अनेकांच्या आशा बळावल्या आहेत.
खरंतर तालुक्याने आता रटाळ आणि कुरघोडीचे राजकारण सोडले पाहिजे. याची आडवा आणि त्याची जिरवा यात तालुक्याचा तरुण गुरफटला गेला आहे. खरंतर अनेकांनी नेत्यांच्या मागे फिरून आपले आयुष्य बरबाद केले तर कोणी आत्महत्या केल्या. हे अकोल्याचेच नाही तर देशात अशी गलिच्छ परिस्थिती आजही पहायला मिळते. ज्याचा बाप पुढारी त्याचा पोरगा नेता आणि त्याच्या पाठीमागे भलीमोठी तरुणांची लुळकुंड. पैसा अडका, खाणे पिणे आणि मौजमजा यात तो मदमस्त असतो. इतकेच काय! तो देखील व्यसनाधीन होतो आणि कार्यकर्ता म्हणून त्याच्या पुढेमागे फिरणारे तरुण देखील नकळत व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे शेतकरी आई बाप लोकांच्या बांधावर काबाड कष्ट करुन मरतात आणि हा तरुण नेत्यांच्या मागे आपली तरुणाई खर्ची घालताना दिसतो. हेच चित्र राज्यभर पाहयला मिळते आहे. मात्र, या फाटक्या शेतकरी मायबापाच्या शिकलेल्या पोरानं दोन रुपये कमविणारी नोकरी करावी यासाठी कोणी नेता धडपड करताना दिसत नाही. पण. सुदैव या अकोल्याच्या मातीचे, की येथे अमित भांगरे यांच्यासारखे तरुण नेतृत्व उदयाला येत आहे. तुम्ही आमच्या मागे नकोत, तर पुढे चाला असे म्हणत अनेकांना सुटाबुटाची नोकरी देणारा हा तरुण कधी तुम्हाला तरुणांचा गोतावळा घेऊन बसलेला दिसनार नाही, गोवा, गुटख्याच्या पिचकार्या मारत बढाईच्या बाता मारताना दिसणार नाही, तर गोतावळ्यापेक्षा मेळावे घेऊन तरुणाईला जगण्याची दिशा दाखविणारा हा एक "दिपस्तंभ" ठरला आहे.
खरंतर जसे कोरोनाचे संकट उभे राहिले तेव्हापासून परप्रांतीय आणि भेकट लोकांनी आपल्या नोकर्या सोडल्या आहेत. जेव्हा मराठी मानसांच्या हाताला काम नाही असे म्हणून बोेंबलणार्या संघटना आणि काही पक्ष यांनी आता अशा प्रकारचे "जॉब फेअर" आयोजित करुन "मराठी" बांधवांच्या हाताला कामे दिली पाहिजे. मात्र, नाही.! यांना तरुणांचे राजकारण करायचे असते. त्यामुळे कोठेतरी टिमकी वाजवायची आणि गप्प बसायचे. याच कोरोनाच्या लॉकडाऊनचा फायदा घेत अकोल्यातील राष्ट्रवादीने हा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. आत आज 60 जणांच्या हाताला काम मिळाले, उद्या 6 हजार तरुणांना रोजगार मिळेल. या कामाची पुण्याई जेव्हा ही मुले तेथे स्टेबल होतील. तेव्हा त्यांचे कुटुंब तोंडभरून अमित भांगरे यांना "दादा" म्हणतील तेव्हा तो आनंद गगणात मावेनसा असेल. अन्यथा आजकाल मोठमोठ्या गाड्या फिरवाच्या, नको तशी व्यसने कारायची आणि चार चौघांनी व्हाटसॅअपवरुन बँनर टाकले की तो दादा होतो. त्यामुळेच तर अकोल्यातील तरुणाई वाह्यात गेली आहे. दादा हा कर्तुत्वाने कसा असावा याचे उत्तम उदा. अमित भांगरे यांनी दाखवून दिले आहे. अर्थातच हे सर्व उभे करताना अशोकराव भांगरे व डॉ. किरण लहामटे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तर ज्येष्ठ नेते संपत नाईकवाडी, प्रा. सुरेश खांडगे, सोन्याबापू वाकचौरे, संदीप शेणकर, सुरेश गडाख, चंद्रभान नवले, मिनानाथ पांडे, नगरसेविका स्वातीताई शेणकर, पाटीलबा सावंत, दत्ता धुमाळ, विकास बंगाळ, डॉ. रामहरी चौधरी, अमोल वाकचौरे यांनी या उपक्रमाचे साक्षिदार होऊन तरुणांना व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
मी एमआयडीसी सुरू करणारच

गेल्या कित्तेक वर्षापासून राजूर, लिंगदेव, अकोले अशा विविध ठिकाणी एमआयडीसीचा विचार करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, बाजारपेठा आणि दळणवळण यामुळे कोणतेच शहर आपल्याला जवळ दिसत नाही. मात्र, जर तोलारखिंड फुटली तर मुंबईचा कारोबार अकोल्यातील सह्याद्रीच्या पोटात जागा करुन उभा राहू शकतो. मात्र, हे असे असले तरी अशी अश्वासने पुढे येत राहतील मात्र, त्याचा नारळ फुटणे वाटते तितके सोपे नाही. अर्थात ती एमआयडीसी येवो ना येवो मात्र, येथील तरुणांंना रोजगार देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने पहिले पाऊल टाकले आहे. कारण, अमित भांगरे यांच्या पुढाकाराने आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशोक भांगरे व आ.डॉ. किरण लहामटे यांनी तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा वसा हाती घेतला आहे. तर यानंतर देखील तालुक्यातील चार ते पाच हजार तरुणांना पुण्यात चांगली नोकरी मिळेल यासाठी अशा प्रकारचे जॉब फेअर आयोजित करण्यात येणार आहे. असे मत अमित भांगरे यांनी सार्वभौमशी बोलताना व्यक्त केले.
खरंतर तालुक्याने आता रटाळ आणि कुरघोडीचे राजकारण सोडले पाहिजे. याची आडवा आणि त्याची जिरवा यात तालुक्याचा तरुण गुरफटला गेला आहे. खरंतर अनेकांनी नेत्यांच्या मागे फिरून आपले आयुष्य बरबाद केले तर कोणी आत्महत्या केल्या. हे अकोल्याचेच नाही तर देशात अशी गलिच्छ परिस्थिती आजही पहायला मिळते. ज्याचा बाप पुढारी त्याचा पोरगा नेता आणि त्याच्या पाठीमागे भलीमोठी तरुणांची लुळकुंड. पैसा अडका, खाणे पिणे आणि मौजमजा यात तो मदमस्त असतो. इतकेच काय! तो देखील व्यसनाधीन होतो आणि कार्यकर्ता म्हणून त्याच्या पुढेमागे फिरणारे तरुण देखील नकळत व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे शेतकरी आई बाप लोकांच्या बांधावर काबाड कष्ट करुन मरतात आणि हा तरुण नेत्यांच्या मागे आपली तरुणाई खर्ची घालताना दिसतो. हेच चित्र राज्यभर पाहयला मिळते आहे. मात्र, या फाटक्या शेतकरी मायबापाच्या शिकलेल्या पोरानं दोन रुपये कमविणारी नोकरी करावी यासाठी कोणी नेता धडपड करताना दिसत नाही. पण. सुदैव या अकोल्याच्या मातीचे, की येथे अमित भांगरे यांच्यासारखे तरुण नेतृत्व उदयाला येत आहे. तुम्ही आमच्या मागे नकोत, तर पुढे चाला असे म्हणत अनेकांना सुटाबुटाची नोकरी देणारा हा तरुण कधी तुम्हाला तरुणांचा गोतावळा घेऊन बसलेला दिसनार नाही, गोवा, गुटख्याच्या पिचकार्या मारत बढाईच्या बाता मारताना दिसणार नाही, तर गोतावळ्यापेक्षा मेळावे घेऊन तरुणाईला जगण्याची दिशा दाखविणारा हा एक "दिपस्तंभ" ठरला आहे.
खरंतर जसे कोरोनाचे संकट उभे राहिले तेव्हापासून परप्रांतीय आणि भेकट लोकांनी आपल्या नोकर्या सोडल्या आहेत. जेव्हा मराठी मानसांच्या हाताला काम नाही असे म्हणून बोेंबलणार्या संघटना आणि काही पक्ष यांनी आता अशा प्रकारचे "जॉब फेअर" आयोजित करुन "मराठी" बांधवांच्या हाताला कामे दिली पाहिजे. मात्र, नाही.! यांना तरुणांचे राजकारण करायचे असते. त्यामुळे कोठेतरी टिमकी वाजवायची आणि गप्प बसायचे. याच कोरोनाच्या लॉकडाऊनचा फायदा घेत अकोल्यातील राष्ट्रवादीने हा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. आत आज 60 जणांच्या हाताला काम मिळाले, उद्या 6 हजार तरुणांना रोजगार मिळेल. या कामाची पुण्याई जेव्हा ही मुले तेथे स्टेबल होतील. तेव्हा त्यांचे कुटुंब तोंडभरून अमित भांगरे यांना "दादा" म्हणतील तेव्हा तो आनंद गगणात मावेनसा असेल. अन्यथा आजकाल मोठमोठ्या गाड्या फिरवाच्या, नको तशी व्यसने कारायची आणि चार चौघांनी व्हाटसॅअपवरुन बँनर टाकले की तो दादा होतो. त्यामुळेच तर अकोल्यातील तरुणाई वाह्यात गेली आहे. दादा हा कर्तुत्वाने कसा असावा याचे उत्तम उदा. अमित भांगरे यांनी दाखवून दिले आहे. अर्थातच हे सर्व उभे करताना अशोकराव भांगरे व डॉ. किरण लहामटे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तर ज्येष्ठ नेते संपत नाईकवाडी, प्रा. सुरेश खांडगे, सोन्याबापू वाकचौरे, संदीप शेणकर, सुरेश गडाख, चंद्रभान नवले, मिनानाथ पांडे, नगरसेविका स्वातीताई शेणकर, पाटीलबा सावंत, दत्ता धुमाळ, विकास बंगाळ, डॉ. रामहरी चौधरी, अमोल वाकचौरे यांनी या उपक्रमाचे साक्षिदार होऊन तरुणांना व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
मी एमआयडीसी सुरू करणारच
हा तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा एक चांगला उपक्रम होता. तो यशस्वी झाला आहे. मात्र, माझा तालुक्यातील तरुणांना शब्द आहे. की, येणार्या काळात मी अकोले तालुक्यात एमआयडीसी सुरू करणार म्हणजे करणारच यात काहीच शंका नाही. मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर काम सुरू आहे. तरुणांसाठी आपण एमआयडीसी आणून त्यांना रोजगार देणार आहोत.- आ. डॉ. किरण लहामटे
राष्ट्रवादी पक्षाने तसेच आमदार आणि भांगरे कुटुंबाने आम्हाला जी काही संधी दिली आहे. ती आमच्यासाठी फार मोलाची आहे. या संधीचे आम्ही सोने करुन नक्की स्वत:च्या पायावर उभे राहु. आज अमित भांगरे यांनी जे काम केले आहे. त्यांची फार गरज होती. कारण, घरी शेती कमी आहे, बहिनीचे लग्न करायचे आहे. बाबांवर पतसंस्थेचे कर्ज आहे. त्यात आजीचा दवाखाना सुरू आहे. इतक्या कटू प्रसंगात कोरोना येऊन दारात उभा राहिला आहे. तुम्हीच सांगा. यातून कसे सावरायचे. का शेतकरी आत्महत्या करणार नाही. पण, मला खात्री आहे. मी आता माझ्या कुटुंबाला फार चांगला आधार देऊ शकतो. मला नोकरीची फार गरज होती. सर्वांचे हात जोडून आभार मानतो. आता आयुष्यात काहीतरी करुन दाखवेल तेव्हा माझे नाव मी जनतेसमोर आणेल.
आपला अकोलेकर....चांगला प्रतिसाद मिळला
अकोले तालुक्यात तरुणांमध्ये उतुंग भरारी घेण्याची जिद्द आहे. येथील तरुण अभ्यासक व संशोधक आणि न्यायासाठी धडपडणारा आहे. मात्र, त्यांना योग्यवेळी योग्य "मार्गदर्शन" मिळत नाही. "प्लॅटफॉर्म" मिळत नाही. त्यामुळे तो खचून जातो. एकदा शहरात गेल्यानंतर जगाचे ज्ञान होते आणि तो नंतर स्वयंभू होतो. त्यामुळे मी हा एक प्रयत्न केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळला आहे. तरुणांच्या हाताला कामधंदा मिळावा, त्यांचे कुटुंब आणि वैयक्तीक आयुष्य समाधानाने जावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.- अमित भांगरे (युवा उद्योजक)
- सागर शिंदे
--------------------------------------
आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 75 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 75 लाख वाचक)============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------