महसूल मंत्र्यांचे गाव पुन्हा कोरोनाग्रस्त.! संगमनेरात चार रुग्ण.! संख्या ५०० च्या जवळ.!
सार्वभौम (संगमनेर) :-
नगर जिल्ह्यात आज ५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४३६ इतकी झाली आहे. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार २८७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २ हजार ७७५ इतकी झाली आहे. यात आज शुक्रवार दि. २४ जुलै रोजी संगमनेर तालुक्यातील चार रुग्णांची भर पडली आहे. यात घुलेवाडी ०१, जोर्वे ०१, शहरातील अभंग मळा ०१ आणि अशोक चौक येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
संगमनेरात आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नव्याने काहीतरी उपायोजना आखणे गरजेचे आहे. अवघ्या चार महिन्यात ४८३ रुग्ण येथे बाधित असल्याची आकडेवारी समोर आली आहे. एक विशेष बाब म्हणजे संगमनेरात आता सरकारी सनदी अधिकारी, तलाठी, कर्मचारी, नगरसेवक, पदाधिकारी या प्रत्येकांचे कुटुंब हे सर्व असुरक्षित आहे. इतकेच काय.! खुद्द राज्याचे महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या टेलिफोन पर्यंत कोरोना जाऊन पोहचला आहे. संगमनेरात शहरच काय.! साहेबांचे गाव सुद्धा वारंवार कोरोना बाधित होत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे, आता तरी साहेबांनी येथे ठोस भुमिका घेण्याची गरज आहे. त्यासाठी स्वॅब वाढविणे, येथे आणखी मशिन उपलब्ध करणे, प्रशासनाला वाढीव मनुष्यबळाचा पुर्तता करणे, त्यांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी किट उपलब्ध करुन देणे. अशा सर्व भौतिक सुविधा पुरविणे गरजेचे आहे