अकोले तालुक्यात चक्क नवरा-नवरी क्वारंटाईन! मोठेपणाच्या नादात बेजबाबदारपणा नडला!


सार्वभौम (ब्राम्हणवाडा) :
                       अकोले तालुक्यातील जांभळे परिसरात चक्क नवरा-नवरीस क्वारंटाईन केल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. कारण, याच लग्नात मुंबईहून आलेला कोरोना बाधित तरुण व त्याची बहीन यांनी हजेरी लावली होती. आता या दोघांच्या संपर्कात आलेल्या आणखी दोन स्थानिक व्यक्तींना त्याची बाधा झाली असून हे त्याचे नातेवाईकच असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जोवर ही दोघे बाधित झाल्याचे माहित नव्हते तोवर नवरा नवरी यांना आरोग्य विभागाने कोणतीही सुचना केली नव्हती. मात्र, जेव्हा हे दोन रिपोर्ट प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर या चौघांनी फॉरेन रिटर्न युवकारच्या लग्नाला हजेरी लावली होती. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान प्रशासनाने काही लोक क्वारंटाईन केले होते. ते कोणाला न सांगताच मुंबईला पळून गेल्याचे बोलले जात आहे. हा फार धक्कादायक प्रकार असून प्रादुर्भावाची दक्षता म्हणून या घटनेची प्रशासनाने गांभिर्याने दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक व्यक्ती करु लागले आहेत. 
                 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फॉरेनचा एक तरुण गावी आल्यानंतर त्याने त्याच्याच परिसरातील एका तरुणीशी विवाह केला. भल्याभल्यांचेे विवाह अगदी साध्या पद्धतीने होतात. मात्र, येथे बँण्डबाजासह फेटेशाही करुन विवाह सोहळा पार पडला. या विवाहाला मुंबईच्या एका तरुणासह त्याच्या बहिनीने हजेरी लावली आणि त्यानंतर त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्यानंतर त्यांचे स्वॅब घेतले असता दोघेही कोरोना बाधित असल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रशासनाने 36 जणांना क्वारंटाईन केले होते. त्यापैकी काही काही स्वॅब घेऊन नगरला पाठविले असता त्यातील कोरोना बाधित यांच्या संपर्कातील दोन व्यक्ती आणखी पॅझिटीव्ह असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे या दोघांच्या संपर्कात आणखी दोन व्यक्ती आल्याचे लक्षात आले असून त्यांचे स्वॅब घेण्यासाठी त्यांना रुग्णालयात नेले आहे, दोन दिवसात त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
                               
दरम्यान नंतरच्या दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने नवरा-नवरी यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: लग्नात प्रत्येकजण नवरा-नवरीस भेटून जात असतो. त्यामुळे, सध्या या दोघांचे स्वॅब घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, यांचे रिपोर्टवर पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती स्थानिक आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. मात्र, हे असे असले तरी कोणी घाबरुन न जाता फक्त जे लोक लग्नात उपस्थित होते, त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, फार गावभर न फिरता स्वत:ला किमान 10 दिवस स्वयंप्रेरणेने होमक्वारंटाईन करून घ्यावे. कदाचित कोणाला बाधा झालीच असेल तर किमान त्याचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. आता या लग्नाला कोणकोण होते अशी विचारणा केली तर कोणी स्वत:हून पुढे येणार नाही. त्यामुळे, किमान एक दक्षता आणि स्वत:सह समाजाची काळजी म्हणून तरी संपर्कात आलेल्यांनी बाहेर पडू नये तसेच जर थोडाफार त्रास जाणवला तर तो लपवू नये. तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
खरंतर कोरोनाचे अनेकांनी भांडवल केले आहे. तर कोणाला आपल्या इमेजचे पडले आहे. मात्र, कोणी स्वत:हून नियम पाळायला तयार नाहीत. यापुर्वी याच परिसरातील एक वृत्त प्रसिद्ध झाले होते. तेव्हा पुढार्‍यांनी तेथील प्रतिनिधीस धमकाविले असून त्यावर अक्षेप घेतला होता. याप्रकरणी सात मोबाईल नंबरवर एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्रकार संरक्षण कायदा यानुसार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे नंबर कोणाचे आहेत. याचा शोध सुरू असून वरिष्ठ पातळीहून गुन्हा दाखल करण्याचे आदेश लवकरच प्राप्त होणार आहे.