नातवाच्या नऊ खांडोळ्या करुन पहिले शेततळ्यात तर नंतर नदीत फेकले! बापाच्या प्रेमापोटी लेक आयुष्यभरासाठी गुतला!

- सागर  शिंदे
सार्वभौम (राजूर) :
                     अकोले तालुक्यातील वाकी-चिचोंडी शिवारातील कृष्णावंती नदित एका 25 वर्ष तरुणाचे तुकडे-तुकडे केलेले प्रेत मिळून आले होते. त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली होती. हा अज्ञात तरुण ओळखायचा कसा येथून झालेली सुरूवात झाली तर यातील आरोपी कोण? असा मोठा प्रश्न उभा राहिला होता. मात्र, अवघ्या 24 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. जेव्हा आजोबानेच आपला नातु प्रदिप सुरेश भांगरे (वय 25, रा. खिरविरे, ता. अकोले) याची हत्या केली. हे समजल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. मात्र, इतकी निघृण हत्या का व कशी केली. हे आजोबा कमलाकर हनुमंत डगळे (वय 70, रा. खिरविरे) यांना सांगितले असता पोलिसांच्या अंगावर देखील काटा शहरला होता. याचे सविस्तर कथानक....
                      तो दिवस दि.27 जून 2020 चा होता. आपला आजोबा म्हणून त्याचा नातू त्याच्याकडे पैशाची मागणी करू लागला. माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणून कमलाकर याने शांत बसणे अपेक्षित होते. मात्र, जुनं ख्वाड असल्यामुळे त्याला नातवाकडून होणारा तगादा सहन झाला नाही. आजकाल आजी-आजोबा आणि नातू यांचे नाते जेव्हा आपण पाहतो तेव्हा अक्षरश: काळीज भरुन येते. मात्र, हा निष्ठूर काळजाच्या म्हातार्‍याला नातवाची दया आली नाही. दोघांमध्ये वयाचे अंतर होते. त्यामुळे भलेही विचार एक नसले तरी सामंजस्य आणि समझदारी अंगी बाळगली असती ती आज 25 वर्षाचा प्रदिप आपल्यामध्ये असता.
                   
त्या दिवशी सायंकाळी झाली होती. प्रदिप आपल्या आजोबाच्या घरी गेला आणि त्याच काळोख्या रात्रीचा फायदा घेत कमलाकर याने घरातील धारधार कोयता पहिला आपल्या नातवाच्या मानेवर फिरविला. त्याच्यावर इतका राग कसा झाला देव जाणे, मात्र, लेकीच्या लेकराच्या खांड्याळ्या कराव्या इतकी हिंमत या म्हातार्‍यात आली म्हणजे किती दगडाच्या काळजाचा हा निर्दयी म्हातारा म्हणायचा! त्याने नातवाला मारल्यानंतर त्याला कोठे ओढ्या नाल्याला नेवून फेकले असते तरी या घटनेचा इतका इशू झाला नसता. मात्र, त्याच्या देहाचे एक ना दोन तब्बल नऊ तुकडे केले. डोकं, पाय, हात, धड, कंबर अशा नऊ खांडोळ्या म्हणजे अंगावर शहारे आणणारी ही संकल्पना या बहादराने प्रत्यक्षात अनुभवली.
                      या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची म्हणून ते तुकडे गोणीत भरले आणि एकट्याने ते खांद्यावर टाकून आपल्या स्वत:च्या शेततळ्यावर नेले. एकामागे एक अशा दोन हाडामासांच्या गोण्या याने वाहील्या आणि त्यांना भलामोठा दगड बांधून त्या गोण्या शेततळ्यात फेकून दिल्या. आता, झाले गेले सब अलबेले असे समजून तो निवांत झोपी गेला. गेल्या दोनतीन दिवस तो रोज शेतात जाऊन त्या गोण्या वर येतात का हे पहात होता. पण, दुर्दैव त्याचे की, दि. 30 जून रोजी त्या गोण्या वर तरंगल्याने म्हातार्‍या कमलाकरला घाम फुटला. एकट्याला या गोण्या बाहेर काढून त्याचा ठिकाणा लावणे अशक्य वाटल्याने हा निर्दयी मानाने त्याचा पुणे तालुक्यातील यवत येथे राहणार्‍या मुलास बोलावून घेतले. म्हणजे याच्या कुकर्माची फळे नकळत त्याच्या मुलास भोगायला लागतील असे कोणाला वाटले नव्हते.

                     कमलाकर याचा मुलगा हरिचंद्र डगळे हा तत्काळ गावाकडे आला. त्यांनी त्याच दिवशी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेततळे गाठले. दोघांनी मिळून या मृतदेहाच्या गोण्या बाहेर काढल्या आणि एका दुचाकीवर ठेऊन थेट चिचोंडी परिसरातील कृष्णावंती नदीत ते फेकून दिले. तर मयत मुलाची गाडी बाभूळवंडी शिवारात रोडच्या कडेला एका झुडपात फेकून दिली. ही दोघे घरी आली आणि हरिचंद्र याने आपल्या बापाच्या प्रेमापोटी सगळा प्रकार पोटात घालून थेट पुन्हा दौंण्ड गाठले. मात्र, नाव हरिचंद्र मात्र या अधुनिक हरिचंद्रने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला असता तर किमान अवघ्या 35 वर्षीचे आयुष्य 70 वर्षाच्या निर्दयी बापासाठी व्यर्थ घालण्याची वेळ आली नसती. मात्र, संस्कारात भावनेला सत्यापेक्षा फार मोठे स्थान असते हे देखील यातून लक्षात आले आहे.
                       आत या गुन्ह्याची उकल करणे म्हणजे पोलिसांपुढे फार मोठे आव्हान होते. राजुरचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पहिले आपल्या हाद्दीतील मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात केली. अशा प्रकारचे गुन्हे कोण करु शकतो, आरोपींची मोडस ऑपरेंटीचा शोध सुरू केला. याचवेळी त्यांना खिरविरे आणि बाभूळवंडी येथील मिसिंगची माहिती मिळाली आणि अशक्य गुन्ह्याची उकल होण्यासाठी पहिले सुत त्यांच्या हाती लागले. त्यांचा तपास सुरू असताना नगरहून मोठा पोलीस फौजफाटा राजुरमध्ये दाखल झाला होता. त्यात पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्यासह अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील व पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्ह्याच्या तपासाला प्रचंड गती दिली. राजूर पोलीस, आणि एलसीबी पोलीस यांची समांतर तपास करीत एका सुताहून थेट स्वर्ग गाठला आणि एलसीबीने हरिचंद्रला यवत येथून अटक केली तर राजूर पोलिसांनी कमलाकर याला खिरविरे येथून अटक केली. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा तपास इतक्या मेट्रो वेगलाने लागावा ही खरोखर अहमदनगर पोलिसांच्या कर्तुत्वाची पावती म्हणावी लागेल. ही सर्व हकीकत कमलाकर याने वदली असून आता या गुन्ह्यात फार कठोर शिक्षा कशी होईल यासाठी सबळ पुरावे आणि सक्षम दोषारोपत्र तयार करण्यासाठी नितीन पाटील कामाला लागले आहे. या तपासामुळे अकोले व राजुरकरांनी पाटील यांना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या आहेत.
                 
  दरम्यान ही कारवाई उपरोक्त अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमने, पोलीस कर्मचारी गणेश इंगळे, नितीन खैरनार, श्री. नानेकर, संदिप पवार, रविंद्र कर्डीले, संतोष लोंढे, भागीनाथ पंचमुख, योगेश सातपुते, राहूल सोळुंके, दिपक शिंदे, मेघराज कोल्हे, रविंद्र घुंगासे, भरत बुधवंत, श्री. घाडगे, प्रकाश निमसे, किशोर तळपे, अशोक गाडे, दिलीप डगळे, राकेश मुलानी या राजूर व एलसीबीच्या कर्मचार्‍यांनी केली.
--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 61 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 64 लाख वाचक)