हा, हा, हा, त्या वाळुतस्काराने पोलिस पाहिले आणि गाडी सोडून तो शेतात पळाला! पुढच्याला ठेच मागचा शहाणा! आश्वीत गुन्हा!


सार्वभौम (संगमनेर) : 
                         पुढच्याला ठेच मागचा शहाणा असे म्हटले जाते. पण, संगमनेर तालुक्यात प्रत्येक गोष्टीला एका का होईना अपवाद ठरतोच की काय? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. कारण, आज आठ दिवस दिवसांपुर्वीच कोंची-मांची येथील तीन तरुण वाळुच्या गाडीखाली चेंबून मेले. त्यांनतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली, भल्याभल्यांवर आरोप-प्रत्यारोप झाले. आता त्यानंतर तरी वाळु तस्कारांना शहाणपण येईल असे वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. वाळुतस्करीचा कारणामा हा सुरूच राहिल्याचे दिसते आहे. आता यात पोलिसांचे हात गुंतल्यामुळे त्यांना शहाणपण आले खरे! मात्र, त्यांनी पाटलाग या शब्दाला त्यांच्या कृतीतून थेट वर्ज केले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील ओझर कोंची रोडवर एक वाळुची गाडी पोलिसांना दिसली आणि पोलीस गाडी पाहताच वाळु तस्कराने गाडी सोडून धुम ठोकली. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याची कोणताही प्रयत्न केला नाही. अर्थातच हिवरगाव पावसा परिसरात पाठलागामुळे तीन वाळुतस्करांचा जीव गेल्यानंतर अनेकांना फार छान-छान धडे घेतल्याचे दिसत आहे.

                     त्याचे झाले असे की, आश्वी पोलीस ठाण्याचे कर्मचारी शनिवार दि. 4 जुलै रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या हाद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी संगमनेर तालुक्यातील ओझर कोंची रोडवर ओझरकडे जाणार्‍या रोडवर त्यांना एका ओपन झेनॉन गाडी दिसली.  पोलिसांनी गाडी पाहिल्यानंतर आपली गाडी थांबविली असता समोर वाळुतस्कराने त्याची गाडी पळविण्यापेक्षा गाडीतून उतरून पळ काढणे सोईस्कर मानले. रात्रीच्या वेळी जर पळ काढून पाटलाग करण्याची वेळ निर्माण झाली तर पुन्हा वेग अनावर होऊन जीव जाण्यापेक्षा त्याने शेतात धुम ठेकणे पसंत केला. पोलीस त्याचा पाटलाग करतील या भितीपोटी तो बेभान होऊन पळत होता. पोलिसांनी निव्वळ आरडाओरड केली. मात्र, हाती लागेल तो तस्कार कसला?
                           दरम्यान पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता ती झेनॉन कार होती. तिचे हूड काडून वाळु वाहतूक करण्यासाठी तिचा वापर केला जात होता तर या वाहनाची नंबरप्लेट देखील काढून ठेेवण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी वाळुसह ही गाडी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून लावली आहे. यात तब्बल पाऊन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल अनिल काशिनाथ शेंगाळ यांच्या फियादीनुसार आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                 
    विशेष बाब म्हणजे, वाळुतस्करी, पोलिसांचा पाटलाग आणि पाटलाग अशा एकाच प्रकारात तीन मयत आणि एक जखमी होऊन देखील कोंची मांचीच्या वाळुतस्करांना पैशाचा मोह सुटेनासा झाला आहे. सर सलामत तो पगडी पचास! हे त्यांना कोणी समजून सांगावं. आपल्या गावातील अवघ्या तिशीतील तरुण क्षणात मयत झाले त्यामुळे, या अवैध व्यवसायापेक्षा कष्टाने दोन घास खावे हे समजून घेण्याचे ज्ञान त्यांच्याकडे नसावे हे फार मोठे दुर्दैव आहे. मात्र, काही ठारविक दलाल तेथे आहेत जे रोजगाराच्या नावाखाली गोरगरिब जनतेला मारणी घालतात. वेळ आली तर अ‍ॅट्रॉसिटीच्या शस्त्राचा गैरवापर करुन भल्या-भल्यांना गप्प बसण्यास भाग पाडतात. हे कोठेतरी थांबविण्यासाठी महसूल आणि पोलिसांनी मलिदे जमा करणे सोडून कायदेशीर कारवाई करणे आणि वाळुतस्कारांवर मोक्क्यासारखी संघटीत गुन्हेगारी हे शस्त्र उचलले तरच ही वाळुतस्कारी मोडीत निघू शकते असे अनेकांना वाटते आहे.
------------------------------------

ब्रेकींग...

संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा येथे कोरोना बाधित महिला (वय ४६) आढळली आहे. ही महिला एका बाधित व्यक्तीच्या संपर्कात आली होती. आत संगमनेरमध्ये एकूण 127 रुग्ण कोरोना बाधित असून 11 मयत झालेले आहे. तर आज सकाळी जिल्हा रूग्णालयातून संगमनेर, पारनेर यांच्यासह 15 जणांना बरे करुन घरी पाठविण्यात आले आहे. तर जिल्ह्यात 400 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून फक्त 162 रुग्ण उपचार घेत आहेत.
-------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 61 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 64 लाख वाचक)