अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोना झाला तर मग आपण कोण? त्यामुळे मिजास सोडा, घरी बसा!

                             
सार्वभौम (संगमनेर) : 
                      आयुष्यात जितके धडे कोरोनाने शिकविले आहेत तितके सामाजिक धडे कोणी शिकवू शकत नाही. भल्याभल्यांना जो पैशाचा मिजास होता तो त्याने उतरविला आहे, तर कोण आपलं कोण परकं हे सांगण्यासाठी ज्योतीष देखील घरात बसलेले असताना जो घराबाहेर पडेल त्याला कोरोनाने त्याचे भाकीत वर्तविले आहे. त्यामुळे, निसर्ग आणि आपत्ती हे असे दोनच व्यक्ती आहेत. जे देण्याघेण्यात आणि शिकविण्यात दुजाभाव करीत नाहीत. त्यातलाच हा एक कोरोना आहे. अगदी रस्त्यावर भिक मागणार्‍यापासून तर आज बिग-बी च्या घरापर्यंत कोरोनाने आपली माजल मारली आहे. त्यामुळे प्रत्येकाना फार बेजबादारपणे न वागता स्वत:च्या आणि कुटुंबाच्या काळजीसाठी स्वयंभू होणे गरजेचे आहे. इतकेच काय! बच्चन ते रेखा यांची लवस्टोरी गाजल्यानंतर आता कोरोनाने दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण, रेखा यांच्या बंगल्यावर असणार्‍या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याने त्यांची सुरक्षा बदलविण्यात आली असून ते क्षेत्र बांधिस्त केल्याचे सांगण्यात आले आहे. 

                           आज अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यास देखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. अर्थात अपल्यासारखे सामान्य मानसे तोंडाला रुमाल बांधतात आणि दिवसभर बोंबा मारत फिरतात. झाला तर पाहु, मला नाही होत, देव आपल्या पाठीशी आहे असल्या वाल्गना करीत नको तेथे भटकत असतो. अर्थात तरी देखील आपला शेतकरी, मजूर आणि दक्षता घेणारा प्रयत्येकजण सुरक्षित आहे. ज्या प्रमाणे हे सिने तारका स्वत:ची काळजी घेतात, आलिशान पद्धतीने जगतात, ज्या पद्धतीच्या भौतिक सुविधा वापरतात तरी त्यांच्यापर्यंत कोरोना जाऊन पोहचतो. तो हम किस झाड की पत्ती हैं! त्यामुळे बाहेर पडताना फार आवश्यक नसेल तर पहिले हे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि मागच घराच्या बाहेर पडा.
                           
खरंतर पुणे आता कंटेनमेंट केले आहे. मुंबईचा काही भाग कंटेनमेंट आहे. आपल्या नगर जिल्ह्यात देखील काही   भाग कोरोनाने अजेंड्यावर घेतल्यामुळे तो सील करण्यात आले आहेत. त्यात संगमनेर हे फारच हाताबाहेर चालल्याचे दिसते आहे. त्याला जबाबदार कोण आहे? लोकांना 100 जणांची लग्नाला परवानगी दिली आहे. मात्र, त्यांना मुंबई, पुणे, मालेगाव येथील नातेवाईक बोलविल्याशिवाय त्यांच्या मनाला शांती मिळत नाही. काल संगमनेरात एका लग्नात गेलेल्या सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या विवाह सोहळ्यांना तर अधिकार्‍यांनी देखील हजेरी लावली होती.  इतकेच काय? अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे एकाच दिवशी दोन विवाह सोहळे पार पडले. त्या लग्नांमध्ये मिरवलेल्या 7 जणांना आता कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. म्हणजे सामाजिक स्वास्थ आणि देशाच्या संरक्षणापेक्षा नातेवाईक किती महत्वाचे वाटतात हे त्यांनी दाखवून दिले आहे.
                        गेल्या काही दिवसांपुर्वी एका गायकाचे कोरोनामुळे निधन झाले, पैसा अमाप होता मात्र करणार काय? त्यामुळे कोरोनाला सहज घेऊ नका. खरंतर डॉक्टर, पोलीस, पत्रकार, सफाई कर्मचारी यांचे खरोखर आभार मानावे तिकके कमी आहे. ते खरे कोविड योद्धे आहेत. ते नाही तर फार काही गोष्टी अडून राहतील. मात्र, हे रिकामे योद्धे का रस्त्यावर भटकतात हे कळत नाही. यांना अजुनही काही गांभिर्य नाही. घरात वृद्ध व्यक्ती, महिला, बालके असतात याची देखील त्यांना काळजी वाटत नाही.  कोरोनाने भलेभले थप्पीला पाडले आहेत हे नागरिकांना कळायला तयार नाही. आज सरकार बहुतांशी नियम शिथिल करीत आहे. त्यांना रिव्हेन्यु उभा करायचा आहे. देश चालवायचा आहे. सरकार चालवायचे आहे. त्यामुळे,  त्यांना सुरक्षेपेक्षा जास्त अर्थव्यवस्थेचे पडले आहे. मात्र, आपण त्यांनी दिलेल्या शिथीलतेचा फायदा घेण्यासाठी असुसलेले असतो. हे कोठेतरी चूक वाटते आहे. त्यामुळे, विनाकारण रोगाला निमंत्रण देऊ नका हीच विनंती आहे.
                        दरम्यान नगर शहरातील गंजबाजार येथील एका 35 वर्षीय तरुण व्यापार्‍याला कोरोनाची बाधा झाली होती. त्याचा आज दुर्दैवी अंत झाला आहे. यांचे शहरात किराणा मालाचे मोठे दुकान होते. कोणत्यातरी कोराना बाधित व्यक्तीच्या सानिध्यात आल्यामुळे या व्यापार्‍यास कोेरोनाची बाधा झाली होती. तिसर्‍या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तर आज 1 वाजता काही अहवाल प्रशासनाने घोषित केले आहे. त्यात शहरात 25 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यात संगमनेर तालुक्यातील एक व नेवासा तालुक्यातील एक आहे. त्यामुळे एकाच दिवशी 90 बाधित तर 62 रुग्ण केवळ एकट्या नगर शहरात असून एकूण संख्या 934 वर गेली आहे. तर 21 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे. 
=========================

 भा


प्रिय वाचकहो.! आज सार्वभौम या पोर्टलाचा वर्धापनदिन आहे. गेल्या एक वर्षात राजकीय विश्लेषण, क्राईम स्टेरी, सामाजिक, आर्थिक व भौगोलीक   घडामोडींवर आपण 593 लेख लिहिले आहेत. त्यास उदंड प्रतिसाद देत आजवर त्याचे 69 लाख 35 हजार 425 वाचक झाले आहेत. खरंतर आज 12/7 तारीख आहे. त्यामुळे, कोणाच्याही आर्थिक व राजकीय दबावाला बळी न पडता अनेकांचा 7/12 आपण उघडा पाडला, गेल्या वर्षभरात कोणाला न्याय दिला तर कोणाची मने दुखावली असतील त्याबद्दल दिलगिरी.! पण निर्भिड व निष्पक्ष पत्रकारीता म्हणजे काय! हे तुमच्याकडे पाहून कळते. या शब्दांचे मानकरी आम्ही ठरलो हीच या पोर्टलची मिळकत आहे. बातम्या करणे हा माझा हातखंडा असला तरी माझ्या सह्याद्रीसारख्या प्रतिनिधींचे त्यात फार अनमोल योगदान आहे. तर जे ज्ञात अज्ञात मित्र, हितचिंतक ही बातमी शेअर करतात ते देखील या यशाचे शिल्पकार आहेत. या सर्वांचे मी मन:पुर्वक आभार मानतो!
संपादक
- सागर शिंदे 
--------------------------------------
 आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 70 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 400 दिवसात 460 लेखांचे 68 लाख वाचक)