नामदारांच्या नात्यात कोरोनाचा रुग्ण! हॉटेल चालकालाही बाधा! संगमनेरात लग्न नडलं सहा बाधित!


 संगमनेर (सार्वभौम) :
                         संगमनेर शहरासह तालुक्यात आज पुन्हा 16 रुग्ण मिळून आले आहेत. यात पंजाबी कॉलनी येथे 63 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरूष, 58 वर्षीय पुरूष, 48 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुणी अशा पाच जणांचा सामावेश आहे. तर खांडगाव येथे 18 वर्षीय तरुणाचा सामावेश असून नान्नझ येथे 46 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरूषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच नवघर गल्ली येथे 60 वर्षीय पुरूष त संगमनेर तालुक्यातील चिखली येथे 38 वर्षीय महिला देखील कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हे रिपोर्ट जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झाले आहेत. तर या व्यतिरिक्त संगमनेरात खाजगी रुग्णालयात पाच स्वॅब पाझिटीव्ह आले असून त्यात विठ्ठलनगर गुंजाळवाडी येथे 40 वर्षीय पुरुष, घुलेवाडी समनापूूर रोड बिरोबा मंदीर या परिसरात 36 वर्षीय तरुण तर महानुभव मळा निमोण येथे एका 50 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्याच बरोबर भारत नगर मालदड रोड परिसरात 52 वर्षीय पुरूष तर एकता चौक संगमनेर येथे 49 वर्षीय पुरूषास कोरोनाची बाधा झाली असून आता संगमनेरात एकूण संख्या 223 वर पोहचली आहे. तर 13 जणांना कोरोनाने आपले प्राण गामवावे लागले आहेत.
                               
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल काल कोरोनाने तालुक्यात थैमान घातले होते. संगमनेरात कोरोनाचे द्विशतक झाल्यानंतर देखील त्याची घोडदौड सुरूच आहे. पंजाबी कॉलनी येथे एकाच कुटूंबातील चार जणांना कोरोनाची बाधा झाली असून तेथे आणखी काही व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. इतकेच काय! संगमनेरात हॉटले चालकांना फक्त पार्सलसाठी परवानगी देण्यात आली असून रोजरोज हॉटेल्स सुरू असल्याचे दिसते आहे. त्यामुळे शहरात एका हॉटेल चालकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खाण्यासाठी ज्यांचे तोंड सळसळ करते आहे त्यांच्यासाठी ही धोक्याची सुचना असून पैशाच्या हव्यासापोटी हॉटेलात गर्दी स्विकारणार्‍या हॉटेल चालकांवर देखील ही मोठी चपराख बसली आहे.
                        आता एक गोष्ट तुम्हाला आश्चर्याची वाटे की एका संगमनेर शहरात नामदारांच्या एका जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, शहरात एकच खळबळ उडाली आहे. या साहेबांनी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यानंतर आज त्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. हा रिपोर्ट कळताच अधिकार्‍यांनी आणि स्थानिक व्यक्तीनी फार खबरदारी घेणे सुरू  केले आहे.
                    याहूुन महत्वाचे म्हणजे या 16 रिपोर्टपैकी एक धक्कादायक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपुर्वी संगमनेर शहरातील एक बड्या व्यक्तीच्या घरात लग्नसमारंभ होता. त्याला शहर आणि तालुक्यातील बड्या-बड्या नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी हजेरी लावली होती. आत एका लग्नातील तब्बल सहा जणांना कोरोनीची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, संगमनेरात केवळ प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही. तर येथील नागरिक आणि पुढारी तसेच काही प्रशासकीय अधिकारी देखील तितकेच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. अशा बेजबाबदार व्यक्तींमळे  संगमनेरात कोरोनाचा आलेख वाढता असून तो अगदी एकही दिवस कमी होताना दिसत नाही. हा सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. तर अकोले तालुक्यात अद्याप एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. काही अहवाल निगेटीव्ह आले असून काही रिपोर्ट उद्या प्राप्त होणार आहे.
====================

 भा


प्रिय वाचकहो.! उद्या दै. रोखठोक सार्वभौम या पोर्टलाचा वर्धापनदिन आहे. गेल्या एक वर्षात राजकीय विश्लेषण, क्राईम स्टेरी, सामाजिक, आर्थिक व भौगोलीक   घडामोडींवर आपण 592 लेख लिहिले आहेत. त्यास उदंड प्रतिसाद देत आजवर त्याचे 69 लाख 34 हजार 964 वाचक झाले आहेत. खरंतर उद्या 12/7 तारीख आहे. त्यामुळे, कोणाच्याही आर्थिक व राजकीय दबावाला बळी न पडता अनेकांचा 7/12 आपण उघडा पाडला, गेल्या वर्षभरात कोणाला न्याय दिला तर कोणाची मने दुखावली असतील त्याबद्दल दिलगिरी.! पण निर्भिड व निष्पक्ष पत्रकारीता म्हणजे काय! हे तुमच्याकडे पाहून कळते. या शब्दांचे मानकरी आम्ही ठरलो हीच या पोर्टलची मिळकत आहे. बातम्या करणे हा माझा हातखंडा असला तरी माझ्या सह्याद्रीसारख्या प्रतिनिधींचे त्यात फार अनमोल योगदान आहे. तर जे ज्ञात अज्ञात मित्र, हितचिंतक ही बातमी शेअर करतात ते देखील या यशाचे शिल्पकार आहेत. या सर्वांचे मी मन:पुर्वक आभार मानतो!
संपादक
- सागर शिंदे 
--------------------------------------
 आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 68 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 365 दिवसात 593 लेखांचे 69 लाख वाचक)