संगमनेच्या कुरणमध्ये ग्रामसेवकाला मारहाण, पोलिसांशी हुज्जत! तिघांना अटक, पोलिसांच्या गाडीतून एकास पळवून नेले!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर शहराच्या जवळ कुरण येथे संशयितांना क्वारंटाईन करण्याहून ग्रामसेवक आणि मुंबईहून आलेल्या काही व्यक्तींमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. 3 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. ग्रामसेवक गंगाधर चंद्रभान राऊत यांना धक्काबुक्की व मारहाण झाल्यानंतर त्यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फोन केला असता पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी तात्काळ कुरण येथे धाव घेतली. तेव्हा पोलिसांच्या देखत पुन्हा एकदा धक्काबुक्की झाली. मात्र, जेव्हा पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले तेव्हा जमाव आक्रमक झाला व त्यांनी पोलीस व ग्रामसेवक यांच्याशी धिटाई केली. इतकेच काय! यावेळी पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले होते. त्यांना जमावाने गाडीतून ओढून पळवून नेले. मात्र, तरी पोलिसांनी तिघांना अटक केली असून याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाकीर समशेर शेख, जहागीर शामीर शेख, जमशेद शामीर शेख, शादाब जाकीर शेख, अर्सलान जाकीर शेख, शाहीन जाकीर शेख, यासीन समशेर शेख, वसीम समशेर शेख, कय्युम महम्मद हुसेन शेख (सर्व रा. कुरण) यांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबात सविस्तर माहिती अशी की, गांगाधर राऊत हे कुरण येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. त्यांचे तेथे उत्तम काम असून एक कोविड योद्धे म्हणून त्यांनी मोठी कठीण परिस्थितीत कुरणमध्ये कोरोना ग्रामसुरक्षा समितीचे सचिव म्हणून काम केले आहे. राज्यात मुंबई, मालेगाव, पुणे, नाशिक आणि संगमनेर शहरात कोरोनाने हैदोस घातला असून कुरण हे हिटलीस्टवर असताना देखील तेथे लवकर कोरोना बाधित व्यक्ती मिळून आला नव्हता. तेथील लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी कोरोनाला प्रतिबंध केला. मात्र, काही व्यक्तींमुळे तेथील कायदा व सुव्यवस्था बिघाडल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान गुरूवार दि.11 जून रोजी कुरण गावात जाकीर शेख व त्यांचे कुटूंब घाटकोपर येथून आले होते. तेव्हा राऊत हे त्यांच्या घरी गेले असता कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांनी कायदेशीर रित्या शेख कुटुंबाला 10 दिवस जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाईन होण्याची विनंती केली. मात्र, या गोष्टीचा शेख यांनी फार राग आला व त्यांनी राऊत यांच्या फोनवर फोन करुन घाणघाण शिवीगाळ करत धमकी दिली. त्यामुळे त्यांनी कायदेशी फिर्याद देत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे हा वाद अधिक उफाळला गेला. त्यामुळे, शेख यांनी दि. 3 जुलै रोजी सायंकाळी राऊत यांच्या फोनवर फोन करुन पुन्हा शिवीगाळ केली. मी घटकोपरचा राहणारा आहे. तुला पाहून घेतो असे म्हणत खोटे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. असे राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान हा सर्व प्रकार झाल्यानंतर ग्रामसेवक यांनी तो नंबर ब्लॅक लिस्टला टाकला. मात्र, त्या दिवशी ते गावात समोरासमोर आले असता शेख यांनी शिवीगाळ सुरू केली. तु गावात नोकरी कसा करतो हे मी पाहतो असे म्हणत ग्रामसेवक यांना ढकलून दिले. त्यावेळी राऊत यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. तेथून त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फोन केला असता पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी कुरण गाव गाठले. यावेळी पोलीस शेख यांना ताब्यात घेत असताना तेथे त्यांच्या नातेवाईकांचा फार मोठा जमाव एकत्र आला. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. शेख यांना जमावाने अटक होऊ न देता पळवून नेले असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर यात तिघांना अटक करण्यात आली आहे.