कोरोनाला भावला कसारा दुमाला, संगमनेरात नव्या गावांमध्ये होतेय बाधा! 113 बाधित 11 मयत!

- Sushant Pawse
सार्वभौम (संगमनेर) :
                        संगमनेर तालुक्यातील कसारा दुमाला येथे आता कोरोनाने नव्याने शिरकाव केला आहे. कसारा दुमाला येथील एका इसमाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल काल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे तो ज्या भागात मिळून आला आहे. तेथील काही भाग संशयित वाटला तर तो सील होण्याची शक्यता आहे. या कोरोना बाधित व्यक्तीमुळे संगमनेर तालुक्यात 113 रुग्ण बाधित त 11 मयत झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
            काल दुपारी सय्यदबाबा चौक येथील 70 वर्षीय तर कुरण येथील 63 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तेथील माहिती घेत असताना प्रतिबंधात्मक उपाय सुरू असतानाच सायंकाळी उशिरा आणखी एक कोरोनाबाधीत व्यक्ती कसारादुमाला येथे आढळुन आला आहे. तालुक्यात काल दिवसभरात तीन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडून आले आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 113 जाऊन पोहचली आहे.
                   
दरम्यान, संगमनेर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाविषाणूचा फैलाव झपाट्याने होताना दिसत आहे. तालुक्यात कोरोनाने शंभरी गाठूनही तो थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे प्रशासनाची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढतच चालली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना आज तालुक्यातील सात रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे ही तालुक्यासाठी महत्वाची बाब आहे. तर जे बाधित आणि मयत यांच्यातील सरासरी होती ती पुर्णपण थांबविण्यात मात्र प्रशासनाला यश आले आहे. असे म्हटल्यास काही वावघे ठरणार नाही. 
                         
  जिल्ह्यात काल 21 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात, नगर मनपा 09, संगमनेर 07, श्रीरामपूर 02, राहाता, पारनेर आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आज जिल्ह्यातील 21 रुग्ण बरे झाले. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर 02, श्रीरामपूर 05, पेमरेवाडी (संगमनेर) 01, दाढ बु. (राहाता) 01, भिंगार येथील 01 रुग्णाचा समावेश आहे. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 162 इतकी झाली आहे. काल बाधित आढळलेले सर्व रुग्ण हे यापूर्वीच्या बाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. आज जिल्ह्यातील 57 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असून सध्या जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या 510 इतकी झाली आहे.
                      तर या व्यतीरिक्त संगमनेर तालुक्याचा विचार केला तर,  संगमनेर शहरात 65 कोरोना बाधित असून त्यातील 61 जण मुळ रहिवासी आहेत. धांदफळ येथे 8 जण, निमोण 11, घुलेवाडी 2, केळेवाडी 1, निंबाळे 1, आश्वी बु 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 3, शेडगाव 3, पळसखेडे 3, जोर्वे 1, खळी 1, गुंजाळवाडी 1, कुरण 7, पिंपारणे 1, साकूर 1, पेमरेवाडी 1, कसारा दुमाला 1 असा एकूण 113 रुग्ण संगमनेर तालुक्यात मिळून आले आहेत. यात 98 रुग्ण स्थानिक असून 15 रुग्ण बाहेरचे आहेत. 109  पैकी 92 रुग्ण बरे झालेले आहेत. तर 10 रूग्ण उपचार घेत आहेत आणि 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.
--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 61 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547