नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदाराला कोरोनाची बाधा! जो काम करतो तोच बाधित होतो!


सार्वभौम (अकोले) :
                        नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका मा. आमदाराला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यापुर्वी बड्या-बड्या आमदारांना व मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली होती. तर अवघ्या काही दिवसात ते ठिक झाले होते. आता या काँग्रेसच्या आमदारांनी नगर येथे वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांची बैठक बोलविली होती. त्यात त्यानंतर त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला होता. दरम्यान ते स्वत: होमक्वारंटाईन झाले होते. मात्र, अधिकचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांनी आपला स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र, त्यांच्या या अहवालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
                     
 याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागरिकांचा प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसचे हे अ ामदार आठ दिवसांपुर्वी मुंबईहून नगरला आले होते. त्यांनी एका आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर वीज वितरणच्या अधिकार्‍यांसोबत त्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीनंतर दोन दिवसांनी बैठकीतील एका अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे प्रशासनाने जवळ-जवळ 38 जणांना क्वारंटाईन केले होते. त्यानंतर दोन दिवस उलटले तेव्हा या आमदारास श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांनी स्वत: डॉक्टरांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांचे स्वॅब घेण्यात आले असता ते रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून मोठी खळबळ उडाली आहे.
                           आता अनेकांसाठी हा एक धक्कादायक प्रकार असेल. मात्र, हे आमदार नव्याने विधानसभेत गेले आहेत. त्यामुळे त्यांना समाजाप्रती आत्मियता आहे. गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांना कोरोना झाल्यामुळे अनेक गोरगरिब लोकांनी मोठी हळहळ व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे जो काम करतो त्यालाच अडचणी येतात. त्यामुळे अर्थातच काही आमदारांच्या मतदारसंघात शंभर पेक्षा जास्त रुग्ण मिळून आले आहेत. तरी त्यांना काही गांभीर्य वाटत नाही. ते अशा परिस्थितीत मुंबईला आलिशान ठिकाणी राहतात. मात्र, अकोल्यात डॉ. किरण लहामटे हे नवोदीत आमदार पायाला भिंगरी बांधून समाजाच्या हितासाठी दिवसरात्र एक करीत आहेत. इतकेच काय! धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड हे समाजभिमूख मंत्री आहेत. त्यांना समाजाप्रती प्रचंड आत्मियता आहे. त्यामुळे त्यांना देखील उपचाराला सामोरे जावे लागते.
                       
अर्थातच कर्तुत्व गाजवायला मैदानात उतरावे लागते. त्यामुळे ज्या लोकप्रितिनिधींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासाठी प्रत्येकाने दुवा केली पाहिजे. कारण हे समाजासाठी रस्त्यावर उतरतात म्हणत त्यांना अशा प्रकराला सामोरे जावे लागते. अन्यथा गाडी, बंगला आणि एसी कार्यालये शोधणार्‍या पुढार्‍यांना समाजाचे काही घेणेदेणे नाही हे हा उभा महाराष्ट्र आणि देश पाहत आहे. त्यामुळे, लोकाशिर्वादाने या आमदारास उदंड आयुष्य लोभेल यात तिळमात्र शंका नाही.