अकोले तहसिलमध्ये जमावबंदीच्या टेबलावर कोरोनाचा अॅटॅक! दोन अव्वल कारकून बाधित! संगमनेरात 11 पॉझिटीव्ह, 19 वा बळी!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले शहरात कारखाना रोड नंतर आता थेट तहसिल कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. या कार्यालयातील दोन अव्वल कारकून कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या दोन संखेने कोेरोनाने आपली पंचाहत्तरी पार केली आहे. आता या तरुणांच्या सानिध्यात नेमके कोण-कोण आले आहे, याचा कोणाला प्रादुर्भाव झाला आहे. हे शोधण्याचे काम आरोग्य यंत्रणेने सुरू केले आहे. यात एक विशेष बाब म्हणजे ज्या 35 वर्षीय व्यक्तीला बाधा झाली आहे. त्याच्याकडे चक्क जमावबंदीचा टेबल आहे. त्यामुळे जमावबंदीच्या टेबलावरच कोरोनाने अॅटॅक केला आहे. तर दुसरा जो आहे तो अकोल्यात कामाला असला तरी तो संगमनेर येथील रहिवासी असून तो दिड मन्यांपासून सुट्टीव आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये आता कोरोनाच्या अजेंड्यवर आलेले दिसत आहे. यात दुर्दैव असे की, पोलीस ठाणे, तहसिल कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, वनखाते कार्यालय, रेकॉर्डरुम, पुरवठा शाखा अशी अनेक महत्वाचे ऑफीस या परिसरात आहे. तरी देखील येथे कोणतीही सुरक्षा नाही. येथे येताना कोणी तोंडाला मास्क बांधत नाही, जमावबंदी असताना देखील येेथे गर्दच गर्दी असते. त्यामुळे जे तालुका संभाळतात, तेच जर बाधित होऊ लागले तर जनतेकडे लक्ष द्यायचे कोणी? त्यामुळे यावर काहीतरी ठोस उपायोजना आखणे गरजेचे आहे. तर या व्यतिरिक्त अकोले तालुक्यातील माणिक ओझर येथे दोन तर शहरात एक आणि धुमाळवाडी परिसरात एक त्या रोडवर एक असे चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
तर संगमनेर तालुक्यात 11 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह! आला आहे. त्यात घोडेकर मळा येथे 27 वर्षीय तरुण, घास बाजार येथे 55 वर्षीय महिला, कसारा दुमारला येथे 65, 47, 31 वर्षीय तरूण, पद्मानगर येथे 24 वर्षीय तरुणी, इंदिरानगर येथे 20 वर्षीय तरुणी, वडगाव लांगडगा येथे 36 वर्षीय तरुणी, देवगल्ली येथे 18 वर्षीय तरुण, कसारा दुमाला येथे 29 वर्षीय तरुण व बाजारपेठ मध्ये 14 वर्षीय तरुण अशा 11 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्याचा कोरोना बाधितांचा आकडा 494 वर जाऊन पोहचला आहे. तर संगमनेत 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेस एका लग्नात कोरोनाची बाधा झाली होती. आज तिचा संशयित मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संगमनेरात मृतांची संख्या 19 वर जाऊन पोहचली आहे.!?याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोल्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तरी देखील तालुक्यातील रिकवरी रेट फारच उत्तम आहे. कालच एकाच वेळी तब्बल शहरासह पाच गावे कोरोनामुक्त झाली होती. मात्र, आज पुन्हा चक्क शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे खुद्द तहसिल कार्यालयात कोरोनाचे दमदार ऐन्ट्री केली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, ज्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. तो एकदम हुशार आणि शांत स्वभावाचे व्यक्तीमत्व आहे. या व्यक्तीचा टेबल हा तहसिल कार्यालयात अगदी तोंडावर असल्यामुळे येणारा प्रत्येक माणूस त्यास माहिती विचारत असतो. त्याच्या सहकार्यवादी स्वभावमुळे तो येणार्या प्रत्येकाला हवी ती माहिती सांगत असतो. अर्थात हे त्याचे काम नाही. मात्र, तरी देखील एक मदत म्हणून या व्यक्तीने कोणाला टाळले नाही. कदाचित याचे फळ म्हणून की काय! त्याच्या पदरात कोरोनाचा प्रसाद पडला. कारण, तहसिल कार्यालयात येणार्या प्रत्येकाच्या तोंडाला मास्क असतेच असे नाही. त्यातल्या त्यात अकोल्याची जनता म्हणजे निव्वळ उडानटप्पू, आपल्यापासून कोणाला त्रास होईल हे त्यांच्या डोक्यात नसतेच. त्यामुळे नियम ढाब्यावर बसवून सगळा भोंगळ कारभार सुरू असतो. त्यामुळेच या तरुणास बाधा झाली असावी असे बोलले जात आहे.
आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे, याच परिसरात पोलीस ठाणे आहे. मात्र, तेथे पोलीस देखील स्वत:ची काळजी घेताना दिसत नाहीत. आलेल्या प्रत्येकाला मास्क किंवा सोशल डिस्टन्स ठेवण्यास सांगत नाहीत. त्यामुळे पोलीस बांधवांनी देखील येणार्या प्रत्येकाला ठणकावून सांगितले पाहिजे. अन्यथा 188 प्रमाणे कारवाई करुन अशा बेजबाबदार व्यक्तींना धडा शिकविला पाहिजे. खरंतर प्रशासन सज्ज आहे म्हणून आज तालुका सुरक्षित आहे. त्यामुळे आपल्या अधिकार्यांची तथा कोविड योद्ध्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे. त्यामुळे आता जर सरकारी कार्यालयात जायचे असेल तर पहिल्यांदा तोंडाला मास्क लावा, हात सॉनिटायझरने स्वच्छ करा मगच आत प्रवेश करा. या व्यतिरिक्त पोलीस किंवा महसूल खात्याने एखाद्या व्यक्तीला गेटवर उभे केले पाहिजे. येणार्यांचे तापमान तपासून त्यास आत सोडले पाहिजे. अन्याथा सक्षकांवर ही बला येते तर सामान्य नागरिकांचे काय हाल होतील हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे, प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी. असेच आवाहन प्रशासनाने केले आहे.