अखेर कोरोनाने घेतला पोलिसाचा बळी! 12 जणांना बाधा! संगमनेरात दिड महिना ड्युटी केली होती!


सार्वभौम (अकोले) :-
                       जगात कोरोनाने हाहाकार माजविला असताना त्याचे स्तोम आता गावा-गावातील प्रत्येक गल्लीबोळात पसरले आहे. तर कोरोनाच्या भितीपोटी सगळा देश घरात बसलेला असताना केवळ एकमेव खाकीतला देव म्हणून रस्त्यावर पाय रवून उभा होता. म्हणून तर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आजही ताठ मानेने उभा आहे. स्वत:चा जीव गेला तरी बेहत्तर पण वर्दी चढविल्यानंतर मैदानात उभे राहून फक्त आणि फक्त देशसेवा हीच देेहाच्या अणु-रेणूत भिणविणारा तो एकमेव योद्धा म्हणजे पोलीस होय. म्हणून तर आज 3 हजार 388 पोलिसांना कोरोनाने छेडले आहे तर 40 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे. यात एक नगर जिल्ह्यातील मुख्यालय येथील ५० वर्षीय सहायक पोलीस उपनिरीक्षक या दिलदार व्यक्तीने वर्दीला अखेरचा सलाम केला आहे. त्यामुळे, पोलीस दलावर मोठी शोककळा पसरली आहे. तर निव्वळ नगर जिल्ह्यात आजवर 12 जणांना कोरोनाची बाधा झाली असून ते सुखरूप होऊन घरी परतले आहेत.
                       
 आज चार महिने होत आले आहे. कोणत्याही प्रकारच्या सुट्ट्या आणि कारणे न सांगता पोलीस वर्दी घालून रस्त्यावर उभा आहे. खरंतर बाहेर पडू नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सचा वापर करा हे सांगत असताना नागरिक पोलिसांशी आरेरावीच्या भाषा वापरताना दिसतात. मात्र, कोरोना झाला आणि मृत्युला सामोरे जाण्याचे वेळ आली तर तेव्हा मात्र, पोलिसांचा चेहरा समोर येतो. एका पावतीसाठी अर्धा तास तुमचे डोके खावे लागते, त्यात पुढार्‍यांचे फोन, वरिष्ठांचा दबाव कुटुंबाची काळजी तरी देखील ही वर्दी नेहमी टिकाचा धनी ठरते. तुम्ही आजही सर्वे करा, या प्रक्रियेत डॉक्टर आणि नर्स यांची सर्वात महत्वाची भूमिका आहे. मात्र, सुदैवाने त्यांना बाधा होण्याचे प्रमाण फार कमी आहे. मात्र, त्या पलिकडे पोलीस दलाला कोणते संरक्षण नाही, कोणाचे मार्गदर्शन नाही, कोणती सुरक्षा नाही म्हणून तर आज 4 हजारापर्यंत ही संख्या गेली आहे. यात अनेक अधिकार्‍यांनी आणि कर्मचार्‍यांनी आपले जीव गमविले आहे. लोक मयत नाही तर शहीद झाले आहेत. तसे कोरोनाची बाधा होणारे हे पहिले शासकीय दल आहे. म्हणून तर याची जाणीव कोणाला असो वा नसो, पण एक अर्मीतला कर्नल येतो आणि साध्या पोलीस कर्मचार्‍याला सॅल्युट मारुन जातो. यापेक्षा वर्दीचा सन्मान काय असावा. त्यामुळे पोलिसांवर टिका करणार्‍यांकडून वर्दीला कोणतेही प्रमाणपत्र नको आहे.
                 खरंतर आज मयत झालेल एएसआय हे व्यक्तीमत्व खाकीतील एक हसर्‍या स्वाभावाचे व्यक्तीमत्व होते. त्याच्या तरुणांईत त्यांनी खाकीची मान उंचावेल अशा प्रकारचे कार्य केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यालयात होते. मात्र, संगमनेर येथे जेव्हा कोरोनाचा प्रदुर्भाव सर्वाधिक होता तेव्हा त्यांनी तब्बल दिड महिना येथे काम केले होते. नंतर ते पुन्हा मुख्यालयात हजर झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यासाठी फार त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेमुळे पोलिस दलावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
- सागर शिंदे
--------------------------------------
 आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 75 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 75 लाख वाचक)