अकोल्यात सहा रुग्ण तर संगमनेरमध्ये 23.! एका लग्नाने संगमनेरची वरात काढली!
सार्वभौम (संगमनेर) :-
अकोेले तालुक्यात आज एकूण सहा रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यात चास येथील चौघे, देवठाण येथील एक तर उंचखडक बु येथील एक असा सहा रिपोर्ट प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. तर या पलिकडे संगमनेरात 23 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यात कोरणाचे धक्के बसत असताना पुन्हा 23 रुग्ण नव्याने आढळुन आले व 2 रुग्ण यापूर्वीही कोरोना बाधीत आढळुन आले होते. यामध्ये ग्रामीण भागातील 14 तर शहरातील 12 रुग्ण आढळुन आले आहे. शहरातील मालदड रोड येथे दोन तर गणेश नगर येथे दोन व मेनरोड येथे तीन एकता चौक दोन शिवाजी नगर व नवघरगल्ली एक असे एकूण शहरात 12 रुग्ण नव्याने आढळुन आले आहे तर ग्रामीण भागातील माहुली मध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. माहुली मध्ये आठ कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आले आहे.तर निमोण येथे पुन्हा एक कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आला आहे.तालुक्यातील पठारभागातील साकुर येथे कोणताही रुग्न नसून तो रुग्ण अकोले तालुक्यातील चास येथील आहे. तर यापुर्वी तळेगाव दिघे येथे जो एक रूग्ण मिळून आला होता तोच रुग्ण सरकारी अकडेवारीत पुन्हा गणण्यात आला आहे. तर वडगाव पान येथे एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळुन आला आहे. तर गुंजाळवाडी येथे दोन रुग्ण आढळुन आले आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या 265 वर जाऊन पोहचली आहे.
दरम्यान, तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना विषाणु झपाट्याने वाढत असुन रोज एक नवीन गावात कोरोना शिरकाव करत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बधितांचा ही आकडा वाढत आहे.नव्याने कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत असल्याने यांना वानवळा कुठून येत आहे. हे मात्र प्रशासनापुढे डोकेदुखी ठरत आहे. आता यात एक महत्वाचे कारण म्हणजे जे एकता चौक व मेन रोड या परिसरात जे काही रुग्ण मिळून आले आहेत. त्यापैकी जवळजवळ पाच ते सात रुग्णांनी संगमनेरात झालेल्या एका लग्नाला हजेरी लावलेली आहे. त्यामुळे याच लग्नात आता 11 ते 13 रूग्ण एकूण बाधित झालेले आहेत. इतकेच काय तर अकोले तालुक्यातील देवठाण येथे जी माहिला मिळून आली आहे. ती देखील एका लग्नामुळेच कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे.तसेच अकोले तालुक्यातील उंचखडक बु येथे जो व्यक्ती कोरोना बाधित मिळून आला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. विशेष म्हणजे हे बाधित रूग्ण एका बंद खोलीत एकटेच होते. त्यांनी स्वत:ला होमक्वारंटाईन करुन घेतलेले होते. त्यांना जेव्हा त्रास व्हायला लागला होता तेव्हा त्यांनी तत्काळ उपचार घेण्यासाठी संगमनेर गाठले होते. त्यामुळे त्यांचा कोणाशी संपर्क आलेला नाही. आता यांच्यावर पाच दिवसांचे उपचार करण्यात आले असून आणखी पाच ते सहा दिवसात ते कोरोनावर मात करुन घरी येणार आहे. दरम्यान त्यांची प्रकृती उत्तम असून कोणी काही घाबरण्याचे कारण नाही. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.