जय देशमुख यांचे आ. डॉ. लहामटे यांना खुले आव्हान, आता लायु या ! पण येताना ही उत्तरे घेऊन या!
सार्वभौम (अकोले) :
मा. आमदार महोदय, तुम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात. त्यामुळे, तुमचा आदर करणे हे आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे. मात्र, तुम्ही कितीही शब्दांच्या मर्यादा सोडल्या तरी आमच्यावर असे संस्कार नाही. की, जशाला तसे उत्तर द्यायचे. उलट उद्धट शब्दांना वैचारिक पद्धतीने उत्तर देण्याची आमच्या कुटूंबाची परंपरा आहे. मात्र, काल आमदार महोदय आपण एका कार्यकर्तेच्या घरी प्रशासकीय अधिकारी यांच्याबरोबर पार्टी करून देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शब्द अपशब्दांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन तालुक्याला घडवून दिले. अर्थात तो तुमचा स्वभावगून आहे. मात्र, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. की, तुम्ही पिचडांना वारंवार शिव्या देतात, नको-नको ते बोलतात. तो तुमचा राजकीय हक्क समजूया, त्याला माझी हरकत नाही. पण तुम्हाला ज्या आम जनतेने आमदार केलय. त्यांच्या प्रश्नाबाबत सभागृहात तुम्ही काहीच कसे बोलत नाही? तेव्हा तुमचे शब्द तेथे आक्रमक का होत नाही? तालुक्यात आल्यानंतर तुमचा आवाज उंचावतो आणि विधानसभेत मात्र आपण हाताची घडी घालून बसतात. हे जनतेला न कळण्याजोगे आहे. सभागृहात आतापर्यंत विकासाच्या मुद्यावर किती प्रश्न तुम्ही विचारले? हे तुम्हीच सांगा, 67 टक्के निधीची कपात करण्यात आली, आता कोविड-19 मुळे सरकारने निधीमध्ये कपात केली, उरलेल्या 33 टक्के निधीमधून तुम्ही तालुक्यात काय-काय आणनार आहात? त्यासाठी तुमची काय तयारी आहे? हे जनतेला तुम्ही सांगितले पाहिजे, अशा विकास कामांच्या प्रश्नासाठी तुम्ही लायु येताना शक्यतो कधी दिसत नाही. पण टिका टिप्पणीची संधी मिळाली की मोठ्या आवेशाने कॅमेरॉसमोर बसतात. आज अकोले तालुक्यात निळवंड्याच्या कालव्यांचे काम जोरदार चालु आहे. तुम्ही त्यातून अकोल्याच्या शेतकर्यांना किती आउटलेट ठेवणार? त्याबाबत शेतकर्यांच्या हिताचे काय निर्णय घेणार? हे सांगण्यासाठी तुम्ही का ऑनलाईन येत नाहीत? हे गौडबंगाल सामान्य मानसांना माहित नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे. की, तुमच्या पाच वर्षाच्या काळात अकोल्यातील धरणांचे पाणी थेट संगमनेरला जाणार आणि तालुक्याचे भोळे भाबडे लोक तुम्हाला आमदार म्हणून डोक्यावर घेऊन नाचणार. पण त्यांना हे काय माहित की, संगमनेरचे आमदार सत्तेत आहेत. त्यांच्या हातात अकोल्याच्या निवडणुकीचे पत्ते आहेत. तर त्यांच्यापुढे यांचे काहीच चालणार नाही. त्यामुळे ते करतील तर पुर्वदिशा हेच चित्र येणार्या काळात शेतकर्यांना पहायला मिळणार आहे. त्यामुळे असे चळवळीचे आणि आंदोलनाचे विषय ते कधी छेडणार नाहीत. मात्र, पिचडांवर टिका करून तोंडाचे भांडवल करण्यासाठी मात्र, ते थेट लायु येतात. हे जनतेला कळत नाही. मात्र, तुम्ही त्यांची दिशाभूल का करत आहात? जमलं तर याचे उत्तर द्या.
अकोले-संगमनेर तालुक्यात तुमच्या मतदारसंघात शेतकरी व आदीवासी यांच्या गरजांची पुर्तता तुमच्याकडून झाली नाही. आजही शेतकरी बी-बियाने आणि खतांसाठी तडफडतो आहे. तर 2 हजार 515 व 6 हजार 54, जनसुविधा तसेच आदिवासी उपाययोजना जलसंपदा या सर्व कामांबद्दल तुम्ही काहीच बोलायला तयार नाहीत. परंतु कामे करायची सोडून झाडाझडती घ्यायला मात्र, तत्काळ पुढे येतात. त्यामुळे, हे कळत नाही की, अकोल्याला तुम्ही मागे टाकताय की तालुका अधोगतीकडे नेण्याचा प्रण तुम्ही आखला आहे. आमदार महोदय जितके तुम्ही अकोले तालुक्याचे आमदार आहात तितकेच तुम्ही संगमनेर तालुक्यातील पठार भागावरचे देखील लोकप्रतिनिधी आहात हे तुम्हा का विसरले! हे मी नाही तर तेथील लोक जाब विचारत आहेत. तेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी का फेसबुक लायु येत नाही? खरंतर तुम्ही वारंवार बोलतात, मी तालुक्याचा चेहरा बदलून टाकतो, मी विकास करतो, परंतु तुमच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात एकही मोठ काम तुम्ही अकोल्यात आणू शकत नाही. विशेष म्हणजे सत्ता तुमची आहे, सरकारमधील आमदार तुम्ही आहात मात्र त्याचे फलित काय? या प्रश्नची उत्तरे तुम्ही देणार आहात का? की निव्वळ टिका करून जनतेची दिशाभूल करणार आहात? आमदार महोदय आम्हाला जरा हे देखील कळुद्या की, आतापर्यंत किती बैठका तुम्ही मंत्रिमंडळात घेतल्या, किती प्रस्ताव दाखल केले, कोणकोणत्या मंजुर्या पास केल्या, प्रस्तावित कामांचा काय पाठपुरावा केला? केवळ तालुक्यातील पुर्वीच्या कामांवर आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम तुम्ही केल्याचे दिसते आहे. ही जनतेची दिशाभूल कशासाठी? जरा याचे देखील उत्तर देण्यासाठी लायु येत जा. मात्र, वास्तव असे आहे की, आपले काम म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कडी असे आहे. खरंतर बोलण्यासाठी खुप काही मुद्दे आहेत. मात्र, आपल्याकडून कधी वैचारिक शब्दांचे दर्शन घडले नाही. पिचडांचा विरोधक म्हणून पुढे आले आणि तीच तुमची ओळख जपण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या टिका करतात. मात्र, विकासाच्या मुद्यावर तुम्ही ब्र शब्द काढायला तयार नाही.
--------------------------------------

राज्याच्या विधानसभेत बसून तालुक्याच्या विकासासाठी खूप काही करता येईल. मात्र, तेथे बसून केवळ तुम्हाला जिरवाजिरवी करायची आहे. माझे आपल्याला एकच विनंती आहे. आता पुढीलवेळी लायु येताने या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन या. तसेच, अकोले नगरपंचायतीला आपण किती निधी दिला, शेतकर्यांसाठी काय केले? खतांचा तुटवडा पडला आहे. त्याबाबत तुम्ही काय उपाय काढला? कोरोनाच्या काळात लोक उपाशी असतांना तुम्ही काय केले, तालुक्यासाठी किती निधी आणला याची उत्तरे तुम्ही द्यायला हवी. आणी हो.! तोलारखिंड तुम्ही फोडणार होते. त्याचे काय झाले? हे देखील सांगा. फक्त लायु येताना वैचारिक पद्धतीने या आकस बुद्धीने नव्हे.! हिच माझी कळकळीची विनंती.- जय देशमुख
--------------------------------------
आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 68 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 74 लाख वाचक)============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------