संगमनेरात कोरोनाचे दोन बळी, अन दहा रुग्ण! संख्या 359 वर


सार्वभौम (संगमनेर) : 
                            संगमनेरमध्ये आज पुन्हा दहा रुग्ण आढळून आले आहे. पण, यामध्ये निमोण येथील एक महिला यापूर्वी ही कोरोना बाधीत आढळून आली होती.त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे आज समोर आले आहे. निमोण येथील 30 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तर, शहरातील बाजारपेठेमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. बाजारपेठेमध्ये 65 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. शहरातील पार्श्वनाथ गल्लीमध्ये नव्याने रुग्ण आढळून आला आहे. येथे 55 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. ऑरेंजकॉर्नर येथे 60 वर्षीय महिलेला व 37 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर तालुक्यातील राजापूर येथे 65 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. आज पुन्हा नाईकवाडपुरा येथे 47 वर्षीय महिला कोरोना बाधीत सापडली आहे. तर कसारा दुमाला येथे 87 वर्षीय वयोवृद्धाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच राजापूर येथे 44 वर्षीय महिला, मालदाडरोड येथे 20 य 43 वर्षीय पुरूष यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकुण कोरोनाग्रस्तांची संख्या 359 वर जाऊन पोहचली आहे. यालिकडे संगमनेर तालुक्यातील कसारा दुमाला येथील 87 वर्षीय वृद्धाला तर शिबलापूर येथील 43 वर्षीय व्यक्ती कोरोना होऊन मयत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
                   
सध्या संगमनेरात कोरोनाची आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे. त्यावर दृष्टीक्षेप टाकला तर  लक्षात येईल की, संगमनेर 143, धांदरफळ 8, निमोण 35, घुलेवाडी 15, केळेवाडी 1, निंबाळे 1, आश्वी बु 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 1, शेडगाव 3, पळासखेडे 3, जोर्वे 2, खळी 1, गुंजाळवाडी 13, कुरण 55, पिंपरणे 1, साकूर 1, पेमरेवाडी 2, कसारा दुमाला 5, संगमनेर खुर्द 3, ढोलेवाडी 11, निमगाव जाळी 1, खांडगाव 3, पिंपळगाव कोंझीरे 3, हिवरगाव पठार 1, पेमगिरी 1, नांदुरखंदरमाळ 9, हिवरगाव पावसा 2, मिर्झापूर 1, करुले 1, कनोली 4, कौठे धांदरफळ 1, चिखली 1, तळेगाव दिघे 1, वडगाव पान 1, सुकेवाडी 2, राजापूर 1, कोल्हेवाडी 1, शिबलापूर 5, रायते 1, वडगाव लांडगा 1 असे एकूण संपुर्ण तालुक्यात 349 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण येथे मिळून आले आहेत. तर यात आज दहा रूग्णांची भर पडली असून ही संख्या 359 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी 333 हे स्थानिक रुग्ण आहेत तर 16 व्यक्ती बाहेरच्या आहेत. या बाधित संखेपैकी 216 रुग्णांनी कोरोनाची लढाई यशस्वीरित्या पुर्ण केली असून 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या पलिकडे शहरात आठ, धांदरफळ येथे 1, निमोण येथे 2, डिग्रास व शेडगाव येथे प्रत्येकी 1 तर शिबलापूर येथे 1 कसारा दुमारला येथे 2 असे 16 जण आजवर कोरोनाचे बळी ठरले आहेत.
                       कसारवाडी येथे जो व्यक्ती कोरोना सरकारी रूग्णालयात दाखल केला होता त्यांचा तेथे स्वॅब घेतला असता ते दरम्यानच्या काळात पुन्हा खाजगी रुग्णालयात दाखल झाले होते. तेथे देखील त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तर शिबलापूर येथील व्यक्ती आज दुपारी मयत झाल्यामुळे या परिसरात मोठी खळबळ उडली होती. मात्र, या सर्व प्रकारात कोविड दरम्यान प्रशासकीय यंत्रणेत फार मोठा समन्वयाचा आभाव असल्याचे दिसते आहे. कारण, एखाद्या तालुक्यात जर एखादा रुग्ण मयत झाला तर त्याच्या मृत्युची माहिती फक्त त्याच्या एका नातेवाईकाला कळविले जाते. मात्र, स्थानिक तहसिलदार, आरोग्य अधिकारी किंवा प्रांताधिकारी यांना देखील माहिती दिली जात नाही. त्यामुळे एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर ती खबर तब्बल 12 ते 15 दिवसांनी समजते किंवा माध्यमांच्या साहय्याने समजते हे फार मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे जोवर प्रशासनाचा एकमेकांशी ताळमेळ बसत नाही. तोवर कोरोनाला हे हरवू शकत नाही. त्यामुळे हा समन्वय राखण्यासाठी यांनी योग्या पाऊल उचलले पाहिजे.