प्रशासनाचे त्या लग्नाबाबत वरातीमागून घोडे! सचिन नरवडेसह तिघांवर गुन्हे दाखल! पहा तुम्हाला पटतय का? कोरोनात मॅड लोकांचे राजकारण!


सार्वभौम (अकोले) :- 
                      अकोले तालुक्यातील केळेवाडी आणि ब्राम्हणवाडा येथे वेगवेगळे दोन विवाह झाले होते. त्यात जो व्यक्ती लग्नात गेला होता त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर ब्राम्हणवाडा येथे आणखी दोन व्यक्तींना कोरोना झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला. मात्र, त्यानंतर प्रशासनाला फार उशिरा जाग आली आणि त्यांनी कोण्या राजकीय व्यक्तीच्या दबावापोटी तीन जणांवर गुन्हे 188 कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यात सचिन सावळेराम नरवडे, सचिन सुदाम काळे व योगेश सुदाम काळे अशा तिघांचा सामावेश आहे. या गुन्ह्यानंतर वर्‍हाडी मंडळीवर दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याने तालुक्यात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, यात वास्तवता काय आहे. हे प्रशासनाने समजून घेणे गरजेचे आहे.
                          याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 25 जून रोजी फॉरेन रिटर्न तरुणाचे काळेवाडी परिसरात लग्न झाले. हा तरुण गेल्या पाच महिन्यांपासून गावी आलेला असल्यामुळे तो बाधित असने किंवा त्याबाबत कोणतीही शंका नाही. मात्र, त्याच्या लग्नात जे आले होते त्याच्याबाबत आता प्रश्न उपस्थित होतो. खरंतर गावात कोण बाहेरून येतो, कोण बाहेर जाते याची माहिती स्थानिक समितीच्या व्यक्तींनी घेणे अपेक्षित आहे. मात्र, या कमिट्यांबाबत आता न बोललेलेच बरे! मात्र, प्रशासकीय अधिकार्‍यांनी तरी आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे होते. कोळेवाडी आणि ब्राम्हणवाडा प्रकरणात तरी प्रशासनाचे वरातीमागून घोडे दौडल्याचे बोलले जाते. हे तुम्हाला स्पष्ट लक्षात येईल.
 प्रशासानाच्या म्हणण्यानुसार या तरुणांना सांगण्यात आले होते की, तुम्ही क्वारंटाईन व्हावे, तरी ते क्वारंटाईन न होता मुंबईला निघून गेले. मात्र, जेव्हा ते मुंबईला गेेले त्यानंतर तीन दिवसांनी गावाकडे कोरोनाचा रुग्ण मिळून आला. तर दुसरी गोष्ट म्हणजे यांनी दोन दिवसांचा कायदेशीर पास काढलेला होता. त्यामुळे त्यांनी थांबणे अनिवार्य नव्हते. एकंदर याचा सर्व खुलासा आता कोर्टात होणार आहे.!
                       
आत प्रशासनाने ज्या तिघांना आरोपी केले आहे. त्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जे तिघे शासनाच्या परवानगीने मुंबईहून आले होते. ते दि. 25 जून रोजी आले तर त्यांचा 27 जून रोजीचा पास होता. त्यामुळे ते आले आणि 25 तारखेचे कार्यक्रम अटेंड करुन ते पुन्हा ठरलेल्या वेळेत माघारी गेले. ते मुंबईत पोहचल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी म्हणजे 30 जून रोजी ब्राम्हणवाडा येथील एका तरुणाला व त्याच्या बहिनीला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामुळे, एक तर सरळसरळ स्पष्ट लक्षात येते की, जेव्हा कोरोनाचा रुग्ण गावात मिळून आला. त्यानंतर प्रशासन संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणार हे ठरलेले असते. त्यामुळे जे 30 तारखेच्या आधीच आपल्या ठरलेल्या पास परवाण्यानुसार निघून गेले. त्यांचा विषय येथे येऊच शकत नाही. उलट त्यांच्याशी संपर्क करून तेथे होमक्वारंटाईन करण्याच्या सुचना प्रशासनाने देणे अपेक्षित होत्या. मात्र, ते आले 25 तारखेला, गेल्या 27, तारखेला, रुग्ण मिळाला 30 तारखेला पुन्हा दुसरे दोन देखील मिळाले 3 तारखेला आणि प्रशासकीय अधिकारी गुन्हा दाखल करतात 5 तारखेला. म्हणजे तब्बल 09 दिवसानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी राजकीय लोकांच्या दबावाला बळी पडून अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला. म्हणजे प्रशासनाचे वरीतीमागून घेडे नाहीतर काय?
                 खरंतर दै. रोखठोक सार्वभौमने निर्भिड लिखान करुन या प्रकारावर प्रकाश टाकला होता. मात्र, चुकीच्या गोष्टीला, राजकारण, लाचारीला आणि भ्रष्टाचाराला सार्वभौम कधीच थारा देऊ शकत नाही. कारण, हे स्पष्ट लक्षात येते की, कोरोना झाल्यानंतर प्रशासनाला जाग येते, त्याच परिसरात दोन-दोन लग्न थाटामाटात होतात, त्या लग्नानंतर एका बर्थडेला भल्याभल्यांची हजेरी लागते, त्याचे फोटो सोशल मीडियावर फिरतात, ते प्रशासनाला दिसले नाही. मात्र, अशा प्रकारे दबाव अंगावर घेऊन जर प्रशासन काम करेल तर अकोल्यात सामजिक अराजकता माजेल आणि तालुक्याचे संगमनेर व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे, प्रशासनाने प्रसारमध्यमे आणि राजकीय दबावाला बळी न पडता काम केले पाहिजे असे सामान्य व सजग नागरिकांना वाटते आहे. आता येणार्‍या काळात या गुन्ह्याला कोर्टात कोर्टात आपिल होण्याची शक्यता आहे. कोविड-19 रोखण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. मात्र, कोविडच्या आडून कोणी राजकारण करत असेल तर त्याच्या सायको वृत्तीइतके दुर्दैव कोणतेच नाही. असे सुज्ञ नागरिकांना वाटू लागले आहे.
--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 66 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 64 लाख वाचक)