आरे बाप रे.! कुरणमध्ये कोरोनाचा विस्फोट, संगमनेरात एकाच दिवशी 23 रुग्ण! कुरणचे मालेगाव!


सार्वभौम (संगमनेर) :-
                    संगमनेर तालुक्यातील कुरण येथे तब्बल 22 व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना बाधित असल्याचे मिळून आला आहे. त्यामुळे तेथे कोरोनाने थैमान घातल्याचे आता दिसून येत आहे. यापुर्वी तेथे पहिल्यांदा दोन रुग्ण मिळून आले होते. त्यानंतर थेट एका कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला तर त्यानंतर एक संशयित असतानाच खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर कुरण हे कोरोनाचे केंद्र बनले. एकवेळी शहरात एकही रूग्ण मिळत नाही. मात्र, प्रत्येक अहवालात कुरण येथील एक का होईना रूग्ण मिळून येत होता. विशेष म्हणजे अगदी कालच येथे सहा रुग्ण कोरोना बाधित मिळून आले होते. मात्र, आज कोरोनाते तेथे अक्षरश: थैमान घातले असून आज चक्क 22 व्यक्ती कोरोना बाधित मिळून आल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी तोंडात बोट घातले आहे. तर या रिपोर्टनंतर आज एकाच दिवसात 23 रुग्ण कोरोनाचे मिळून आले आहे.
                       
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या साडेतीन महिन्यापासून कुरण येथे कोरोना, कंटेनमेंट, क्वारंटाईन, होमक्वारंटाईन, स्वॅब तपासणी आणि संशयित अशा अनेक बाबांहून वाद विवाद होत होते. मात्र, तेथील काही व्यक्तींनी प्रशासनाला काहीच सहकार्य केले नाही. जेव्हा तेथे कंटेनमेंट झोन केले तर लोकांनी हजार प्रश्न उभे केले. कोणी कायद्यावर बोट ठेवले. मात्र हे सर्व आपल्याच भल्यासाठी आहे हे कोणी समजून घेतले नाही. त्याचे तोटे आज कुरणमध्ये उद्भवताना दिसत आहे. आज कुरणचे मालेगाव होताना वाईट वाटत असले तरी प्रशासन आणि स्थानिक व्यक्ती यांच्या देखील काही चुका आहेत त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
यात 24 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, 8 वर्षीय चिमुरडी, 21 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय पुरूष, 7 वर्षीय चिमुकली, 32 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला, 59 वर्षीय महिला, 42, वर्षीय पुरूष,, 40 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुण, 16 वर्षीय तरुणी, 33 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरूष, 23 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला अशा 22 जणांचा सामावेश आहे.एकंदर यात बहुतांशी तरुण व लहान मुलांचा सामावेश आहे. त्यामुळे सुज्ञ व्यक्तींच्या बेजबाबदार पणामुळे अगदी चिमुरड्यांना कोरोनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे.
               काल शनिवार दि.3 जुलै रोजी तेरा रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी आठ रुग्ण हे कुरण मधील होते.आता नव्याने पुन्हा एकदा कुरण मध्ये कोरोनाचे 22रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.आज दुपारी संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा येथे एक रुग्ण आढळुन आला होता.त्यामुळे संगमनेर मध्ये पहिल्यांदाच एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज उच्चाटन गाठले आहे.आज नव्याने 22कोरोना बधितांची संख्या आढळल्याने तालुक्यातील एकुण कोरोनाग्रस्तांची संख्या 149 वर जाऊन पोहोचली आहे.त्यामुळे संगमनेर मधील कोरोनाचा आकडा द्विशतकाकडे वाटचाल करीत आहे. दरम्यान,कुरण मध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कुरण मध्ये यापूर्वी ही कोरोनाचा संशयित रुग्ण मयत झाला होता.मात्र, त्यावरून प्रशासन आणि कुरण मधील लोकांनमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
शहरातील आजूबाजूच्या गावांन मध्ये कोरोनाचा नव्याने शिरकाव होत आहे. तालुक्यात नविनरुग्ण सापडत असल्याने यांना वानवळा कोण देतंय याचे मुळ शोधणे आता प्रशासनापुढे मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी देखील वाढत आहे.आता कुरण मध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कुरण मध्ये यापूर्वी ही कोरोनाचा संशयित रुग्ण मयत झाला होता.
तर या व्यतीरिक्त संगमनेर तालुक्याचा विचार केला तर,  संगमनेर शहरात 66 कोरोना बाधित असून त्यातील 62 जण मुळ रहिवासी आहेत. धांदफळ येथे 8 जण, निमोण 11, घुलेवाडी 2, केळेवाडी 1, निंबाळे 1, आश्वी बु 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 3, शेडगाव 3, पळसखेडे 3, जोर्वे 1, खळी 1, गुंजाळवाडी 1, कुरण 29, पिंपारणे 1, साकूर 1, पेमरेवाडी 1, सय्यदबाबा चौक 1, कसारा दुमाला 1, नाईकवाडपुरा 1, असा एकूण 149 रुग्ण संगमनेर तालुक्यात मिळून आले आहेत. आजवर तालुक्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 
-------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 61 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547