आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांचे वाकयुद्ध! परस्पर विरोधी गुन्हे दाखल; सावधान! तर कार्यकर्त्यांचे मुडदे पडतील!
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुक्याचे राजकारण आता दिवसेंदिवस पेटू लागले आहे. आजी-माजी आमदार एकमेकांवर टिका टिप्पणी करीत असताना आता कार्यकर्ते देखील एकमेकांना भिडू लागल्याचे दिसत आहे. कोणी कोणाला ठार मारण्याच्या धमक्या देत आहे तर कोणी कोणाचे हातपाय तोडण्याच्या धमक्या देत आहे. अशाच दोन कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिविगाळ दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर मात्र तालुक्यात चांगलेच वादळ पेटले असून तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.
याबाबात सविस्तर माहिती अशी की, अमोल येवले हा मेहेंदुरी येथील रहिवासी आहे. तो भाजपचा कट्टर कार्यकर्ता असून गोरक्षक म्हणून काम करतो. त्याने राष्ट्रवादीच्या तेजस चौधरी याला आज सोमवार दि. 6 रोजी फोन केला होता. मागील काही राजकीय घडामोडीचा रोष मनात धरुन येवले याने चौधरीली धमकी दिली की, तू अकोल्यात ये तुझे हातपाय तोडतो, तुझा गेम करतो असे म्हणत दमदाटी केली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हाच वाद गेल्या चार दिवसांपुर्वी फेसबुकवर पेटला होता. आज अपशब्दांची मर्यादा ओलांडल्यामुळे येवलेच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
तर येवले याने देखील चौधरी याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, चौधरी याने मला फोन करुन शिवीगाळ दमदाटी करुन ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली असताच हे प्रकरण सामंजस्याने मिटविण्याचा रेटा अनेकांनी लावला होता. त्यामुळे, दोन मिनिटाचा राग आणि नको त्या घानेरड्या राजकाराणाहून स्वत:ला मनस्ताप करुन घ्यायचा. हे कार्यकत्यांना कधी लक्षात यायचे देव जाणे!
खरंतर यापुर्वी देखील अकोल्यात एकमेकांचे बॅनर फाडाफाडी झाली आहे. तर या पलिकडे एकाने फेसबुकवर माजी आमदारांच्या विरोधात अक्षेपहार्य लिखान केले होते. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा देखील झाला होता. आता देशातील लॉकडाऊन जसजसे शिथिल होत चालले आहे. तसतसे राजकारणाला रंगू चढू लागला आहे. तेच चित्र अकोले तालुक्यात दिसत असून आजी माजी आमदारांच्या जुगलबंदीला चांगलाच रंग चढला आहे. खरंतर जेव्हा पिंपारकणे पुलाच्या कामचे उद्घाटन आणि पिंपळगाव खांड धरणाचे जलपूजन येथून श्रेयवादाला सुरूवात झाली. तो मंजूर कोणच्या काळात झाला तर त्याला निधी कोणी आणला, त्याचे काम कोणाच्या काळात झाले तर तो पुर्ण कोणाच्या काळत होणार! तसे या सर्व प्रश्नांचे उत्तर जनतेला माहित आहे. मात्र, हे कोणी कार्यकर्ते म्हणून मिरवतात यांच्या झापडी उडविण्यासाठी खरोखर एखाद्या देवदुताला जन्म घ्यावा लागतो की काय? असा प्रश्न पडला आहे. कारण, अमादार कोण? रुबाब कोणचा? पदाधिकारी कोण? रुबाब कोणाचा? धडपड कोणाची आणि आरडाओरड करतय कोण? हे प्रत्येकाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. कारण, या राजकारणात बळी जातो तो सामान्य व्यक्तीचा. त्यामुळे, कार्यकर्ता म्हणून जर कोणावर वेळ आली तर कोणता पुढारी आणि लोकप्रतिनिधी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहत नाही. हेच प्रखर वास्तव आहे.
याचा प्रमाण द्यायचे झाले तर, गेल्या महिन्यात संतीष शिंदे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मुलाचा भर दिवसा भर रस्त्यावर अपघात झाला. तर नेत्यांनी आरोपींची बाजू घेतली पण कार्यकर्त्यांची बाजू घेताना त्यांना त्याचा त्याग लक्षात आला नाही. हे केवळ राष्ट्रवादीच नव्हे! तर भाजप, काँग्रेस, रिपाई, शिवसेना तो कोणताही पक्ष असो. हेच पहायला मिळते. त्यामुळे, येणार्या काळात अकोल्याचे राजकारण अजून फार पेटणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अंथरुन पाहून पाय पसरावे हीच त्यांना जाणकारांची विनंती आहे. गेल्या कित्तेक दिवसांपासून फेसबुक आणि व्हाटसअॅपवर अकोल्याच्या राजकारणावर अनेक तरुण वाद विवाद करताना दिसत आहे. वास्तवत: ज्ञान काही नाही, तत्वाने बोलणे नाही, वैचारिक ठेवण नाही, इतिहासाचा आढावा नाही. केवळ कोणीतरी पाठीवर हात ठेवला म्हणून छाती फुगवून गावभर मिरवतो आणि संध्याकाळी जुण्या जाणत्या भल्या-भल्यांचे वाभाडे ओढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, गेल्या काही वर्षात राजकारणात आयुष्य खर्ची घातलेल्या तरुणांनी आत्महत्या केल्याची उदा. आहेत. हे अभ्यासले पाहिजे. तेव्हा तालुक्यातील तरुण, शेती, उद्योगधंदे, नोकरी आणि शिक्षणाच्या नादी लागेल. अन्यथा पुर्वी पाटपाण्यासाठी वैचारिक लढाई होई आता मात्र केवळ सत्तेसाठी आणि वर्चस्वासाठी येथे मुडदे पडतील हेच वास्तव तुम्हाला येणार्या काळात पहायला मिळेल.