संगमनेरात पुन्हा३७रुग्ण, एकट्या निमोणमध्ये१४,संख्या४२६,तर५दिवसात तब्बल ११५

सार्वभौम  (संगमनेर)- 
           संगमनेर मध्ये आज पुन्हा नव्याने ३७रुग्ण आढळुन आले आहे.यामध्ये एकट्या निमोण गावातच १४कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आले आहे.निमोण येथील नऊ महिलांना कोरोनाची लागण झाली आहे तर ५पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे. मालदड रोड येथे ५१वर्षीय महिलेला. तर शिवाजीनगर येथे पुन्हा चार कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आले आहे. तर ग्रामीण भागातील नांदुरी दुमाला येथे ४७वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे.तर आज पुन्हा घुलेवाडी येथे दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आले आहे. तर शहरातील बाजारपेठ येथे ६९वर्षीय वयोवृद्धाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर जवळेकडलग येथे चार रुग्ण आढळुन आले आहे. तर शहरातील जेधे कॉलीनी येथे २५वर्षीय तरुणाला तर शहरालगत असलेल्या सुकेवाडी गावात ६०वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या ४२६वर जाऊन पोहचली आहे. तर मागील पाच दिवसात तब्बल ११५ कोरोनाबधितांचा उच्चानक गाठला आहे.
        दरम्यान, आज दुपारी आलेल्या अहवालात शहरात एका कोरोना संशयिताचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.शहरात यापूर्वी ही ८जणांना कोरोनाची लागण होऊन मयत झाली आहे.त्यामुळे शहरात एका पाठोपाठ एक कोरोनाचे धक्के बसत आहे.आजपर्यंत शहरात१७६ कोरोनाबाधीत रुग्ण आढळुन आले आहे.शहरातील चारही दिशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.तर ग्रामीण भागातील नीमोण गावाला कोरोनाने विळखा घातला आहे. निमोण गावात यापूर्वी ही ३५ रुग्ण आढळुन आले होते.त्यामध्ये आणखी १४ची भर पडून ४९ वर जाऊन पोहचली आहे. तर दोघाजणांचा कोरोनाची लागण होऊन मयत झाले आहे.  शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाची संख्या वाढतच चाल्याचे दिसत आहे. दिवसाला दोनअंकी आकडा आढळुन येत असल्याने प्रशासनाची ही डोकेदुखी वाढत आहे.आताही कोरोनाची चैन कशी तुटेल या साठी प्रशासन कसुनिशी प्रयत्न करत आहे. पण, लोकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसुन येत आहे. लोक विनाकारण घराबाहेर पडत आहे.मोठ्या संख्येत लग्नसोहळे पार पडत आहे. गावा-गावातील आपत्ती व्यवस्थापन समिती बाहेरून येणाऱ्यांना अश्रेय द्येत असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रारदुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
- सुशांत पावसे