संगमनेर शहरात दोन तर पठार भाग पुन्हा बाधित! निमोण व नांदुरखंदरमळामध्ये कोरोनाचा प्रवेश!


सार्वभौम (संगमनेर) :
                 संगमनेर तालुक्यात व शहरात आज एकूण पाच रुग्ण मिळून आले आहेत. सकाळी जनता नगर येथील लाँण्ड्री चालकास कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता सायंकाळी पुन्हा चौघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यात निमोण येथे 50 वर्षीय पुरूष, नांदुरखंदुरमाळ येथे 65 वर्षीय पुरूष तर शहरातील गणेश नगर येथे 34 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ही दोघे स्थानिक कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना बाधा झाली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात 185 रुग्ण कोरोना बाधित तर 13 जणांचा मृत्यू अशी आकडेवारी झाली आहे.
                     
दरम्यान आजच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संगमनेरला भेट दिली. तब्बल 200 रुग्णांचा पल्ला कोरोनाने पार केल्यानंतर त्यांना लक्षात आले की, आपल्याकडे संगमनेरचे देखील पालकत्व आहे. त्यामुळे त्यांनी आज संगमनेरात बैठक घेतली. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत कोरोनाला आळा कसा घालता येईल याची माहिती दिली व घेतली. मात्र, ते बैठक घेत असतानाच शहरातील जनतानगर येथे कोरोनाचा रिपोर्ट आल्याचे त्यांना समजले. ते मार्गस्त होतात कोठे नाहीतर पुन्हा चार रुग्ण मिळून आले आहे. त्यामुळे नाराज असलेेल्या संगमनेरकरांनी प्रतिक्रिया दिल्या की, पाकमंत्र्यांना कोरोणाने ही सलामी दिली आहे.