संगमनेरात कोठडीनंतर आता पोलीस ठाण्यात घुसला कोरोना, चार पोलिसांना बाधा! अकोल्यातही नऊ पॉझिटीव्ह!
सार्वभौम (अकोले) :-
संगमनेरात पोलीस कोठडी नंतर आता पोलीस ठाण्यात कोरोनाने प्रवेश केला आहे. गेल्या तीन दिवसांपुर्वी 22 आरोपींना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर ही लागण आता चार पोलिसांना झाली आहे. काल रात्री उशिरा आलेल्या अहवालात 50 जणांचे अहवाल आले आहेत. त्यात 46 जणांचे निगेटीव्ह रिपोर्ट असून चौघे बाधित असल्याचे लक्षात आले आहे. तर अकोले तालुक्यात देखील कोरोनाची आकडेवारी वाढताना दिसत आहे. रात्री अकोेले तालुक्यातील शेरणखेल येथील तब्बल 08 तर सुलतानपूर येथे एक अशा 09 जणांचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संगमनेर शहर पोलीस ठाणे असे तालुक्यातील एकमेव पोलीस ठाणे आहे. जेथे तालुक्यातील नव्हे तर उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणार्या बहुतांशी आरोपींना येथे ठेवले जाते. त्यामुळे येथे महिलांसह चार बरॅक आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे नव्याने आरोपी आणून ठेवले जात होते. त्यापैकी एका गुन्ह्यात अटक केलेल्या काही आरोपींना अटक केली असता त्यांनी कोरोनाची लागण असावी. त्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव अन्य 22 जणांना तर राहुरी आणि त्यापाठोपाठ श्रीरामपूर येथील कोठडीत देखील कोरोनाचे संक्रमण झाल्याचे पहायला मिळाले. ही कोरोनाची झडप येथेच थांबली नाही तर त्यांनी पोलिसांवर देखील चाल केली आहे. त्यामुळे संगमनेर पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी त्यात दोन महिला आणि दोन पुरूषांना बाधा झाली आहे.
तर अकोले तालुक्यातील शेरणखेल येथे एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या घरात कोरोनाने शिरकाव केला होता. त्यानंतर त्याचा प्रादुर्भाव वाढत जाऊन येथे आणखी 8 रुग्णांना कोरोनीची बाधा झाली आहे. त्यात 86 व 58 वर्षीय पुरूष, 32 वर्षीय महिला 16 वर्षीय मुलगी 52 ,40 व 30 वर्षीय पुरुष तर 13 वर्षीय मुलास कोरोनाने ग्रासले आहे. तर अकोले तालुक्यातील कळस येथील सुलतानपुरमध्ये राहणार्या 25 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर अकोले शहरासह तालुक्यातील 43 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले आहते. यात 21 रुग्ण मिळून आलेल्या माणिक ओझर येथील रिपोर्ट निगेटीव्ह आहेत. तर कोतुळ, जांभळे, बेलापुर, चितळवेडे, निळवंडे, शेरणखेल, रेडे सुलतानपुर व शहरातील शाहूनगर असे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
महत्वाचे .....
अकोले तालुक्यातील दोघांनी पत्रकारीतेची बदनामी केल्याप्रकरणी दोन ते चार उताविळ सैनिकांवर गुन्हा दाखल होणार आहे. तसे पुरावे पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात आले आहे. राजुरचा व अकोल्यातील असे काही मोबाईल नंबर यांच्या मालकांवर कारवाई होणार आहे. रात्रीतून पुराव्यांसह तक्रार दाखल.