आज संगमनेरात दिवसाखेर ५७ बाधित तर टोटल ७५८ रुग्ण, आठ पोलिसही कोरोना बाधित.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेरमध्ये आज कोरोनाने उच्चांक गाठला आहे. आज शहरासह तालुक्यात तब्बल ५७ रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. आज दुपार पर्यंतच्या अहवालात २७ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये शहरातील १५ तर ग्रामीण भागातील १२ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले होते. आता पुन्हा आलेल्या अहवालात आणखी ३० जणांची भर पडली असून यामध्ये अकोले नाका येथे ५३ व ३८ वर्षीय महिला.शहरातील मध्यभागी असलेल्या नविन नगररोड येथे ६१ वर्षीय महीला. तर जम-जम कॉलनी येथे १७ वर्षीय युवक,१३ वर्षीय युवती, ४० वर्षीय पुरुष तर कनोली येथे ३० वर्षीय महिला तर शहरातील मालदाड रोड येथे ३५ वर्षीय पुरुष, तर शहरालगत असलेल्या घुलेवाडी गावात कोरोनाची घोडदौड सुरूच आहे. आज पुन्हा नव्याने आठ रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये ४३ व ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर ३७, ४२, ५३, ५१, ५० वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. तर कोल्हेवाडी येथे ४६ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर निंबाळे येथे ३० वर्षीय महिलेला व ५ वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा झाली आहे.
तर तालुक्यातील पठारभागावर ही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आंबीखालसा येथे ४ महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहरातील घासबाजार येथे ७५ वर्षीय इसमाला कोरोनाची बाधा झाली आहे. इंदिरानगर येथे ३८ वर्षीय महिला तर शिवाजी नगर येथे २० वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबधितांचा आकडा आता ७५८ वर जाऊन पोहचला आहे. तर १९ जणांची कोरोनाने मयत झाली आहे. आतापर्यंत ५२७ जणांनी कोरोनावर मात करत ठणठणीत झाले आहे. तर २१२ जण उपचार घेत आहेत.
दरम्यान, शहरात रोजच कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येत आहेत. शहरात आतापर्यंत ३३३ कोरोनाबाधीत रुग्न आढळून आले तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात गल्ली पासून ते चौकापर्यंत अनेक कंटेन्मेंट झोन केले तरी देखील कोरोना थांबायचे नाव घेत नाही. शहरातील प्रशासकीय कार्यलयात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढतच चाली आहे. शहरालगत असलेल्या घुलेवाडी गावात कोरोनाचा आकडा आगेकूच करत आहे. गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीने अनेक वेळेस गावबंद केले तरी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव येथे कमी होताना दिसत नाही. रोज एका कुटुंबातील येथे कोरोनाचा रुग्ण आढळून येत आहे. घुलेवाडी येथे आजपर्यंत ४८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर एकजनाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे घुलेवाडी येथील स्थानिक प्रशासनाच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
- सुशांत पावसे