संगमनेरात 19 बाधित 12 बरे.! रायतेवाडीत एका कुटुंबावर कोरोनाचे राज्य.! अकोल्यात दोघांची कोरोनावर मात.!
सार्वभौम (संगमनेर):-
संगमनेरमध्ये कोरोना विषाणुचा सर्वत्र फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. रोज एका नवीन गावासह शासकीय कार्यलयात ही कोरोनाचा शिरकाव होत आहे. काल ३० जणांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. त्या पाठोपाठ आज पुन्हा 19 रुग्ण नव्याने कोरोना बाधीत आढळून आले आहे. यामध्ये ओझर खुर्द 3 तर निमोण 1 व रायतेवाडी येथे एकाच कुटुंबातील 7सदस्य कोरोना बाधीत आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबधितांच्या संख्येत 19 ने भर पडून ती संख्या 698 वर जाऊन पोहचली आहे. तर आज १२ रुग्णांनी कोरोनावर मात करून ठणठणीत झाले आहे. तर निमोण येथे पाच रुग्ण अधिकचे वाढले असून त्यात 82 वर्षीय वृद्ध तर 15, 10, 15 तीनही मुले आहेत. तर साहेबांच्या जोर्वे गावात ३६ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ढोलेवाडीत २५ वर्षीय तरुण तर कुरण येथे 45 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. हे अहवाल संगमनेर प्रशासनाला नुकतेच प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या रायतवाडी गावात एकाच कुटुंबातील सात सदस्य कोरोनाबाधीत आढळून आले आहे. रविवार दि.२६ रोजी रायतवाडी येथे एक कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या १२ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी ७ जणांचा अहवाल पॉसिटिव्ह आला तर पाच जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, तालुक्यातील निमोण येथे कोरोनाबधितांची घोडदौड सुरूच आहे. निमोण येथे यापूर्वी ५१ रुग्ण आढळून आले आहे, त्यामध्ये आणखी एकाची भर पडली आहे, तर दोघांना कोरोनाचे संक्रमण होऊन मयत झाले आहे. निमोण गावात आता कोरोना थांबायचे नाव घेत नाही. येथील तलाठी याना देखील कोरोनाची बाधा झाली होती त्यामुळे स्थानिक प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढत आहे.जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत कोरोनाच्या रुग्ण संख्येत ४० ने वाढ झाली आहे. तर आनंदाची बातमी अशी की, आज जिल्ह्यातील २२८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २ हजार ९४९ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये श्रीगोंदा तालुक्यात 6 रुग्ण मिळून आले आहेत. त्यात श्रीगोंदा शहर 1, काष्टी 2, जंगलेवाडी 3, अहमदनगर शहरात 10 रुग्ण मिळाले आहेत. त्यात पोलीस हेड कॉर्टर 1, कवडे नगर 1, सावेडी रोड 1, सारस नगर 1, अहमदनगर 2, केडगाव 1, माळीवाडा 1, शिवाजीनगर 1, रेल्वे स्टेशन 1, नगर ग्रामीणमध्ये बुऱ्हानगर 1, नवनागापूर 1, तर जामखेड तालुक्यात दिगाव 1, भिंगारमध्ये 3 त्यात मोमीन गल्ली 1, कँटोन्मेंट हॉस्पीटल कॉर्टर 1, नेहरू कॉलनी 1, पाथर्डी शहरात 1, नेवासा तालुक्यात पाच रुग्ण आढळले असून अंतरवलीत 1, कुकाणा 3, जळका 1, राहता तालुक्यातील शिर्डी 1, संगमनेर तालुक्यात कोरोनाची दहशत कायम राहिली आहे. येथे पुन्हा 11 रुग्ण मिळून आले आहेत. त्यात ओझर खुर्द 3, निमोण 1, रायतेवाडी 7 असे जिल्हाभर ४० रुग्ण मिळून आले आहेत. तर जिल्ह्यात बरे झालेली रुग्ण संख्या २ हजार ९४९ आहे. तसेच आत्तापर्यंत उपचार सुरू असलेले रुग्ण: १ हजार २१६ इतके आहेत. तर आजवर ६० जणांचा मृत्यू झाला आहे तर आत्तापर्यंत एकूण रुग्ण संख्या ४ हजार २२५ इतकी आहे.
दरम्यान, आज २२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळलेल्या २२२ आणि अँटीजेन चाचणीत बाधीत आढळलेले ०६ रूग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये, मनपा ११४, संगमनेर १२, राहाता २६, पाथर्डी ३, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २, पारनेर ८, राहुरी १०, शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा २, कर्जत ३, अकोले २ रुग्णांचा समावेश आहे.- सुशांत पावसे