संगमनेरात दोन तलाठ्यांना कोरोनाची बाधा! मॅडमचे बाळही पॉझिटीव्ह! आम्ही मैदान सोडले नाही, तुम्ही फक्त लढ म्हणा!

- सागर शिंदे
सार्वभौम (संगमनेर) :-
                    संगमनेरात कोरोनाचा कहर सुरू असताना एक वेदनादायी माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव आहे. त्या दोन्ही ठिकाणचे तलाठी कोरोना बाधित असल्याचे लक्षात आले आहे. इतके काय! यात एक महिला अधिकारी असून एका मातृत्वामुळे त्या माऊलीच्या अवघ्या 10 वर्षीय मुलास देखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनात खळबळ नाही तर प्रचंड भावनिक व हळवे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, काही झाले तरी आम्ही जनतेला वार्‍यावर सोडणार नाही. उद्या कोरोनाला हरवून पुन्हा जनतेच्या सुरक्षेसाठी नव्या दमाने उभे राहू, तुम्ही फक्त लढ म्हणा अशी कणखर प्रतिक्रिया या कोविड योद्ध्यांनी दिली आहे. यात संगमनेर शहराचे तलाठी महोदय आणि निमोण येथील महिला तलाठी हे कोविडशी दोन हात करताना बाधित झाले आहे. तर या माऊलीच्या मुलाला देखील कोरोनाची बाधा झाल्याने मोठे दु:ख व्यतीत करण्यात येत आहे.
निमोण हे संगमनेर तालुक्यातील गाव, पहिल्यांदा एका टपरी चालकाला कोरोनाची बाधा झाली आणि तेथून येथे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्याच शेजारी असलेल्या एका पोलीस कुटुंबाला कोरोनाने घेरले. दुर्दैव असे की ही दोघे मयत झाली. त्या पाठोपाठ येथे 49 रुग्ण मिळून आले आहेत. त्यात 23 जण बरे झाले आहेत. तर 24 जणांवर उपचार सुरू आहेत. येथे कोरोनाची इतकी बिकट परिस्थिती असताना देखील तलाठी मॅडम यांनी कधी स्वत:ला जपवून काम केले नाही. प्रत्येक घरापर्यंत जाणे, बरे वाईट विचारणे, क्षेत्र बंधिस्त करणे, प्रत्येकाच्या आरोग्याची विचारपूस करणे अशा अनेक कामांनी त्यांना रोज पळता भूई थोडी होत होती. शासकीय नियमांचे पालन आणि अंमलबजावणी करताना एक महिला म्हणून त्या अगदी कोठेच कमी पडल्या नाही. अर्थात घरात बसतो त्याला कोरोना होईल कसा ? मात्र, जो मैदानात लढतो त्यालाच बाधा होऊ शकते. त्यामुळे कोरोनाशी लढणाऱ्या या "रणरागिनिला" पहिला सॅल्युट केलाच पाहिजे.
                 
खरंतर असे म्हटले जाते, "स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी" त्यामुळे "आई" शिवाय कोणी आनंदाने जगले असे शोधून उदा. सापडणार नाही. असेच एक मातृत्वाचे दर्शन कोविडने दाखवून दिले आहे. कारण, आता एक तलाठी अधिकारी नंतर मात्र, एक आई म्हणून त्या जेव्हा घरी जात असे तेव्हा त्यांच्या लाडला त्यांची वाट पाहत बसलेला असे. त्यामुळे कामावर असताना देव जाणे कोठे बाधा झाली आणि ही माऊली घरी गेली तर मोठा प्रेमाने तिचे लेकरु आईच्या कुशीत शिरले. या निर्दयी कोरोनाने आईसह त्या दहा वर्षाच्या चिमुरड्याला देखील आपली शिकार केली. जेव्हा एक सरकारी अधिकारी म्हणून त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तेव्हा त्यांना फारसे दु:ख झाले नसेल. मात्र, एका नोकरीमुळे आपल्या पोटच्या लेकराला शेजारच्या बेडवर पाहण्याची वेळ आली, त्यातल्या त्यात त्यास डोळ्याने पाहता येते मात्र, त्याच्या डोक्याहून ना मायेचा हात फिरवू शकते ना त्याला ती माऊली कवटाळू शकतेे. हे दु:ख एक आईचे काळीजच जाणू शकते. त्यामुळे, जेव्हा कधी कोरोनाशी दोन हात करणारे अन्य व्यक्ती आपल्याला दिसतील तेव्हा त्यांच्याशी प्रेमाणे बोला, त्यांना आधार द्या, त्यांचे धैर्य वाढवा, एक सरकारी नोकर म्हणून त्यांच्याकडे पहाल तर तुमच्या इकचे निर्दयी आणि दगडी काळजाचे दुसरे कोणी नसेल.! दुवा करु हे मायलेक लवकर घरी येवोत.!
           त्याच बरोबर संगमनेर शहरात देखील कोरोनाचा अक्षरश: अतिरेख झाला आहे. याला प्रशासन जबाबदार नाही. तर बेजबाबदार नागरिक कोरोनाचे बळी ठरत आहे. असे म्हटल्यास काही वावघे ठरु शकत नाही. तरी देखील प्रशासकीय अधिकारी कोरोनापुढे आपली ढाल घेऊन धैर्याने उभे आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, निव्वळ संगमनेर शहरात 187 रुग्ण असून त्यापैकी 110 बरे झाले आहेत तर 69 रुग्ण उपचार घेत असून आठ जणांनी कोरोनापुढे आपले गुढगे टेकले आहेत. तरी देखील प्रशासकी अधिकारी व कर्मचारी कोरोनापुढे हार मानायला तयार नाहीत. असाच एक योद्धा म्हणून ज्यांचे नाव घेता येईल. ते म्हणजे शहरातील तलाठी महोदय.! काल यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजले आणि धक्का नाही परंतु फार आत्मियता वाटली. अर्थातच धक्का का बसावा? ज्यांचे युद्ध मैदानात आहेे. ज्यांना दुष्मण माहिती असून देखील ते पाय रवून त्याच्याशी टक्कर देत आहे. आज ना उद्या या रणमैदानी कोठून ना कोठून वार होणार हे गृहीत आहे. तरी देखील ते मैदान सोडून पळाले नाही. म्हणून तर त्यांना कोविड योद्धा म्हणून गौरविले आहे. खरंतर या तलाठी साहेबांनी अगदी पहिल्या दिवसापासून तर अगदी कालपर्यंत अथक परिश्रम घेऊन क्षेत्र प्रतिबंधित करणे, या भागांना घरपोच सेवा देणे, लॉकडाऊन असताना अडकलेल्या कामगारांना त्यांच्या गावी पाठविणे अशी अनेक कामे केली आहेत.
                 अर्थात ही जंग कशासाठी आणि कोणासाठी आहे? तर ती घरात बसलेल्या प्रत्येकासाठी आहे, कामावर आलेल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे, दोन वेळच्या रोजी-रोटीसाठी घराबाहेर पडणार्‍या मजुरांसाठी आहे. कारण, जोवर हे योद्धे शहराच्या गल्ली बोळात उभे आहेत तोवर तुम्ही घरात आणि दारात सुरक्षित आहात. म्हणून ज्या तलाठी महोदयांना कोरोना झाला त्या योद्ध्याला खरोखर "रोखठोक सार्वभौम" सॅल्युट करत आहे. साहेब तुम्ही लवकर बरे व्हा. येथील प्रत्येक सामान्य नागरिक तुमच्यासाठी "दुवा" करेल आणि तेथील प्रत्येक डॉक्टर तुमच्यासाठी "दवा" उभी करेल. हे संगमनेर तुमच्या पाठीवर हात ठेऊन पुन्हा लढ म्हणण्याची वाट पाहते आहे.

  • या पलिकडे गेल्या महिन्यात एका नायब तहसिलदार यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय करण्यात आला तो अतिशय निंदनिय होता. त्यांच्या समर्थनार्थ जसे प्रशासन एकवटले तसे आता या कोविड योद्ध्यांसाठी जनतेने एकवटने गरजेचे आहे. प्रशासनाला सध्या धारेवर नव्हे तर धिर देणे गरजेचे आहे. तसेच पोलीस खात्यातील देखील दोन महिला पोलिसांचे रिपार्ट फार संशयित होते. खात्याच्या मनात धकधूक होती. मात्र, सुदैवाने त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. खरंतर आजवर ज्यांनी-ज्यांनी अगदी स्वत:ला झोकून देत कोरोनाच्या लढाईत आपल्या तन, मन, धनाचे योगदान दिले आहे. अशा योद्ध्यांना संगमनेरकर अगदी कधीच विसरणार नाही. अधिकारी येतील जातील मात्र, ज्यांनी दिवसरात्र मैदान सोडून पळ न काढता धैर्याने संगमनेर वासियांचे संरक्षण केले. त्या प्रत्येकाचे येथील नागरिक ऋणी राहिल. अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेप्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडित, बीडीओ शिंदे साहेब, आरोग्य अधिकारी डॉ. भवर, डॉ. कचेरिया, डॉ. घोलप, पोलीस निरीक्षक अभय परमार, सहा. पोलिस निरीक्षक पप्पू कादरी यांच्यासह ज्ञात अज्ञात अधिकारी व समाजसेवक, यांचे मन:पुर्वक आभार. 

- तुम्हास उदंड आयुष्य लाभो..!!
- सागर शिंदे
--------------------------------------
 आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 75 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 75 लाख वाचक)