आरे बाप रे! अकोल्यातील ब्राम्हणवाडा येथे दोन तर संगमनेरात आज 13 रुग्ण पॉझिटीव्ह! कुरण, घुलेवाडी, गुंजाळवाडी, श्रमीकनगर बाधित.!


सार्वभौम (संगमनेर) :
                    संगमनेर तालुक्यातील आज कोरोनाचा बाँम्ब फुटला आहे. कारण एकाच दिवसात सहा ठिकाणी 13 रुग्ण पॉझिटीव्ह मिळून आले आहेत. यात कुरण येथे आठ, घुलेवाडी येथे 1, संगमनेर खुर्द येथे 1, गुंजाळवाडी (विठ्ठलनगर) येथे 1, संगमनेर शहरातील रेहमत नगर व  श्रमीकनगर येथे प्रत्येकी एक अशा 13 जणांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे, संगमनेरात एकच खळबळ  उडाली असून प्रशासनाने संबंधित बाधित ठिकाणी धाव घेतली असून या व्यक्तींच्या संपर्कात कोण-कोण आले आहे. याचा शोध सुरू केला आहे. या 13 जणांमुळे आता संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 126 वर गेली आहे. तर 11 मयत झालेले आहेत.  तर अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील  दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. जो व्यक्ती मुंबईहून आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या 30 व २५ वर्षीय दोन भावांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे त्यामुळे एकाच कुटुंबातील ते चौघे आता कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. 
                   
 कसारा दुमाला येथे आता कोरोनाने नव्याने शिरकाव केला आहे. कसारा दुमाला येथील एका इसमाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल काल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे तो ज्या भागात मिळून आला आहे. तेथील काही भाग संशयित वाटला तर तो सील होण्याची शक्यता आहे. या कोरोना बाधित व्यक्तीमुळे संगमनेर तालुक्यात 113 रुग्ण बाधित त 11 मयत झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
काल दुपारी सय्यदबाबा चौक येथील 70 वर्षीय तर कुरण येथील 63 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तेथील माहिती घेत असताना प्रतिबंधात्मक उपाय सुरू असतानाच सायंकाळी उशिरा आणखी एक कोरोनाबाधीत व्यक्ती कसारादुमाला येथे आढळुन आला आहे. त्यानंतर आज तो कोरोनाने हाद्दच पार केली आहे. आज एकाच दिवशी 13 रुग्ण मिळून आले असून त्यात शहरातील तीन तर तालुक्यात 10 जणांचा सामावेश आहे.
                 
आता  संगमनेर शहरात 68 कोरोना बाधित असून त्यातील 62 जण मुळ रहिवासी आहेत. धांदफळ येथे 8 जण, निमोण 11, घुलेवाडी 2, केळेवाडी 1, निंबाळे 1, आश्वी बु 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 3, शेडगाव 3, पळसखेडे 3, जोर्वे 1, खळी 1, गुंजाळवाडी 1, कुरण 7, पिंपारणे 1, साकूर 1, पेमरेवाडी 1, कसारा दुमाला 1 तर आज मिळून आलेले 13 असे एकूण 126 रुग्ण संगमनेर तालुक्यात मिळून आले आहेत. यात आज कुरण येथे 8, घुलेवाडी येथे 1, संगमनेर खुर्द येथे 1, गुंजाळवाडी (विठ्ठलनगर) येथे 1, संगमनेर शहरातील रेहमत नगर व  श्रमीकनगर येथे प्रत्येकी एक अशा 13 जणांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले आहेत.