मामा व आजोबानेच केल्या नातवाच्या कोयत्याने खांडोळ्या, अवघ्या तासात वाकीची गुन्हा उघड, दोघांना अटक

- सागर  शिंदे
सार्वभौम (राजूर) :
               अकोले तालुक्यातील वाकी परिसरात कृष्णावंती नदित एका 25 वर्ष तरुणाचे तुकडे-तुकडे करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली होती. हा गुन्हा डिटेक्ट करणे हे मोठे आव्हाण असताना ते राजूर पोलिसांनी स्विकारत मुलाची ओळख पटवून दोन  आरोपी देखील अटक केले आहेत. यात नगरचे एलसीबी यांनी देखील मोलाची कामगिरी केली आहे त्यामुळे अवघ्या काही तासात या गुन्ह्याचा छडा लागला असून  पोलिसांचे खरोखर कौतुक होत आहे. हा मयत व्यक्ती अकोले तालुक्यातील खिरविरे येथील असून प्रदिप सुरेश भांगरे (वय 25) असे मयताचे नाव आहे. तर त्याचा खून करणारे कमलाकर हनुमंत डगळे (वय 70) व हरि कमलाकर डगळे (दोघेे, रा. खिरविरे) अशी आरोपींची नावे आहेत. 
                     
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रदिप भांगरे हा कमलाकर डगळे याच्या मुलीचा मुलगा आहे. त्याचे आणि कमलाकर याचे गेल्या चार महिन्यापुर्वी किरकोळ वाद झाले होते. तेव्हा या मुलाने त्याच्या मानगुटीवर पाय दिला होता. तेव्हा कमलाकर मोठ्याने ओरडला म्हणून त्यांने त्यास सोडले. हा सर्व प्रकार केवळ दारुच्या पैशासाठी झाला होता. दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसांपुर्वी यांच्यात पुन्हा वाद झाले होते. तेव्हा प्रदिप याने कमलाकर यास मारहाण केली होती. हा राग त्याला आला होता. अर्थात कमलाकर हा फार गुन्हेगारी वृत्तीचा म्हतारा आहे. त्यामुळे त्याने या नातवाला एकटे पाहून त्याच्या डोक्यात कोयत्याचा घाव घातला. त्यांचे घर फोरच मोठे असल्यामुळे त्यांना त्याचे घरातच तुकडे केले. दरम्यान प्रदिपला मारुन टाकल्यानंतर त्यांची विल्हेवाट कशी लावायची हे त्यांना समजेनासे झाले. तो नातू मयत झाल्यानंतर त्याने यातून बजाव करण्यासाठी त्याचा मुलगा हरि कमलाकर यास घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या दोघांनी मिळून प्रदिपच्या मृतदेडाच्या खांडोळ्या करीत दोन गोण्यांमध्ये भरल्या आणि सुमसाम परिस्थितीत पाहत यांनी हा मृतदेह वाकी परिसरातील कृष्णावंती नदीत नेवून टाकला.
                           
दरम्यान दोन-तीन दिवसानंतर दोन गोण्या पाण्यावर तरंगताना दिसून आल्या, त्यामुळे स्थानिक लोकांची याची माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत अतिशय सुक्ष्म पद्धतीने या घटनेचा निरीक्षण केलेे. आपल्या परिसरात कोणी मिसिंग आहे. याचा शोध त्यांनी घेतला आसता त्यांना खिरविरे येथील प्रदिप नामक मुलगा हरविल्याचे समजले. याच परिसरात एक गाडी देखील संशयास्पद मिळून आली होती. मात्र, जो मयत झाला होता त्याच्या खांडोळ्या-खांडोळ्या केल्यामुळे त्याची ओळख होणे कठीण होती. त्यामुळे, त्याच्या नातेवाईक आणि मयताचा डिएनए तपासणी करण्यात पोलिसांनी धन्यता मानला. नंतर हा गुन्हा हळुहळू उघड होत गेला.
                           
दरम्यान हा प्रकार पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांना समजताच त्यांनी थेट राजूर गाठले. त्यांच्यासह अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील व पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत यांनी तेथे  एक दिवसाचा मुक्काम करीत तपासाची चक्रे फिरविली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमणे यांनी या गुन्ह्यात समांतर तपास करीत आज दुपारी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
हा गुन्हा फार गुंतागुंतीचा होता. तसेच मयताची ओळख होण्यापासून ते त्याचा खुनी शोधण्यापर्यंत सर्व चॅलेंजींग होते. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी योग्यवेळी लावलेले अंदाज या गुन्ह्याच्या उकल करण्यापर्यंत घेऊन गेले. त्यामुळे त्यांचे लोकप्रतिनिधी आणि गावकर्‍यांची आभार मानले आहे.

--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 61 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 64 लाख वाचक)