अकोल्यात कोरोनाने ठोकले शतक.! पुन्हा १४ रुग्ण, राजूूर, निब्रळ नव्याने बाधित, चिमुरड्यांना बाधा

 

सार्वभौम (राजूर) :- 
              राजूर पासून 4 कीमी अंतरावर असलेले माणिक ओझर गावात पुन्हा 10 रुग्ण कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहेत तर यापुर्वी येथे 11 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. तर राजूर येथे देखील त्या ८० वर्षाच्या वृद्ध महिलेनंतर आणखी दोन जण कोरोना बाधित आढळले आहे. हे बाधित व्यक्ती सिन्नर येथे कामाला होते, त्यांना काही दिवसांपुर्वी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे, राजुरकरांणी आता बेफिकीर राहून चालणार नाही. आपली काळजी घ्यावी, गर्दी टाळावी, सुरक्षित अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, सॉनिटायझरने हात स्वच्छ करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कारण, हे रुग्ण राजूरमध्ये फिरले असावेत असे बोलले जात आहे. आता या वाढत्या संख्येने अकोले तालुक्यात कोरोनाने शंभरी पूर्ण केली आहे. तालुक्यात कोरोनाचे शतक ठोकले आहे. गेल्या तीन महिण्यात एकही रुग्ण नसलेल्या तालुक्यात कोरोनाची शतकी खेळी झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही संख्या आता 110 वर जाऊन पोहचली आहे. तर जरी रुग्णांची संख्या वाढती असली तरी रुग्ण बरे होऊन घरी येण्याची संख्या चांगली आहे. तालुक्यात केवळ ३ जणांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. 
     दरम्यान काल रात्री आलेल्या अहवालात संगमनेरात ५४ तर अकोल्यात १४ रुग्ण मिळून आले आहेत. यात माणिक ओझर येथील तब्बल 10 रूग्ण असून राजूर येथील 2, वाघापूर व निब्रळ 1 आहे रुग्णांचा सामावेश आहे. असे एकूण 14 जणांचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. माणिक ओझर येथील 42 वर्षीय पुरुष तर  34, 33 22 वर्षीय तरुणांचा सामावेश आहे. तसेच 60 वर्षीय वृद्ध तर 48 वर्षीय महिला व  37 वर्षीय तरुणीचा सामावेश आहे. तर धक्कादायक माहिती अशी की यात अवघे 14 वर्षीय 5  व 1 वर्षीय चिमुरडे यांना देखील कोरोनाचे ग्रहण लागले आहे. तर राजूर येथील 60 वर्षीय वृद्ध व 30 वर्षीय तरुण याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. वाघापूर येथील 45 वर्षीय व निब्रळ येथील 21 वर्षीय तरुणाचा अहवाल पॅाझीटिव्ह आला आहे.
          दरम्यान राजूर गाव बंद ठेवल्यामुळे आमदार यांनी प्रशासनाला जाब विचारला होता. त्यानंतर ग्रामपंचायत, प्रशासन आणि आमदार यांच्यात खडाजंगी सुरु असताना त्यात माजी आमदारांनी उडी मारली आणि प्रकरण थेट कलेक्टरांच्या दालनात गेले. परंतु यावर काही सोलूशन तर निघाले नाही. मात्र त्यावर राजकारण चांगलेच रंगले. आता येथे त्या बऱ्या झालेल्या आजाबाई नंतर पुन्हा दोन रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे राजूर गाव बंद करणार की आहे असेच सुरु ठेवणावर यावर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
- आकाश देशमुख