अबब.! संगमनेरात आठ दिवसात नऊ कारवाया, 42 जणावरे, दोनशे किलो मांस, 24 लाख 31 हजारांचा मुद्देमाल आणि 12 जणांवर गुन्हे!


सार्वभौम (संगमनेर)- 
                       देशात जेव्हा पुर्णपणे स्थिरावला होता. तेव्हा देखील संगमनेरातील दस नंबरी मटन राज्यातील बड्या शहरांना पोहचविले जात होते. कोणी फळांच्या गाड्यांना परवानेे घेऊन मांस भरले तर कोणी पालेभाज्यांच्या नावाखाली मयनाची आयात निर्यात केली. म्हणजे जीवेपेक्षा हे खाणे किती प्रिय आहे. हे लक्षात येते. त्यामुळेच तर एकडचा कोरोना तिकडे आणि तिकडचा इकडे हे देखील येथे पहायला मिळाले. आता तुमच्या समोर एक धक्कादायक माहिती येते की, गेल्या आठवडाभरात  संगमनेर, अकोले येथे कत्तलखाण्याच जाणार्‍या जणावरांबाबात नऊ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात 42 जणावरांना पोलिसांनी जीवनदान दिले असून या कारवाईत 24 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 5 लाख रुपयांचे मांस जप्त करण्यात आले असून सर्व गुन्ह्यात 12 जणांना आरोपी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात संगमनेर शहरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. तर लोणी व अकोले येथे प्रत्येकी एक गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. 

संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथे 21 जुलै पोलिसांनी छापा टाकला असता तेथे 90 हजार रुपये किमतीचे तीन बैल व तीन गोर्‍हे असा मुद्देमाल मिळून आला आहे. याप्रकरणी तौफीक कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर त्या पाठोपाठ शहरातच जमजम कॉलनी येथे 21 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी छापा टाकला. त्यात दोन वासरांची कत्तल करण्यापासून सुटका करण्यात आली आहे. तर याप्रकरणी कमर अली (रा. मदिनानगर, संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या छाप्यानंतर पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी पुन्हा 22 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जमजम कॉलनी परिसरात मोठा छापा टाकला होता. यात दिड लाख रुपयांचे मांस त्या ठिकाणाहून हस्तगत केले होते. याप्रकरणी जहिर कुरेशी (रा. मदीनानगर, संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा कारवाईचा धडाका सुरू असताना संगमनेर ग्रामीण पोलिसांनी देखील कारवाई सुरू केली. 22 जुलै रोजी कर्‍हेफाटा येथे एक वाहन पकडून त्यातील तीन गाई कत्तलखाण्यात नेण्यापासून पोलिसांनी वाचविल्या. यात निलेश गोविंद वाबळे (रा. शिंगवा, निफाड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले होता. 
या पाठोपाठ ग्रामीण पोलिसांंनी दुसरी कारवाई केली. 22 जुलै रोजी 12 वाजण्याच्या सुमारास वडगाव फाटा या परिसरात पोलिसांनी कारवाई केली. त्यात तीन बैलांसह एक पिकअप गाडी पोलिसांनी जप्त केली तर विनायक भागवत मोरे (रा. धामोरी, ता, कोपरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर लोणी पोलीस ठाण्याच्या हाद्दीत संगमनेर रोडवर त्यांनी देखील प्राण्यांना निर्दंंयीपणे वागविणे याप्रकरणी 24 जुलै रोजी करारवाई करण्यात आली. यात 24 गोवंश जातीचे जाणावरे ताब्यात घेण्यात आले. यात अजिम अईम कुरेशी (रा. राहाता) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर पोलिसांनी जमजम कॉलनीत चांगलाच धडाका धरुन कारवाया केल्या आहेत. त्यात 27 जुलै रोजी या ठिकाणी छापा टाकून 3 लाख किमतीचे दिड हजार किलो मांस जप्त केले आहे. याप्रकरणी जहिर कुरेशी (रा. संगमनेर) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर संगमनेर, लोणी नंतर अकोल्यात देखील काही समाजसेवकांनी कत्तलखाण्यात चालविलेली जनावरे पकडली आहेत. ही कारवाई 28 जुलै रोजी 3 वाजण्याच्या सुमारास केली. यात तीन गाया व एक टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून 1 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी दौलत हरिभाऊ जाधव (रा. धामनगाव आवारी, ता, अकोले) व अन्य एक इसम अशा दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
 तर संगमनेर तालुक्यात पोखरी हवेली येथे 28 जुलै रोजी 10 वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे. त्यात चार जणावरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी इमरान अफजल सय्यद, (रा. कुरण), राजू बबन जाधव (रा. कुरण) व इरफान युसूफ शेख (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) अशा तिघांना आरोपी करण्यात आले आहे.
वरील आकडेवारी आणि कारवाई लक्षात घेता येथे किती मोठ्या प्रमाणावर कत्तलखाने आणि जणावरांची हत्या होते. हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. खरंतर यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, संगमनेरचे स्थानिक राजकारण सर्वश्रृत आहे. त्यामुळे झाकली मुठ सव्वा लाखाची असे म्हणत नगरपलिका गप गुमान राहण्याची भुमिका घेते. जर या कत्तलखाण्यांना पाणी कोण देते, लाईट कोणाची जाते, बांधकाम परवाणे कोणी दिले, जागा कोणाच्या आहेत असे अनेक प्रश्न बाहेर काढले की पुन्हा गणित मतांच्या गोळाबेरजेवर जाते. त्यामुळे खावो, पिओ अ‍ॅश करो. अशाच राजकीय वरदहस्त असल्याने अधिकार्‍यांना येथे दोष देऊन उपयोग नाही. कारण, काही अधिकारी देखील शासनाचे काम करुन प्रशासकीय खुर्चांवर बसले असून ते अधिकारी कमी मात्र कार्यकर्ते म्हणून स्वत:ची भूमिका पार पाडताना दिसत आहे. या सर्वांत शेकडो मुक्या प्राण्यांचा जीव जात आहे. याचे पातक आयुष्यात कसे बाहेर पडले ते वरच्याला माहित.!