संगमनेरात कोरोनाचा 302 होऊनही 40 जणांवर फायर! अकोल्यात कळंबसह चार रुग्ण! अकोले सोमवारपर्यंत बंदच!


सार्वभौम (संगमनेर) :-
                     संगमनेर शहरात व तालुक्यात पुन्हा नव्याने 20 रुग्ण मिळून आले आहेत. आज सकाळपासून 20 व रात्री 20 असे एकाच दिवशी 40 रुग्ण संगमनेर तालुक्यात मिळून आले आहेत. त्यामुळे काल 48 तर आज 40 त्यामुळे येथे खरोखर कोविड संदर्भात नव्याने यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. अन्यथा आता दिवसभरातील अर्धशतकाचा आकडा शतकावर जाऊन पोहचेल. त्यामुळे दुर्घटनासे सावधानी भली. असे म्हणत येथे नव्याने कोविड यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आता काल 302 चा आकडा पार करुन देखील नव्याने 40 रुग्णांची भर पडताना दिसत आहे. 
                             
आज गुरुवार दि.16 रोजी संध्याकाळी उशिरा काही रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यानुसार संगमनेर शहरातील बागवानपुरा येथे 27, 50, 45 वर्षीय  अशा तीन महिला, 45 वर्षीय पुरुष, सय्यद बाबा चौक येथे 49 व 25 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला कोरोनाबाधित मिळून आले आहेत तर तालुक्यातील कुरण येथे 27 व 19 वर्षीय तरुणीला कोरानाची लागण झाली आहे. तसेच राजापूर येथे 38 वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे 16 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे 58 वर्षीय महिला, सुकेवाडी येथे 61 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे. तर संगमनेरमध्ये रॅपीड अ‍ॅन्टीजन्स टेस्ट घेण्यात आली होती. त्यात निमोण येथील 36, 40, 11, 11 वर्षीय पुरुष आणि 61, 75, 09 वर्षीय महिला अशा एकूण सात जणांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर नगरचे 13 आणि निमोणचे 7 अशा 20 जणांना आज रात्री कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर आज दिवसभरात 40 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
                            तर अकोले तालुक्याचा विचार करता आज तेथे दोन देवठाण दोन तर कळंब येथे एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. तर आणखी एका व्यक्तीला कोरोना झाला असला तरी ती व्यक्ती गेल्या कित्तेक दिवसांपासून सांगमनेरला राहत आहे. त्यामुळे ती गणना घुलेवाडीत झाली आहे. त्यामुळे असे चार रुग्ण एकाच दिवशी मिळून आले आहेत. तर अकोले शहरात कारखाना रोड येथे ज्या काही संशयितांचे स्वॅब नेले आहे. त्यात दोन व्यक्तींना बाधा असण्याची शक्यात आहे. संगमनेरचे पाच व अकोल्याचे दोन अशा सात जणांची पुन्हा टेस्ट होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जोवर ते रिपोर्ट प्राप्त होत नाहीत. तोवर अकोले शहर बंद ठेवणे हाच महत्वाचे ठरणार आहे.
                           
एक विशेेष बाब म्हणजे जेव्हा शहरात एक रूग्ण सापडला तेव्हा अनेकजण पुढे आले संगनमताने अकोले सात दिवस बंद करण्याचा निर्णय झाला. मात्र, दुर्दैव असे की अवघ्या मंगळवारी झालेला निर्णय काही व्यक्तींना चार दिवसात जड होऊ लागला आहे. त्यामुळे अकोल्याची बाजारपेठ खुली करायची का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. म्हणजे संगमनेरात काही व्यक्तींना पैशाचा मोह अनावर झाला आणि त्याचे फळ आता दिसतेच आहे. तेच चित्र काही व्यक्तींना पहायचे आहे की काय? असा प्रश्न पडला आहे. म्हणजे अकोले बंद करण्याची घाई आणि चालु करण्याची देखील घाईल. ही मानवी दुटप्पी धोरणी भूमिका बदली पाहिजे. यामागे केवळ काही लोक राजकारण करु पाहत असल्याचे दिसत आहे. मात्र, अकोले बंद करण्यासाठी काही खर्‍या समाजसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. त्याना अनेकांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत अकोले बंदच राहणार आहे.