अकोल्यातील पिंपळगाव निपाणी कांदा व्यापारी व त्याच्या पत्नीस तर धुमाळवाडीत कोरोनाची बाधा!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर शहराला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहेे. शहरात पंजाबी कॉलनीत दोन रूग्ण तर ढोलेवाडी येथे एक असे तीन रुग्ण मिळून आले असून अकोले तालुक्यात पिंपळगाव निपाणी येथे कांद्याचे व्यापारी व त्याच्या पत्नीस देखील कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच बरोबर धुमाळवाडी येथे एका महिलेला कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यांचे एका खाजगी रुग्णालयात स्वॅब घेण्यात आले असून ते रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील एक कांद्याचे व्यापारी (वय 35) आहेत. त्यांचे रोज संगमनेर मार्केटयार्ड येथे ये-जा असते. तेथे त्यांना कोरोनाची लगण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वी त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांनी संगमनेर तालुक्यातील एका खजगी रुग्णालयात उपाचार घेणे सुरू केले होते. दरम्यान त्यांचा स्वॅब घेतला असता त्याचा आज दुपारी रिपोर्ट आला आहे. त्यात त्यांच्या पत्नीला (वय 32) देखील त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पतीमुळे त्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या व्यतिरिक्त धुमाळवाडी परिसरात एका 51 वर्षीय महिलेस कोरोनाची= बाधा झाल्याचे समोर आले आहे. ही महिला कोठून आली तिला कशी बाधा झाली अद्याप आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती नाही. मात्र, यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल त्यांना प्राप्त झाला आहे.
तर संगमनेर शहरात मध्यवर्ती भागात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. पंजाबी कॉलनी येथे 45 व 40 वर्षीय दोन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून ते बाधित व्यक्तीच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना कोरोना झाल्याचे लक्षात आले आहे. तर संगमनेरपासून एक किमी अंतरावर असणार्या ढालेवाडीत देखील कोरोनाचा रुग्ण मिळून आला आहे. तो नाशिकहून आल्याचे समजते असून त्याच्या संपर्कात अजून कोण आहे. याचा शोध प्रशासनाने घेणे सुरू केला आहे.
--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 61 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 64 लाख वाचक) ============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------