अकोल्यातील पिंपळगाव निपाणी व संगमनेरातील समनापुर स्वयंप्रेरणेने बंद! 10 हजार लोक होमक्वारंटाईन, 300 कंटेनमेंट!
सार्वभौम (संगमनेर) :-
अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी दोन तर धुमाळवाडी परिसरात एक अशा तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यानंतर तेथील गावकर्यांनी सावध भुमिका म्हणून स्वयंस्पुर्तीने गावे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पिंपळगाव निपाणी येथे आजपासून चार दिवस गाव बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील तब्बल तीन हजार लोक स्वत:हून होमक्वारंटाईन झाले आहेत. तर येथील 23 घरांचे क्षेत्र केटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पलिकडे धुमाळवाडी शिवाजीनगर परिसरातील देखील एका शिक्षिकेला बाधा झाल्यामुळे त्या परिसरातील 26 घरे केंटेनमेंट करण्यात आली आहे. इतकेच काय! संगमनेर तालुक्यात देखील कुरण कंटेनमेंट केल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव समनापूर गावाला लागू नये यासाठी हे गाव तब्बल दहा दिवस स्वयंप्रेरणेने बंद करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यात गेल्या तीन महिन्यात प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला होता. आजही मुळ शहराच्या चारही बाजुंना कोरोनाचा रूग्ण मिळून आला आहे. मात्र, मुख्य शहरात रहिवास असणारा एकही रुग्ण अद्याप मिळून आलेला नाही. शहराच्या बाजुला ढोकरी, धुमाळवाडी, मार्केट यार्ड अशा परिसरात रुग्ण मिळाले मात्र, नगरपंचायत आणि तहसिलदार, बीडीओ आणि आरोग्य विभाग यांच्या अथक परिश्रमामुळे शहर अद्याप सुरक्षित आहे. हे असे असले तरी अकोले तालुक्यातील गावांमध्ये काही व्यक्ती कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विशेष काळजी घेत नाही. त्यामुळे काही गावांना हकनाक कंटेनमेंटला सामोरे जावे लागत आहे.
आता पिंपळगाव निपाणी येथील कोरोना प्रतिबंधक समिती आणि ग्रामस्थ यांनी गाव बंद करण्याचा जो निर्णय घेतला तो फार महत्वाचा ठरणार आहे. आज या गावात प्रतिष्ठीत कांद्याचे व्यापारी यांनी कोरोनाची लागण झाली आहे. अर्थात कोरोना होणे म्हणजे जगावेगळे असे काही नाही. मात्र, या दरम्यानच्या काळात त्यांच्या सानिध्यात जे कोणी आले होते. त्यांनी मुग गिळून का होईना घरात बसणे अपेक्षित आहे. कारण, सजग नागरिक म्हणून कोणी स्वयंप्रेरणेने पुढे येत नाही. त्यामुळे शनिवार पर्यंत गाव बंद हाच योग्य निर्णय आहे. त्याचे प्रशासनाने स्वागत केले आहे. सध्या येथे 200 लोकवस्ती असणारा परिसर प्रशासनाने कंटेनमेंट केला आहे. तर काही व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहे. तसेच या गावात सकाळी ५ ते ९ या वेळेत दुध संकलन तर सकाळी ६ ते ७ तसेच सायंकाळी ६ ते ७ असे एकच तास गिरण सुरु राहणार आहे. तर धुमाळवाडी परिसरात जी शिक्षक माहिला बाधित मिळून आली आहे. त्यांना कोरोनाची बाधा कशी झाली याचा शोध लावण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे तेथे 26 घरे कंटेनमेंट व 100 व्यक्तींना होमक्वारंटाईन केले आहे.
दरम्यान कुरण येथे 38 रुग्ण कोरोना बाधित आढळल्यामुळे तेथील 4 ते 5 हजार लोकांना होमक्वारंटाईन केले आहे. तर 34 जणाचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत. मात्र, तरी देखील तेथील लोक काही खरेदी करण्यासाठी समनापूर येथे येऊ शकतात. त्यांचा समनापूर बाजारपेठेशी संपर्क होऊ शकतो. त्यामुळे येथील ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी मिळून 7 हजार लोकांचे आरोग्य सुस्थितीत रहावे तसेच तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समनापूर गाव 10 दिवस बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकीकडे कुरण बंदला लोकांचा विरोध होतो तर समनापूर हे स्वयंप्रेरणेने बंद होते. त्यामुळे खरोखर प्रशासनाने या नागरिकांचे कौतुक केले आहे.--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 61 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 64 लाख वाचक)============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------