पोलीस असले म्हणून काय झालं.! तगडं बील भरावं लागेल.! संगमनेरात कोविड योद्ध्यांची अवहेलना!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेरात ऐकावं ते नवलच झालं आहे. कारण, कोरोना आता 750 लोकांच्या शरिरावर राज्य करून 19 जणांचा जीव घेऊन गेला आहे. तर संगमनेच्या चार-पाच-लाख लोकांच्या मनावर भोकाडीसारखे सावट या रोगाने उभे केले आहे. मात्र, यापलिकडे कोरोनाचे साम्राज्य या तालुक्यात दिसून येत आहे. कारण, हा बहाद्दर गल्ली बोळातून थेट जेलपर्यंत गेला आहे आणि तेथून त्याने वर्दीवर हात घातला टाकला आहे. त्यामुळे एकीकडे जिल्ह्यात 12 तर एकट्या संगमनेरात 12 पोलीस कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. मात्र. दुर्दैव असे की, रोज रस्त्यावर लढणार्या या कोरोना योद्ध्यांवर जेव्हा बाधित होण्याची वेळ आली. तेव्हा येथील डॉक्टर चक्क पोलिसांना त्यांच्या रुग्णालयातील बिलाचा पाढा वाचून दाखवितात, तर पहिले डिपॉजिट मग अॅडमिट असे एकल्यानंतर पोलिस तेथे जाण्याचे टाळतात आणि एका कमी खर्चाच्या रुग्णालयात दाखल होतात. म्हणजे कोविडच्या काळात देखील काही लोक समाजसेवेच्या नावाखाली पैसा उकळत असल्याच्या धक्कादाय प्रतिक्रीया समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर चक्क पोलिसांचेच प्रचंड हाल होताना दिसून आली आहे. म्हणजे एकवेळी अशी आली होती की, संगमनेरात वेळीच उपचार आणि सहकार्य होत नाही म्हणून येथील पोलिसांना चक्क लोणीला हलविण्याची तयारी पोलीस अधिकार्यांनी केली होती. म्हणजे पोलिसांचेच येथे इतके हाल आहेत. तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील आणि बिल भरताना त्यांच्या धडपडीची कल्पाना जरी केली तरी प्रश्न पडतो की, हा कोरोना गरिबांना लुटण्यासाठी आणि लुटारुंना मोठं करण्यासाठी आला आहे की काय? हेच कळेनासे झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 31 जुलै रोजी संगमनेरात वाहतूक शाखेचे तीन, पोलीस उपविभागीय कार्यालयातील दोन महिला, तालुक्यातील दोन तर शहरातील एक अशा आठ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. दोन दिवसांपुर्वी देखील 22 आरोपी आणि 4 पोलिस हे पॉझिटीव्ह आले होते. अशा 12 जणांनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. मात्र, जेव्हा हे आठजण बाधित मिळून आल्यानंतर पोलीस अधिकार्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलीस निरीक्षक अभय परमार व पप्पू कादरी यांनी मोठी धडपड करुन आपल्या कर्मचार्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, संगमनेरच्या काही रुग्णालयांनी या आठ कर्मचार्यांनी दाखल करुन घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागले असे सुतोवाच दिले. त्यानंतर हे बाधित कर्मचारी स्वत:हून म्हणाले, साहेब! आम्हाला अशा ठिकाणी अॅडमिट करा, जेथे आम्ही रिकवर होईपर्यंत बिल भरू शकू. त्यामुळे येथे कोविड योद्धा आणि सामाजिक बाधिलकी यापेक्षा पैशाला किती महत्व आहे. याची प्रचिती झाली. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण कोठे दाखल करायचे यावर चर्चा सुरू असताना संगमनेरात योग्य सहकार्य होत नसल्याने आठही पोलीस लोणीला हलविण्याचा विचार सुरू झाला होता, मात्र एका खाजगी रुग्णालयात त्यांना सामावून घेण्यात आले.
खरंतर जे रस्त्यावर रोज आपल्या जीवाची पर्वा न करता मरणाशी झुंज देतात त्यांच्यावर वेळ आल्यानंतर त्यांची अशा प्रकारे अवहेलना व्हावी. ते देखील संगमनेरसारख्या ठिकाणी.! ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे, शासनाने एका निर्णय घेतला पाहिजे. सरकारी कोणताही कर्मचारी असतो. त्यांचे शासकीय कार्ड दाखविल्यानंतर त्यांच्यावर मोफत किंवा अल्पदरात उपचार झाले पाहिजे. त्यांच्यासाठी विशेष सेवा सुविधा दिल्या पाहिजे. खरंतर पोलीस अधिक्षकांनी याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. पोलीस रोज रस्त्यावर असताता, एक विभागीय कार्यालयासाठी किंवा जिल्हा पोलिसांसाठी तरी एक कोरोनावर उपचार करणारे सेंटर उभे केले पाहिजे. कारण, आपल्याकडे चार हजार पोलिसांचे कुटुंब आहे. त्यांचे पालकत्व एसपी साहेबांचे आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा फंड निर्माण करुन एखादे रुग्णालय किंवा मुख्यालयाच्या मैदानात अथवा पोलीस मंगलकार्यालयात किमान 50 बेड उपलब्ध केले पाहिजे. असे झाले तर खर्या अर्थाने पोलिसांची अवहेलना होणार नाही. त्यांना कोविशी लढण्यास बळ मिळेल. आता हा फंडा केवळ पोलिसांचाच नाही, तर महसूल आणि जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत येणार्या व्यक्तींसाठी देखील अशी सुविधा होणे अपेक्षित आहे. कारण, जनतेसाठी लढायचे आणि त्यांची कामे करायची, मात्र दरम्यानच्या काळात कोरोनाची शिकार झाले की अवहेलना आणि शारिरीक व मानसिक त्रास सोडून हाती काय येते? माणूस जोवर काम करतो तोवर तो कोविड योद्धा असतो आणि एकदा का बाधित झाला! की त्यानंतर तो रुग्ण आणि पीडित होऊन जातो. काल जो समाज त्याला चांगले म्हणत होता, तोच त्याच्या जवळ जाण्यास टाळतो आणि चक्क अस्पृश्यतेसम वागणूक देतो. हेच वास्तव आता उघड्या डोळ्यांना दिसून येत आहे.
खरंतर जसजसा कोरोना वाढत चालला आहे. तसतसे प्रत्येकजण स्वत:ला जपत आहे. प्रत्येक खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी देखील अंग चोरुन कामे करू लागली आहेत. त्याचे उत्तम उदा. म्हणजे पहा आज चार दिवस झाले संगमनेर पोलीस कोठडीत 22 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर तेथील आरोपी दुसरीकडे हलविणे गरजेचे होते. ते बरॅक तत्काळ सॉनिटाईझ करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. अगदी काल सायंकाळी प्रशासनाला वेळ मिळाला आणि आठ पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर पोलीस ठाणे सॉनिटाईझ करता-करता जेल सॅनिटाईझ करण्यात आले. मात्र, दुर्दैव असे की, ज्या कोठडीत 22 जणांना कोरोना झाला आजही ते आरोपी त्याच बंधरा बाय दहाच्या खोलीत बंधिस्त आहे. म्हणजे यांना कोणी वाली आहे की नाही.! शासन, प्रशासन आणि यांना न्यायदेवता कोणी नाही का? ही देखील मानसे आहेत. हे कसे विसरुन चालेल. कारण, एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरी किंवा शासकीय कार्यालयात एखादा रुग्ण सापडला तर त्याचे घर तत्काळ सॉनिटाईझ करण्यासाठी नागपालिका धावून जाते, एखाद्या नेत्याला, लोकप्रतिनिधीला बाधा झाली तर त्याची किती ठेप ठेवली जाते. येथे मात्र, पोलिसांनाच बिलाकडे पाहून कमी दराची रुग्णालये शोधावी लागतात तर हे आरोपी किस झाड की पत्ती! आज पोलिसांकडे अशा पद्धतीने दुर्लक्ष झाले तर उद्या होमगार्ड म्हणजे अवघ्या 400 रुपयांवारी त्यांनी खाकीच्या खांद्याला खांदा लावून जीवाची बाजी लावली आहे. जर त्यांच्यावर अशी परिस्थिती आली तर त्यांचे काय हाल होतील, त्यांच्या कुटुंबाची मनस्थिती काय असेल? याकडे देखील अप्पर पोलीस अधिक्षक यांनी लक्ष दिले पाहिजे. त्यांच्यासाठी देखील वेळीच उपायोजना केल्या पाहिजे. जसे खाकी जनतेची सुरक्षा करते आहे. तशी त्यांची सुरक्षा करण्यास कोणी धजत नसेल तर प्रत्येकाने सिकमध्ये गेलेले काय वाईट आहे. त्यामुळे प्रत्येक कोविड योध्यांच्या आरोग्याचा विचार व्हावा हीच प्रमाणिक इच्छा आहे.
त्यामुळे, संगमनेरची कोरोना परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे. येथे खुलेआम लुटमार होत असल्याचे बोलले जात आहे. शासन रोज एक नवा नियम काढून आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, जे लोक रुग्णालयातून घरी आले आहेत. त्यांच्या प्रतिक्रीया ऐकल्यानंतर माणूस मरण पत्कारेल परंतु अशा प्रकरची हेटाळणी आणि लुटमार सहन करु शकत नाही. अशा भयानक व खळबळजणक प्रतिक्रीया सामान्य व्यक्तींकडून येताना दिसत आहे. यावर कोणी पर्याय काढेल अशी चित्र देखील स्पष्ट-अस्पष्ट दिसत नाही. त्यामुळे, प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी हेच त्यावरील सोलुशन आहे.
- सागर शिंदे