अकोल्यात शेरणखेल बाधित तर संगमनेरात समनापूर, राजापूर, जाखुरीसह 30 पॉझिटीव्ह!


- शंकर संगारे   
सार्वभौम (संगमनेर) :- 
                        संगमनेरात कोरोनाकडून काय एकायला व पाहयाला मिळेल हे अक्षरश: अनोखे झाले आहे. कोठे अधिकारी बाधित होतात तर कोठे जेलमधील आरोपी! म्हणजे संगमनेरात जेथे माणूस सुद्धा लवकर पोहचू शकत नाही. तेथे कोरोना जाऊन पोहचला आहे. आता जर नागरिकांनी काळजी घेतली नाही तर याच परिस्थितीकडे अकोल्याची वाटचाल सुरू होईल असे चित्र येथे दिसते आहे. आज शेरणखेल येथे राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्‍याच्या वडीलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर तेथे आणखी एकास काही त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे या परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. तसेच संगमनेर येथे देखील समनापूर व जाखुरी येथे पहिल्यांदाच कोरोनाची बाधा झाल्याचे खाजगी अहवालात समोर आले आहे. तर राजापुरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर शहरात आणखी पाच रुग्ण मिळून आले आहेत.
                        याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यात कोरोनाची संख्या 679 वर जाऊन पोहचली आहे. त्यात काल कोरोनाने तर हद्दच पार केली. पोलिसांकडे पाहुन भल्याभल्यांची बोलती बंद होते. तर पोलीस ठाण्यात पाय टाकताच अनेकांच्या  अंगाला घाम फुटतो. मात्र, या कोरोनाने पोलिसांनाच घाम फोडला आहे. इतकेच काय! भलेभले सराईत गुन्हेगार पोलिसांना घाम फोडतात मात्र, या कोरोनाने त्याच आरोपींना देखील घाम फोडला आहे. कारण संगमनेर पोलीस ठाण्यात एक ना दोन तब्बल 22 गुन्हेगारांना बाधा झाली असून त्यांना न्यायालयाने शिक्षा देण्यापुर्वीच कोरोनानेच शिक्षा दिली आहे. तर आज काही खाजगी अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यात संगमनेर शहरातील पाच रुग्ण असून राजापूर, समनापूर आणि जाखुरी येथील प्रयत्येकी एक रुग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
              तर जे 22 आरोपी आहेत. त्यात घारगाव 1, शेळकेवाडी 2, पोखर्डी हवेली 4, आश्वी बु 1, वरवंडी 1, संगमनेर खु 1, घुलेवाडी 1, माताडेमळा 1, निमगाव पागा 2, पिंपळगाव ढेपा 2, निळवंडे 1, माळेगाव हवेली 1, वडगाव पान 1, उन्मानाबाद येथील 3, आष्टी (बीड) 1 अशा 22 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. 
                तर यापालिकडे अकोले तालुक्यातील डोंगरदरीत गेल्या वर्षानुवर्षे विकास झाला नाही मात्र, काही तासात दर्‍याखोर्‍या पार करून तेथे कोरोनाने आपली वसाहत मांडली आहे. माणिक ओझर सारख्या ठिकाणी 21 रुग्ण सापडतात हे मोठी शोकांतीका आहे. तर आज शेरणखेल येथे एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. या कुटुंबातील तरुण नेतृत्व राष्ट्रवादी पक्षात सक्रिय असून त्याच कुटुंबाला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. हे कुटुंब सामाजिक विचारसारणीचे असल्यामुळे त्यांचा आणखी कोणाशी संपर्क झाला आहे याचा शोध घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आता कोरोना ही जगावेगळी बिमारी नाही, मात्र त्याबाबत प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. बाधित झालेल्या व्यक्तींना बोचणी नको तर धिर दिला पाहिजे. कारण आपल्याला बिमारसे नाही बिमारीसे लढना हैं! त्यामुळे, स्वत:ची काळजी घ्या, सोशल डिस्टन्स पाळा, वारंवार हात धुवा, गर्दीची ठिकाणे टाळा, प्रशासनाच्या नियमांचे पालन करा.
 - आकाश देशमुख