पद्मश्री विखे पाटील पतसंस्थेच्या मालकावर पिस्तूल रोखले! पैशाहून खल्लास करण्याची धमकी! आरोपी अटक


सार्वभौम (कोपरगाव) : 
                        कोपरगाव शहरात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नागरी सहकारी पतसंस्था येथे पैशाच्या जुन्या वादातून विजय नारायण वडांगळे यांच्या केबीनमध्ये घुसून डोक्यला पिस्तूल लावून ठार मारण्याची धमकी दिली. ही धक्कदायक घटना गुरूवार दि. 2 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राजेश रामकृष्ण जोशी (रा. वडांगळे वस्ती) याच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यात पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी आरोपी जोशी यास अटक केली असून त्यास आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
                     
   याबाबत सविस्तर माहिती अशी की, विजय वडांगळे आणि राजेश जोशी हे एकाच परिसरातील रहिवासी आहेत. ती दोघे एकामेकांचे मित्र आहेत. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपुर्वी एका हॉटेलमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते. मात्र म्हणतात ना पैसा वाईट असतो, त्यांची प्रचिती येथे आली. याच आर्थिक देवाण-घेवाणीत दोघांचे दोघांमध्ये मतभेद होत गेले. एकमेकांचे उधारीचे पैसे किती घेणे-देणे होते माहिती नाही. मात्र, जोशी यांच्या म्हणण्यानुसार वडांगळे यांचे सर्व उधारीचे पैसे त्यांनी दिले आहे. तर वडांगळे यांच्या म्हणण्यानुसार जोशीकडून काही रक्कम घेणे बाकी आहे. या कारणामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
              दरम्यान गुरूवारी या दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. तेव्हा आरोपी जोशी हा थेट वडांगळे यांच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नागरी सहकारी पतसंस्थेत गेला. त्याच्या केबीनमध्ये प्रवेश करीत तुझे उधारीचे पैसे दिले आहेत. तरी तू परत-परत पैसे का मागतो असे म्हणत थांब तुला आज मारुनच टाकतो, खल्लास करतो असे म्हणत त्याने पिस्तूल काढला आणि डोक्याला लावून त्याचा खटका ओढला. हा प्रकार पतसंस्थेत असणार्‍यांनी पाहिल्यानंतर सगळ्यांनाच घाम फुटला होता. शुल्लक उधारीच्या पैशासाठी इतकी ताणाताण करणे किंवा अशा प्रकारच्या थराला जाणे म्हणजे अंगावर काटा आणण्यासारखे आहे
     
त्या दिवशी जोशी यांनी खटका ओढला खरा मात्र घोडा ओढला नाही. अन्यथा कोपरगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली असती. आता हा सर्व प्रकार वडांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद आहे. मात्र, याचे वास्तव आणि खरे कारण शोधण्यासाठी पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी आरोपी जोशी यास रात्री अटक केली आहे. त्याच्याकडे पिस्तूल कोठून आला, वादाचे कारण काय होते, याच्यातील पुर्वीचे वाद काय आहे.? जोशी यांच्याकडे पिस्तूल होता का? असेल तर तो कोणी दिला. हा सर्व प्रकार कोठेतरी कॅमेरॉत कैद झाला असेल. त्यामुळे कोपरगाव पोलीसांचा पुढील तपास सुरू आहे.