संगमनेरच्या मध्यवर्ती भागात कोरोनाचा रुग्ण! कुरणची संख्या वाढली!
-Sushant Pawse
संगमनेर (सार्वभौम) :
संगमनेरला कोरोनाचे ग्रहण संपता संपेनासे झाले आहे. एका दिवसात आढळणार्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुन्हा दोन रुग्णाची नव्याने भर पडली आहे. संगमनेर शहरातील मध्यकेंद्रबिंदू समजल्या जाणार्या व सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असणार्या सयद बाबाचौक येथे प्रथमताच 70 वर्षीय इसमाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर एका पाठोपाठ एक कुरणला कोरोनाचा धक्का बसत आहे. आज पुन्हा कुरण येथे एका 63 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना ग्रस्तानची संख्या 112 वर जाऊन पोहचली आहे.तर कोरोना बाधित होऊन 11 जण मयत झले आहे. त्यामुळे प्रशासनाला दिवसेंदिवस कोरोना विरूद्धच्या लढ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, काल सात जणांनी कोरणावर मात केली होती. परंतु तालुक्यातील पठारभागावरील पेमरेवाडीत 35 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली होती. दिवसागणिक तालुक्यातील चारही बाजुनी कोरोनाचे संक्रमण झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्याने रोजच कोरोनाविषाणुचा फैलाव मोठ्या झपाट्याने होत आहे. त्यामुळे प्रशासन हातबल झाले असून जे-जे होईल तेते पाहत रहावे अशी भुमीका त्यांनी घेतली आहे. आता महसूल अधिकारी फारसे अॅक्टीव्ह दिसून येत नाही. त्यांच्या कामाची गती मंदावली असून येथे काही कर्तव्यदक्ष अधिकार्यांची गरज आहे. असे नागरिकांना वाटू लागले आहे.
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊन शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. राजूर : 9011223312 अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

दरम्यान कुरणचा रुग्ण हा कोरोना बाधिताच्या संपर्कातील आहे. तर शहरातील रुग्ण हा देखील संपर्कातील असून त्याला कोणापासून बाधा झाली आहे. हे अद्याप प्रशासनाला समजलेले नाही. त्यामुळे, त्यांनी संशयीतांचा शोध घेणे सुरू केले आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे वाटतील त्यांनी अशी माहिती लपवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.तर अकोले तालुक्यात ब्राम्हणवाडा परिसरात 38 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर त्यातील दोन नगरला व 16 संगमनेर येथे असून त्यांचे रिपोर्ट अद्याप प्राप्त झाले नाही. मात्र, जे अकोल्यातील दोन कोरोना बाधिन नगरला उपचार घेत होते. त्यांची प्रकृती ठणठणीत झाली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.