संगमनेर पोलीस कोठडीत 22 आरोपींना कोरोनाची बाधा! अकोल्याच्या आरोपींची होणार तपासणी, राहुरीच्या पोलीस कोठडीतही कोरोना!


सार्वभौम (संगमनेर) :- 
                            संगमनेर तालुक्यात कोरोनाने आता कहर केला आहे. तहसिल कार्यालयातील अधिकार्‍यांसह नगरसेवक आणि आत तो बंद खोलीतील कैद्यांपर्यत जाऊन पोहचला आहे. संगमनेरात शहर पोलीस ठाण्यात असणार्‍या 53 कैद्यांपैकी 22 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक अहवाल आता समोर आला आहे. तसेच राहूरी येथील कैद्यांना देखील कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त हाती आले असून आरोपी अटक करावेत की नाही, त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करावेत की नाही ? त्यांनी पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी द्यावी की नाही इतकेच काय? या आरोपींच्या जिवितास काही झाले तर याला जबाबदार कोण? आणि यांची गार्ड म्हणून सुरक्षा करणार्‍या पोलिसांचे काय? असे एक नका अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहे. त्यामुळे सध्या राज्यात चार हजार पोलिसांनी कोरोनाची बाधा असून 40 जण मयत झाले आहे. तर एकट्या नगर जिल्ह्यात 12 जणांना कोरोनाची लागण आहे. आता पोलिसांसह आरोपींचे देखील आरोग्य धोक्यात आल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यावर सरकारने तत्काळ उपायोजना करणे गरजेचे आहे.
                             याबाबत सविस्तर वृत्त असे की, नगर जिल्ह्यातील 30 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या प्रत्येक पोलीस कोठडीत आणि न्यायालयीन कोठडीत असणार्‍या आरोपींची रॅपीड अँन्टीजन टेस्ट करण्याचे काम सुरू आहे. आज राहुरी आणि संगमनेर अशा तिन पोलीस कोठडीत असणार्‍या आरोपींची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यात संगमनेरच्या पोलीस कोठडीत असणार्‍या 22 जणांना कोरोनीची लागण झाली आहे. तर राहुरी येथील दोन आरोपींनी कोरोनाची बाधा झाली आहे. कारण, संगमनेर येथे दोन मोबाईल बॅटरी चोर यांना चौकशीसाठी तेथे नेले होते. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला असता तेेथील काही आरोपींना खोकला आणि सर्दीचा त्रास जाणून आला. त्यानंतर त्यांची कोरोना तपासणी केली असता दोन आरोपी पॉझिटीव्ह आल्याचे समजले आहे. त्यामुळे संगमनेर येथील 53 जणांची टेस्ट केली असता त्यात 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 
विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात गुन्ह्याचे प्रमाण राज्यात दोन नंबरला आहे. त्यामुळे येथे आरोपी देखील कुख्यात आणि हर एक प्रकारचे आहेत. मात्र, पोलीस ठाण्यांचा विचार केला तर येथील भौतिक सुविधा आणि पोलीस संरक्षण तसेच पोलीस बळ यात कोठेच ताळमेळ बसत नाही. त्यामुळे येथील पोलीस दलाचे गणित नेहमी व्यस्त राहिले आहे. नगर जिल्ह्याची लोकसंख्या आणि पोलीस बळ, आरोपी आणि पोलीस कोठडी तसेच पोलीस कोठडीच्या शेजारी न्यायालयीन कोठडी व त्याची जबाबदारी पोलिसांवर अशा अनेक प्रकारे अतिरिक्त कामे खात्यावर पडत आहे. त्यामुळे अनेकदा निलंबन आणि आता पोलिसांच्या आरोग्यावर प्रहार होताना दिसत आहे. खरंतर मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना नाशिक, पुणे किंवा नगर येथील सबजेल येथे ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. एकाच 10 बाय 10 च्या खोल्यांमध्येे 20 ते 30 आरोपी ठेवले जातात. त्यामुळे, आज कोरोनाची जी परिस्थिती आहे ती आरोपींच्या जीवावर बेतली आहे. खरंतर सरकारी तिजोर्‍यांचे पैसे नको तेथे खर्च केले जातात, मात्र प्रशस्त पोलीस ठाणे आणि खोंदार्‍यात पडलेल्या जेलचे चित्र बदलण्यासाठी कोणतेही सरकार पुढाकार घेताना दिसत नाही. आज कोरोनाच्या निमित्ताने हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या निमित्ताने जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी सगळ्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणार्‍या पोलीस कोठडीतील आरोपींची कोरोना तपासणी होणे अपेक्षित आहे. तर जे न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची देखील तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे तशा प्रकारचे पत्र न्यायालयात जाणे गरजेचे आहे. तशा पत्रव्यवहार अकोले पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी केला असून तशी अंमलबजावणी प्रत्येकाने करणे अपेक्षित आहे.  -