आरं देवा! नवरा नवरीसह आठ वर्‍हाडी पॉझिटीव्ह! वधुवराचे लग्न, प्रशासनाची वरात! आदेशाचा बँण्ड वाजला!


सार्वभौम (अहमदनगर) :
                          नगर शहरात तारकपूर परिसरातील उच्चभ्रू वसाहतीतील एका व्यापार्‍याच्या घरी लग्नसोहळा होता. तो एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, दि. 28 जुन रोजी झालेल्या विवाहसोहळ्यानंतर नवरा-नवरीला श्वास घेण्यासाठी प्रचंड त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी केली असता या वधू-वरासह आठ वर्‍हाडी मंडळींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या विवाह सोहळ्यात नेमके कोण-कोण आले होते याची माहिती घेणे प्रशासनाने सुरू केला आहे. आता लग्न जरी नवरा नवरीचे असले तरी वरात मात्र, प्रशासनाची निघाली आहे. त्यामुळे, एकाच वेळी लग्नात आठजण कोरोना बाधित निघाल्याने शहरात एकच खळबळ उडली आहे.
             खरंतर एकीकडे लोक महामारीने मरत असताना लग्नांची घाई का होत आहे. वर्षानुवर्षे घरात राहिलेला व्यक्ती (नवरा असो वा नवरी) यांना बोहल्यावर चढण्याची इतकी घाई का केली जाते? विशेष म्हणजे असे कोणते शास्त्री आहेत ज्यांना इतक्या महामारीत शुभमुहूर्त सापडत आहे. भले केलेे लग्न हरकत नाही. मात्र, सागळ्या गावाला निमंत्रण देत पुणे-मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणांहून पाहुणे बोलावून हे लोक त्यांचे व स्वत:चा आणि समाजाचा जीव का धोक्यात घालत आहे. हा न उलगडलेला प्रश्न आहे. अर्थात लग्नाला कोनाचा विराध नाही. मात्र, जे घरातील आणि अगदी जवळ राहणारे प्रेमाचे लोक आहेत. त्यांच्या साक्षिने व आशिर्वादाने विवाह सोहळा पार पडला तरी नवरा नवरीला पुढे कोणतीही अडचण येत नाही. हे महाराज लोक ओरडून-ओरडून सांगतात. तरी देखील वरबाप आणि वरमाईल शहानपण येत नाही. हे फार मोठे दुर्दैव आहे.
                       
आत संगमनेर तालुक्यात खद्द प्रांताधिकारी यांनी लेखी आदेश काढले होते. की, पुर्वपरवानगी घ्यावी, व्हिडिओ काढावी, निर्जंतुकीकरण करावे, मास्क वापरावे, प्रत्येकाचे तापमान चेक करावे. पण, दुर्दैव असे की, प्रशासकीय आणि पोलीस खात्यातील बड्या-बड्या अधिकार्‍यांनी संगमनेरात झालेल्या एका लग्नाला हजेरी लावली. त्यानंतर त्या लग्नातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाली. ना अधिकारी क्वारंटाईन झाले ना कर्मचारी. इतकेच काय? याप्रकरणी कोणावर गुन्हा देखील दाखल केला नाही. या पलिकडे अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा आणि काळेवाडी येथे 25 जून रोजी दोन लग्न सोहळे पार पडले. त्यात नवरी कोरोना पॉझिटीव्ह निघाली व नवरदेव यांचा पुन्हा स्वॅब घेऊन देखील लग्नाचे 14 दिवस उलटल्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. इतकेच काय! त्यांच्या घरीतील 10 ते 15 जणांचे स्वॅब नेले होते. त्या सर्वाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर ब्राम्हणवाडा येथे सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. येथे स्थानिक प्रशासन अक्षरश: दडपले गेलेे. त्यामुळे, प्रांताधिकार्‍यांनी जे आदेश काढले आहेत. त्याला अक्षरश: केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे अधिकारी फक्त कागदी घोडे नाचवितात की काय? असा आरोप त्यांच्यावर होऊ लागला आहे.
काय आहेत ते नियम ?
                       विवाह समारंभ करिता आवश्यक ती परवानगी स्थानिक ग्राम दक्षता समितीकडून घ्यावी लागेल. याकरिता ज्याच्या घरी विवाह समारंभ आहे. त्यांनी विवाह समारंभाच्या संपूर्ण तपशिलासह अर्ज ग्राम दक्षता समितीकडे करावा. त्यामध्ये 50 पेक्षा जास्त व्यक्ती विवाह समारंभात उपस्थित राहणार नाहीत या बाबतचे हमी पत्र द्यावे. हमी पत्रासोबत विवाह समारंभात उपस्थित राहणार्‍या 50 च्या मर्यादेची व्यक्तींची यादी देण्यात यावी. अर्जामध्ये विवाहाचा दिनांक, वेळ, स्थळ स्पष्टपणे नमूद असावा. विवाहासाठी बाहेरगावाहून येणार्‍या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात थांबावे लागेल. विवाह समारंभाच्या ठिकाणी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची संपुर्ण तपशिलासह नोंद नोंदवहीत घेण्यात यावी. प्रत्येक व्यक्तीचे तापमान व एसपीओ2 प्रमाण नोंदविण्यात यावे. विवाह समारंभाचे चित्रीकरण करुन त्याची एक प्रत व विवाह समारंभात उपस्थित राहिलेल्या व्यक्तींची यादी ग्राम दक्षता समितीकडे सुपूर्त करावी. ग्राम दक्षता समितीने चित्रीकरणाची तपासणी करून 50 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती विवाह समारंभात उपस्थित असल्याचे निष्पन्न झाल्यास तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. 
                         मंगल कार्यालयाच्या संदर्भात त्यांनी तहसीलदारांकडे अर्ज द्यावा. विवाह समारंभात उपस्थित राहणार असलेल्या व्यक्तींची यादी देण्यात यावी. विवाह समारंभात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची तापमान व एसपीओ2 प्रमाण व उपस्थिती बाबतची नोंद घेण्यात यावी. त्याची एक प्रत आणि चित्रीकरणाची एक प्रत तहसीलदारांकडे सुपूर्द करावी. चित्रीकरण याची खात्री करून 50 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती असल्यास तात्काळ गुन्हा दाखल करावा. आता हे आदेश असतांना त्यांची अंमलबजावणी झाली तर बरे नाहीतर लग्न नवरी नवरदेवाचे आणि वरात मात्र प्रशासनाची असेच चित्र पहायला मिळेल.
      - श्याम कांबळे