संगमनेरात पुन्हा दुसर्‍या नगरसेवकासह तळेगाव, गुंजाळवाडी आणि शहरात एकूण सहा कोरोनाचे रुग्ण!


संगमनेर (सार्वभौम) :
                          संगमनेर शहरासह आज तालुक्यात एकुण सहा रुग्ण मिळून आले आहेत. यात कुरण येथेल एकाचा रिपोर्ट जिल्हा रुग्णालयातून आला आहे तर शहरातील दोन रिपोर्ट खाजगी तपासणीतून आले आहेत. त्याच बरोबर तीन जणांची तपासणी अ‍ॅन्टीजन टेस्टनुसार करण्यात आली होती. त्यात गुंजाळवाडी येथील एक, सिन्नर तालुक्यातील एक तर तळेगाव येथील एक असे तीन रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आज संगमनेरात सहा रिपोर्ट पाझिटीव्ह मिळून आले आहेत. तर तळेगाव परिसरात पहिल्यांदाच कोरोनाचा प्रवेश झाल्याचे समोर आले आहे. तर एक विशेष बाब म्हणजे शिवाजीनगर परिसरात राहणार्‍या एका माजी नगरसेवकाला देखील कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल समोर आला आहे. यापुर्वी देखील माजी नगरसेवकाला कोरोनाची बाधा झाली होती. हे नगरसेवक महोदय गेल्या कित्तेक दिवसांपासून सामाजिक कार्य करत होते. त्यातुनच त्यांना कोरोना झाला असून त्यांच्या सोबत असणारे सामाजसेवक देखील आता होमक्वारंटाईन केले आहेत.
                   याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरात तेलीखुंट येथे 30 वर्षीय तरुण तर शिवाजीनगर येथे 36 वर्षीय तरुणाला कोरोना झाल्याचे खाजगी अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच कुरण येथील 75 जणांचे अहवाल जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यापैकी 74 संशयित रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर केवळ एका 48 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहेे. त्यामुळे संगमनेरला हा फार मोठा दिलासा आहे. तर कुरणसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे.
                             
आता संगमनेरात एकूण 97 रुग्ण असून ग्रामीण भागात धांदरफळ येथे 8, निमोण 16, घुलेवाडी 8, केळेवाडी 1, निंबाळे 1, आश्वी 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 3, शेडगाव 3, पळासखेडे 3, जोर्वे 1, खळी 1, गुंजाळवाडी 8, कुरण 51, पिंपरणे 1, साकूर 1, पेमरेवाडी 2, कसारा दुमाला 3, संगमनेर खुर्द 2, ढोेलेवाडी 5, निमगाव जाळी 1, खांडगाव 3, पिंपळगाव कोंझिरा 3, हिवरगाव पठार 1, पेमगिरी 1, नांदुरखंदरमाळ 1, हिवरगाव पावसा 1, मिर्झापूर 1, करुले 1, कनोली 4, नानज 2, चिखली 1, कौठे धांदरफळ 1 असे एकूण 237 रुग्ण कोरोनाचे झाले आहेत. यात 217 रुग्ण मुळ रहिवासी आहे तर 16 बाहेरील, बरे झालेले 137 रुग्ण असून 87 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 14 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे. यात संगमनेर शहरातील 8 जण मयत असून धांदरफळ 1, निमोण 2, कसारा दुमारला 1, डिग्रस 1, शेडगाव 1 अशा 14 जणांनी कोरोशी झुंज देत आपले प्राण सोडले आहेत.