अकोल्याचे बीडीओ लाचलुचपतच्या जाळ्यात, त्यांनी चक्क नोट गिळली ! मेडिकल सुरू, गुन्हा दाखल होणार!


सार्वभौम (अकोले) :
                       अकोले तालुक्याचे बीडीओ भास्कर रेेंगडे यांच्यावर लाचलुचपत विभागाने छापा टाकला आहे. एका ठेकेदारकडे काही रकमेची मागणी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे, नाशिकच्या पथकाने आज गुरूवार दि. 16 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे. आज सायंकाळी याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.  दरम्यान एका ठिकाणी दलितवस्ती येथे एका ठिकाणी काम सुरू होते. ते काम झाल्यानंतर त्याचे एक बील अडकले होते. त्यासाठी बीडीओ यांनी काही रकमेची मागणी केली होती. त्यांनी संबंधित रक्कम स्विकारताना त्यांनी एक नोट गिळल्याचे बोलले जात होते. खरतर गेल्या काही दिवसांपुर्वी रेंगडे यांनी एक जणावर कारवाई केली होती.  त्या ग्रामसेवकाच्या करवी हा प्रकार घडवून आणला गेल्याचे बोलले जात आहे.  त्यामुळे त्यांची मेडिकल करण्यासाठी एका खाजगी ठिकाणी नेण्यात आले आहे. सोनोग्राफी दरम्यान यातील सत्य बाहेर येईल अशी माहिती गोपनिय सुत्रांनी दिली आहे.
                      याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र, गेल्या दिड महिन्यांपासून सरकारने काही नियम शिथिल केल्यामुळे तालुका स्थरावर कामांना गती मिळाली होती. या दरम्यान एका ठेकेदाराकडून अकोल्याचे बीडीओ रेेंगडे यांनी काही अर्थपुर्ण मागणी केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आज दुपारी नाशिक विभागाने ही कारवाई करत बीडीओसह अन्य एकास ताब्यात घेतले आहे. याबाबत त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात दोघांना हजर करुन स्टेशनडायरीला नोंद केली आहे. त्यानंतर दोघांची ग्रामीण रुग्णालय येथे मेडिकल करून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
                         
आता यात वास्तव काय आहे हे येणार्‍या काळात पुढे येईलच. कारण, असे बोलले जाते की, बीडीओ यांना अडकविण्यासाठी अकोले तालुक्यात एक विशेष टिम काम करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काही ग्रामसेवक, ठेकेदार आणि पुढारी यांचे कधीही या अधिकार्‍यांसोबत टिपन बसले नाही. ही कारवाई होते कोठे नाहीतर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेला उधान आले. तसे पाहिले बीडीओ यांनी कोणाचे काम कधी अडविले नाही. ना कोणाच्या दबावाला ते बळी पडले, त्यामुळे सरळ झाडे सहज कापली जातात अशी प्रकारच्या प्रतिक्रीया सोशल मीडियावर उपटल्या जात आहे.
खरंतर अकोले तालुक्यात कोविड योद्धा म्हणून अनेकांनी त्यांना गौरविले आहे. ग्रामीण भागात महसूल आणि आरोग्य प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केेले आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा प्रदुर्भाव अन्य तालुक्यांच्या तुलनेत फार कमी दिसतो आहे. ही एक प्रशासनाची पावती असून त्यातील एक व्यक्ती म्हणून बीडीओ यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, आज असे अचानक काय झाले की त्यांच्यावर अशा प्रकारे ट्रॅप झाला! त्यामुळे अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत सार्वभौम सविस्तर लेख सादर करेल.! 
- सागर शिंदे 
--------------------------------------
 आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 70 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 365 दिवसात 593 लेखांचे 70 लाख वाचक)