अकोल्यात कोरोनाचा दुसरा बळी तर संगमनेरात एकाच दिवशी 20 रुग्ण पॉझिटीव्ह!


सार्वभौम (अकोले) : 
                    अकोले तालुक्यात कोरोनाने आपले अर्धशतक पुर्ण करताना लहित येथील 30 वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. हा तरुण चाकण येथे नोकरी करीत होता. तो अकोले तालुक्यातील त्याच्या गावी ये-जा करीत असताना त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी तो घरी आला असता त्यास श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे त्याने एका स्थानिक डॉक्टरांशी बोलुन उपचार घेतले होते मात्र तरी देखील त्यास बरे वाटले नाही. दरम्यान त्या डॉक्टरांनी त्यास संगमनेर येथे पाठविले असता एका खाजगी तपासणीत त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. हे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यास फार त्रास होऊ लागला आणि त्याने आज दुपारी अखेरचा श्वास घेतला. तर आज संगमनेर शहर व तालुक्यात एकाच दिवशी 20 रुग्ण कोरोना बाधित मिळुन आले आहेत. 
                     
आता अकोले तालुक्यात कोरोनाने अर्धशतक मारले आहे. तर आजवर तालुक्यात दोन बळी गेले आहेत. त्यामुळे शहरवासियांनी अकोले शहर सोमवारपर्यंत बंद ठेवले आहे. मात्र, कारखाना रोड व शहरातील एका महिला यांचे रिपोर्ट फार संशयास्पद आहे. त्यामुळे प्रशासनाने फार मोठी दक्षता घेतल्याचे दिसत आहे. आजवर तालुक्यात 3 हजार 200 संशयित होमक्वारंटाईन असून 20 पेक्षा जास्त अहवाल येणे बाकी आहे. मात्र, एका व्यक्तीचा अहवाल येण्यासाठी तब्बल पाच ते सहा दिवस लागत असल्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. कारण, भर लॉकडाऊनच्या काळात देखील 72 किंवा 48 तास लागत होते. आता मात्र, चार ते पाच किंवा त्याहुन जास्त कालावधी का लागत आहे. असा प्रश्न विचारला असता प्रशासनाकडे उत्तर नाही. त्यामुळे, रिपोर्ट येईपर्यंत घरचे व होमक्वारंटाईन, क्वारंटाईन, नातेवाईक, गावकरी आणि संपुर्ण तालुका चिंतेत राहतो. त्यामुळे यावर काहीतरी उपायोजना आखणे गरजेचे आहे. 
                               
तर संगमनेरात कोरोना थांबता थांबेनासा झाला आहे. आज गुरुवारी दि. 16 रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या  अहवालानुसार संगमनेर शहरातील मालदाड रोड येथे 50 व 40 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, रहमतनगर येथील 24 वर्षीय तरुण, 44 वर्षीय महिला, घोडेकर मळा येथील 49 वर्षीय पुरुष,  आणि तालुक्यातील घुलेवाडी येथील 53 वर्षीय महिला व 59 वर्षीय पुरुष असे एकूण 8 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज सकाळी संगमनेर शहरातील देवी गल्ली येथे 60 वर्षीय पुरुष व लाखमीपुरा येथे 50 वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर शहरालगत असणार्‍या ढोलेवाडी येथे 25 व 16 वर्षीय पुरुष आणि 12, 14, 21, 65 वर्षीय महिला, निमोण येथे 65 व 45 वर्षीय पुरुष आणि 25 वर्षीय महिला, आणि घुलेवाडी येथील 57 वर्षीय पुरुष असे एकूण 12 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आजची एकूण संख्या 20 झाली आहे. त्यामुळे संगमनेर कोरोनाच्या अधिन झालेले दिसत आहे.