ऐ बाबो.! ते कारोना रुग्ण फॉरेन रिटर्न मित्राच्या भर लग्नात मिरवले !, आखं वर्हाड क्वारंटाईन, ब्राम्हणवाडा परिसर येथील प्रकार
![]() |
वर्हाड |
सार्वभौम (संगमनेर) :
अकोले तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर येथील आकडेवारी थांबता थांबेनाशी झाली आहे. मंगळवारी एक मयत झाल्यानंतर लगेच ब्राम्हणवाडा परिसरातील दोघांना बाधा झाल्याचे समोर आले. मात्र, यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की, ब्राम्हणवाडा (केळेवाडी) येथे एक फॉरेन रिटर्ण कुटूंब आले होते. त्यांच्या मुलाच्या लग्नात तब्बल दोनशे ते चारशे लोक असल्याचे बोलले जाते. त्यांनी बँण्डबाजा लावून मोठे अलिशान लग्न लावल्याचे समोर येत आहे. इतकेच काय! या लग्नाला मुंबईहून मुले आली होती, तर रात्री मोठ्या थाटामाटात वरात नाचविली गेली. त्यात एका माजी सरपंचाचा 26 वर्षीय मुलगा व त्याची 17 वर्षीय चुलत बहिण हे कोरोना बाधित मिळून आले आहेत. त्यामुळे, आता यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू झाला असून 16 जणांचे स्वॅब संगमनेर तर हायरिस्क असणार्या दोन जणांना नगरला हलविण्यात आले आहे. त्यामुळे, एकीकडे देश संकटात असताना इतका भोेंगळा कारभार सुरू असल्याचे दिसलेय मात्र यावेळी पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी आणि सरपंच नेमके काय करीत होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या आयोजकांवर गुन्हे दाखल होणार की यांच्याशी अर्थपुर्ण तडजोड होऊन यांना अभय मिळणार! याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ब्राम्हणवाडा परिसरातील काळेवाडी येथे जांभळे ग्रा. पं. येथे एक तरूण फॉरेनला नोकरी निमित्त होता. कोविडच्या काळात त्यांचे देशात आगमन झाले. याच काळात त्याचा विवाह त्याच परिसरातील काळेवाडी (जांभळे) येथील मुलीशी ठरला. त्यामुळे, पैसा आणि मिजास फार असल्यामुळे "हम बोले सो निहाल" अशीच गंमत तेथे पहायला मिळाली. दरम्यान तेथे लग्न ठरले आणि अजूबाजुच्या पंशक्रोशीत निमंत्रण देण्यात आले. इतकेच काय! पुणे, मुंबई येथून गाड्या भरुन आल्या. गेली चार दिवसांपासून या घरात मोठी रेलचेल सुरू होती. आता ज्याला कोरोना झाला आहे तो मोठा पुढारी! त्यांचेतर फार मोठे मित्र सर्कल आणि स्वत: भाऊंच्या नावे युवा मित्र मंडळ आहे. त्यामुळे तेथे कार्यकर्ता, पदाधिकारी आणि सगळेच एका छताखाली आले. मोठ्या थाटामाटात नवरी- नवरदेवाला हाळद लागली, बँडबाजा वाजला. असे बोलले जाते की, यावेळी लग्नाची कायदेशीर पुर्णपणे प्रक्रिया करण्यात आली नव्हती, येणारे, जाणारे, यांचा मेडिकल सर्टिफीकेट, वाहन परवाने, जिल्हाबदल परवाने अशी काहीच प्रक्रिया करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे, प्रशासन हा प्रकाराने चांगलेच आवाक झाले आहे.
आता आपल्या मित्राचे लग्न म्हटल्यावर भाऊ थेट मुंबईहून आले, ते त्यांच्या बहिनीसह लग्नात मोठ्या मानापानाने फिरले. कोणतेही सोशल डिस्टिन्सींग नाही, शासनांच्या नियमांचे पालन नाही, कोणाच्या तोंडाला मास्क नाही, कोणाच्या हातात सॉनिटायझर नाही. शासकीय नियमांना ढाब्यावर बसवून मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. आता मुंबईचे वर्हाड आणि फॉरेनचा नवरदेव म्हटल्यावर तेथे काय उधळपट्टी असेल हे फोटो पाहिल्यानंतर नव्याने सांगायला नको. यांनी मोठ्या थाटामाटात वरात मिरविली. इतकेच काय! गेल्या कित्तेक दिवसानंतर गावात डिजे वाजल्यामुळे आख्या युवा मंडळाने सैराट गाण्यावर ताल धरला. मात्र, या सर्व आनंदात कोरोना देखील सामिल होऊ शकतो याची त्यांना जरा देखील कल्पना आली नाही. अखेर जे नको तेच झाले.
ज्याचे-त्याचे अटोपले आणि जो-तो चालता झाला. मात्र, यांनी प्रशसकीय अधिकारी आणि चारपाच गावांना कामाला लावले. भाऊंना कोरोना झाल्याची माहिती मिळताच मुंबई-पुण्याहून आलेल्या अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. गावकर्यांमध्ये मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले. काळेवाडी, चैतन्यपूर, जांभळे, बदगी, ब्राम्हणवाडा, पुणे, मुंबई यांच्यासह अनेक ठिकाणी गेलेल्या संशयित व्यक्तींचा प्रशासनाने शोध सुरु केला आहे.आता एक महत्वाची बाब म्हणजे गावात इतका मोठा विवाह सोहळा पार पडतो याची भनक जांभळे सरपंच, तलाठी, पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक यांना लागत नाही. ही किती मोठी शोकांतीका व्यक्त केली जात आहे. आता असे काही झालेच नाही, असा बाऊ नक्कीच उठविला जाईल यात शंकाच नाही, प्रशासन एकमेकांना पाठीशी घालण्याचे काम करेल. पोलीस प्रशासन देखील काय भुमिका घेते हे आपल्यासमोर येईलच. मात्र, असे एकएक करुन काल जो तालुका कोरोनामुक्त होता. तो आज जिल्ह्याच्या नकाशात कोरोना बाधित आणि मयत या यादित नोंदला गेला आहे. त्यामुळे, या प्रकरणात प्रशासनाने कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. आजच काही अंशी "अर्थपुर्ण" तडजोडीच्या चर्चांना उधान आले आहे. मात्र, अकोले प्रशासनाने आजवर फार उल्लेखनिय काम केले असून त्यांच्या कर्तबगारीवर सध्यातरी जानकार व सजग नागरिकांचा विश्वास आहे. खरंतर काल पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर येथे लग्नात असाच प्रकार झाला होता. तर तेथे सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर कालच श्रीरामपूर तालुक्यात बेलापूर येथे पोलीस पाटील यांच्या तक्रारीनुसार नवरी नवरदेवासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यात देखील अशा प्रकारची गुन्हे दाखल झाल्यास तोच एक कोरोनाला प्रतिबंध ठरू शकतो.
आता या घटनेनंतर स्वत: तहसिलदार मुकेश कांबळे व पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी या प्रकरणाची शहनिशा केली आहे. त्यांनीच काही फोटा उपलब्ध करुन कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी कारवाई होईल अशी अनेकांना खात्री आहे. सध्या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 16 जणांचे स्वॅब घेण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले असून हायरिस्क असणार्या दोघांना नगर येथे हलविण्यात आले आहे. सध्या या परिसरातील पाच गावांमधील जे तरूण लग्नाला आले होते. त्यांचा शोध सुरू असून काहींचे स्वॅब घेण्यासाठी त्यांना नगरला किंवा संगमनेरला हलविण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या परिसरात फार घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाने सध्या हे गाव कंटेनमेंट करण्याची गरज आहे. मात्र, नियमानुसार त्यांनी 260 लोकांची वसाहत कंटेनमेंट केली आहे. एक काळजी म्हणून गावकर्यांनी जागरुक होणे गरजेचे आहे. जे कोणी बाधितांच्या संपर्कात आले होते. त्यांनी स्वयंप्रेरणेने माहिती देणे अपेक्षित आहे. तर गावकर्यांनी गाव बंद करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आता या लग्नातील कितीजण मुंबईला गेले, किती पुण्याला गेले, कोण कोणत्या गावात गेले हे शोधणे फार आव्हानात्मक आहे. मात्र, प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे हेच महत्वाचे आहे.
भाग 1