उद्यापासून सात दिवस अकोले शहरात जनता कर्फ्यु ! 80 दुकाने आणि 3 बिल्डींगा कंटेनमेंट, 20 हजार स्वयंस्पुर्तीने होमक्वारंटाईन

फोर वॉरियर्स 

सार्वभौम (अकोले) :                        अकोले शहरातील कारखाना रोड परिसरात हासे कॉम्प्लॅक्स येथे एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येताच काही अकोलेकांनी शहरी बंद ठेवण्याची निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता उद्या मंगळवार दि.14 पासून तर सात दिवस म्हणजे सोमवार दि. 20 जुलै पर्यंत शहर बंद राहणार आहे. असा निर्णय काही सजग नागरिक व व्यापारी संघटनांनी एकमताने घेतला आहे. हा बंद शासनप्रणीत नसून तो स्वयंस्पुर्तीचा आहे. त्यामुळे तालुक्यातील तमाम नागरिकांनी या बंदला प्रतिसाद द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. तर ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण मिळून आला होता. तो भाग प्रशासनाने सिल केला असून तेथील आठ कुटुंब, 35 व्यक्ती तर जवळजवळ 80 दुकाने आणि 3 बिल्डींग कंटेनमेंट झोनमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. या स्वयंस्पुर्तीच्या बंदमुळे शहरातील तब्बल 20 हजार 500 लोक स्वयंप्रेरणने होमक्वारंटाईन होणार आहे.
                   
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल सायंकाळी एका खाजगी रूग्णालयातून अकोल्याच्या एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. हे हे वृत्त रोखठोक सार्वभौमला प्रसिद्ध होताच अकोल्याचे प्रशासन जागे झाले. त्यांनी तत्काळ या घराचा शोध घेतला तसेच ते क्षेत्र देखील सील केले. मात्र, हा व्यक्ती एका पतसंस्थेचा कलेक्शन करत होता अशी माहिती मिळताच शहरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान अधिकचा धोका नको म्हणून अकोल्यातील काही सजग नागरिकांनी अकोले शहर बंद करण्याबाबत प्रस्ताव मांडला असता त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. कारण, यापुर्वी जो व्यक्ती कोरोनाने मयत झाला त्याच वेळेला अकोले बंदसाठी बैठका घेण्यात आल्या होत्या. मात्र, 90 टक्के व्यापार्‍यांनी आपली संमती दर्शविली आणि 10 टक्के व्यापार्‍यांनी या बंदला कडाडून विरोध केला. त्यामुळे, काही नेते व सामाजसेवक प्रचंड नाराज झाले होते. यावेळी दवाखाने व मेडीकलसह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.
                 आत यावेळी बंद करण्याविषयी चर्चा सुरू झाली असता अनेकांनी नको-नको ते प्रश्न उपस्थित करु पाहिले. मात्र, ही चर्चा अशीच लांबत राहिली तर आरोप-प्रत्यारोप होत जातील आणि पुन्हा राजकीय हेव्यादाव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पराकोटीला जाईल. त्यामुळे सार्वभौमने देखील आपले परखड मात मांडले होते. कोणत्याही विषयाचा चावून-चावून चोथा करण्यापेक्षा झट मंगनी पट ब्याह.! आणि जर याला त्याला विचारुन पुढाकार देत बसले तर बंदवर नक्कीच पाणी फेरले जाईल. त्यामुळे गाडवाला गोपाळशेठ म्हणण्यापेक्षा बंद करायचे असेल तर त्यावर तत्काळ निर्णय झाला पाहिजे एरव्ही अकोल्यात जो-तो उठतो आणि अकोले बंद पाडतो. तेव्हा बळाचा आशि धिटाईचा वापर चालतो. मात्र, हे काम तर सामाजिक आहे. त्यामुळे त्याला कोणी खोडा घालत असेल तर त्यालाही जशास तसे उत्तर दिला पाहिजे. त्यामुळे, काही तरूणांनी तत्काळ योग्य निर्णय घेतला. त्याला फारसा कोणी विरोध केला नाही. त्यामुळे उद्यापासून सात दिवस अकोले बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
                   दरम्यान ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण मिळून आला आहे. तेथे तहसिलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे व मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांनी कारखानारोडची पहाणी केली. तेथील आठ कुटुंब, 35 व्यक्ती तर जवळजवळ 80 दुकाने आणि 3 बिल्डींग कंटेनमेंट झोनमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. तर अकोले बंद असल्यामुळे शहरातील तब्बल 20 हजार 500 लोक स्वयंप्रेरणने होमक्वारंटाईन होणार आहे.
==========================

आभारपत्र...

प्रिय वाचकहो.! 

           मी दि. 12 जुलै 2019 मध्ये सार्वभौम हे पोर्टल सुरू केले होते. तेव्हाची विधानसभा सुरू असताना अकोले, संगमनेर आणि नगर जिल्ह्यातील राजकीय इतिहास आणि भविष्य वर्तविले होते. त्यातील बहुतांशी गणिते अगदी तंतोतंत जुळली. हेच तर भल्याभल्यांना भावले. कदाचित वय आणि अनुभव कमी असेल पण अंदाज आणि अभ्यासू वृत्ती ही माझ्यात पुर्वीपासून रुजलेली आहे. त्यामुळे, लढायचं आणि तत्वाने भिडायचं. कधी खोटेपणा आणि तत्व यात तडजोड केली नाही. कदाचित पैसा हे जगण्याचे अंतीम उद्दीष्ट असते तर फार कमाई केली असती. पण, जीव गेला तरी बेहत्तर मागे हटायचे नाही. याच घानेरड्या स्वभावाने आयुष्यात फार चढ उतार आले. ते इतके की आजही जगणं नको वाटते. पण, फार अल्पवयात पुस्तकांनी मला घडवलं. वाचनाने प्रगल्भ होत गेलो. अवघ्या वयात घर सोडलं पण कधी व्यसन हा प्रकार मला भिडला नाही. हसून खेळून जगणे आणि आवाज देईल त्याला मदत करणे हे अंगवळणी पडून गेले. त्यातूनच पगार म्हणून जे काही दोन रुपये मिळतील तो घेऊन लिमिटेड गरजा असल्यामुळे पैशाचा मोह कधी झाला नाही. नाशिक  व नगर जिल्ह्यात पत्रकारीता करताना कधी कोणाच्या दबावाला बळी पडलो नाही. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात सलत गेलो. मी तडजोडी केल्या नाही त्यामुळे मी कोणाला करू देईत तर मी पत्रकार कसला? त्यामुळे जे असेल ते लिहायचं, परिणामांची चिंता करायची नाही. या स्वाभावाचा मला फार फायदा झाला. एक निर्भिड व्यक्तीमत्व म्हणून नावारुपाला आलो, एक ना दोन तब्बल 12 पुरस्कार मिळाले. पण या मोठेपणाला नजर लागली आणि मला हरविण्यासाठी प्लॅन नव्हे तर चक्रव्युह आखले जाऊ लागले.
                   अर्थात मी हारलो! मात्र, गमवायला माझ्याजवळ होते तरी काय? तसाही मी शुन्यातून उभा राहिलो होते. त्यामुळे मला पुन्हा शुन्य केल्याचे मला दु:ख नाही. फक्त फार विश्वासू आणि जवळच्या व्यक्तींनी हे कावे अगदी जुळून आणले. म्हणून तेव्हा अनेक धडे शिकायला मिळाले. पण, आयुष्यात मी जे काही पुस्तके वाचली होती. त्यांनी मला मरु दिले नाही. ते ज्ञान म्हणजे अगदी खडकावर एखादं बी उगावं असे होते. त्यामुळे मी पुन्हा त्याच दमाने नवी उभारी घेतली. अर्थात हिरा कोळशाच्या खाणित ठेवला तरी तो त्याचे गुणधर्म सोडत नाही. मग मी का सोडावा? चार डिग्री आणि पाच डिप्लोमा हाताशी असताना मी डिएड. बीएड म्हणून कोठेही शिक्षक म्हणून काम केले तरी कोणीही पोटापुरता पगार देतील. पण, जेथे हारलो तेथेच पुन्हा लढलं पाहिजे. स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. म्हणून पत्रकारीता हा विषय मी कधी सोडला नाही. तसेही पत्रकार म्हणजे काय? असे जर कोणाला विचारले तर त्याच्या तोंडीन किती अपशब्द येतील हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. पण, तरी देखील त्या चौेकटीत मी बसत नाही. म्हणून माझे आत्मियतेचे लिखान अगदी सामान्य व्यक्तींना आपले, परखड व निष्पक्ष वाटते. मात्र, हा पल्ला गाठताना किती वेदना होतात हे शब्दांत मांडणे शक्य नाही.
सार्वभौम म्हणचे समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधूता होय. या शब्दाला साजेसे काम करायचे हेच धेय्य डोक्यात असते. कोणाची जाहिरात मागायची नाही. कारण, जेथे तडजोड आली तेथे संघर्ष संपतो. त्यामुळे कोणाला दे म्हणायचे नाही आणि ज्याने दिली त्याला पुरेपूर फायदा कसा होईल याची काळजी घ्यायची. त्यानंतर त्या व्यक्तीचा आणि आपला संपर्क संपतो. जो कोणी देतो तो जर उपकारच्या भाषा करीत असेल तर त्याचे पैसे त्याच्या तोंडावर फेकलेले कधीही चांगले. दोन रुपयांच्या जाहिरातीसाठी वर्षभर गुलामी हे माझ्या बुद्धीला न पटणारी गोष्ट आहे. त्यामुळे, काल सार्वभौमचा वर्धापनदिन झाला. पण कोणाकडे जाहिरात मागितली नाही. ज्या कोणी दिल्या त्यांनी स्वयंप्रेरणेने दिल्या. त्यांचे मनापासून धन्यवाद. तर काही जाहिराती मी स्वत:हून घेतल्या नाही. अर्थात फार बड्याबड्या पुढार्‍यांची फोन आले नाहीत. पण, अगदी तळागाळातील व्यक्ती आणि सामाजिक क्षेत्रातून जवळजवळ शंभर पेक्षा जास्त लेख आणि हजारो शुभेच्छा सोशल मीडियावर येऊन पडल्या आहेत. हे कशाचे द्योतक आहे? अर्थातच जनतेच्या मनातील भावना लिहील्याचे. त्यामुळे, 70 लाख वाचकांनी आम्हाला डोक्यावर घेतले आहे. हेच आमचे फार मोठे यश आहे.
                    खरंतर सार्वभौम या पोर्टलचे सतराशे साठ असे प्रतिनिधी नाही. संगमनेर येथे सुशांत पावसे, राजूर येथे आकाश देशमुख, देवगाव येथे संकेत सामिरे, अकोल्यात महेश जेजुरकर आणि मेहेंदुरी येथे शंकर संगारे असे पाच सहा तरुण वगळता कोणी काही. इच्छूकांची यादी वाचली तर ती लवकर संपणार नाही. मात्र, गर्दी नको दर्दी हवेत, भाराभर चिंध्यांपेक्षा हे तोडके प्रतिनिधी फार कष्टाने कामे करतात, बातमी त्यांची असली तरी तिला वाचकांच्या ह्रदयापर्यंत कसे पोहचवायचे यासाठी माझी दिवसरात्र धडपड असते. हे केवळ जीवंत अनुभव, अभ्यास आणि वाचन यांच्या जोरावर सार्वभौमची एक पोष्ट कमीत कमी 10 हजार व जास्तीत जास्त 1 लाख 25 हजार या दरम्यान असते. विशेष म्हणजे बातम्या करायच्याच ठरल्या तर दिवसभर करता येईल. मात्र, वाचक आम्हाला नेमही सुचना करीत असतात, त्यामुळे दिवसातून दोन ते चार अशीच क्वालीटी व क्वान्टीटी दिली जाते. जेव्हा आमचे सागळे वाचक झोपेत असतात तेव्हा सार्वभौमचे काम सुरू असते. त्यामुळे, हे जे यश आहे. ते असेच नाही. त्यामागे फार मोठे कष्ट आहे. या सर्व प्रक्रियेत जितका वाट एक संपादक व लेखक म्हणून माझा व प्रतिनिधिंचा आहे. तितकाच ही लिंक शेअर करणार्‍यांचा आहे. खरंतर मला त्यांची नावे देखील माहित नाही. मात्र, शेकडो गृपवर नियमित हे लोक पोष्ट शेअर करीत असतात. त्यांना मात्र खरोखर सार्वभौम मनापासून सॅल्युट करीत आहे.
                        आजवर या पोर्टलवर 595 लेख लिहीण्यात आले आहेत. त्याचे आज वर्षभरात 70 लाख वाचक झाले आहेत. यात प्रत्येकवेळी आम्ही बरोबर असू असे नाही. जेथे चूक झाली असेल, तेथे नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. खरंतर सार्वभौमवर फक्त अभ्यासपुर्वक, स्पोटक, ब्रेकींग न्युज टाकल्या जातात. त्यामुळे अनेकांना वाटता आमचे हे वाटले ते वाटले, शिबीर आणि मार्गदर्शन अशा बातम्या लागल्या नाही. त्यामुळे ते नाराज होतात. अशा वेळी आम्हाला समजून घ्यावे. येणार्‍या काळात रोखठोक सार्वभौम हे दैनिक वृत्तपत्र आपल्या भेटीला येत आहे. तेव्हा सर्वांना न्याय दिला जाईल. तुर्तास आम्हाला आपण समजून घ्यावे. आपले प्रेम असेच वृद्धींगत ठेवावे ही विनंती.
                   पुन्हा एकदा ज्यांनी-ज्यांनी सार्वभौम पाठराखण केली. त्या सर्वांचे मन:पुर्वक आभार. फार वाचकांचे माझ्याकडे नंबर सेव्ह नाही. मात्र. तरी त्यांनी फार मोठमोठे लेख लिहून सदिच्छा दिल्या आहेत. त्या सर्व ज्ञात अज्ञात सहकार्‍यांना 

- सागर शिंदे 
--------------------------------------
 आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 70 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 365 दिवसात 593 लेखांचे 70 लाख वाचक)